कोल्लूर – येथील मुकांबिका मंदिरातील स्वामी शिवाज्योती अद्वैतानंद हे नुकतेच चेन्नई येथे आले होते. त्या वेळी सनातनच्या स्थानिक साधकांनी त्यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. याप्रसंगी स्वामीजी यांना सनातनचे तमिळ भाषेतील ग्रंथ, तसेच सनातन पंचांग भेट देण्यात आले. ते मंगळुरू येथे प्रवास करत असतांना त्यांनी रेल्वेत सनातनचा तमिळ भाषेतील गुरुकृपायोग हा लघुग्रंथ विकत घेतला होता. तो वाचून ते पुष्कळ प्रभावित झाले आणि तेव्हापासून त्यांना सनातन संस्थेविषयी समजले. त्यानंतर त्यांनी थिरूवन्नामलई येथील सनातनच्या ग्रंथप्रदर्शन कक्षावरून दत्त हा तमिळ भाषेतील ग्रंथ विकत घेतला होता.
संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’