सध्या हिंदूंमध्येही ख्रिसमस ट्री उभारून
ख्रिसमस साजरा करण्याची टूम निघाली आहे !
हे हिंदू याकडे लक्ष देतील का ?
मुंबई – ख्रिसमस ट्री केवळ आजारपणच देत नाही, तर कधी कधी धोकादायक आणि दीर्घकालीन रोगांचे निमित्तही होऊ शकते. २५ डिसेंबरच्या उत्सवाच्या काळात जेव्हा श्वसनासंबंधी रोगांच्या तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले, तेव्हा स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कच्या अपस्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ने यावर संशोधन केले. या संशोधनानंतर सिद्ध केलेल्या अहवालात ख्रिसमस ट्री स्वास्थ्यासाठी हानीकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संशोधनाचे मुख्य मार्गदर्शक डॉ. लॉरेन्स कुरलेंडस्की म्हणाले, माझ्याकडे असे रुग्ण आले आहेत, ज्यांच्यात आजारपण आणि ख्रिसमस ट्री यांचा दाट संबंध असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
या अहवालात ख्रिसमस ट्रीममुळे खोकला, श्वास घेण्यात अडचण, तसेच सुस्ती आणि अनिद्रा यांसारख्या आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, अस नमूद करण्यात आले असून या झाडांवर असलेली बुरशी या मागील मुख्य कारण असल्याचे म्हटले आहे. यामुळे निर्माण झालेले जिवाणू श्वासाच्या माध्यमातून शरिरात जाऊन अडचणी निर्माण करतात. यातील काही कण असेही आढळून आले आहेत, जे व्यक्तीला ब्राँकाइटिस आणि न्यूमोनिया यांसारख्या रोंगांच्या स्वाधीन करू शकतात. या झाडाला अनेक दिवस ठेवल्यामुळे घरात रोगकारक जिवाणूंची जलदगतीने वृद्धी झाल्याचे लक्षात आले आहे. याला विशेषज्ञांकडून ख्रिसमस ट्री सिंड्रोम असेही संबोधण्यात येते.
संदर्भ : श्री. मानव बुद्धदेव यांनी टेलीग्राफ डॉट को. युके या संकेतस्थळाच्या आधारे प्रसारीत केलीली माहिती