१. ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन
झुंझुनू येथे विश्वप्रख्यात राणी सतीच्या जत्रेनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आणि धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनासाठी जागा आणि मंडप येथील श्री चावोदादी मंदिराचे श्री. उमेशजी खेतान यांनी उपलब्ध करून दिले.
२. शाळेतील मातृसंमेलनात सनातन संस्थेच्या वतीने प्रवचन
सोज रोड (जिल्हा पाली) येथील आदर्श विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री. राजेश गेहलोत यांनी विद्यालयात मातृ संमेलनाचे आयोजन केले होते. त्यामध्ये त्यांनी सनातन संस्थेच्या सौ. सुशीला मोदी यांना प्रवचन घेण्यासाठी आमंत्रित केले होते. सौ. मोदी यांनी आपल्या प्रवचनामध्ये ६५ जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. यानिमित्ताने तेथे सनातन संस्थेच्या ग्रंथप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले होते.
३. पितृपक्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या प्रवचनात स्थानिक धर्माभिमान्यांचा कृतीशील सहभाग
बिकानेर येथे दोन ठिकाणी कौटुंबिक समस्या, पितृदोष आणि श्राद्धाचे महत्त्व या विषयावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रवचनाच्या आयोजनात स्थानिक धर्माभिमान्यांचा कृतीशील सहभाग होता. आता आसपासच्या मंदिरांत सणांच्या निमित्ताने धर्मशिक्षणाची माहिती लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
– श्री. गजानन केसकर आणि श्री. आनंद जाखोटिया, राजस्थान
अध्यात्मप्रसाराची सेवा तळमळीने करणारे
जयपूर येथील हिंदु जनजागृती समितीच्या
संकेतस्थळाचे वाचक श्री. मनीष शर्मा !
जयपूर येथील हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळाचे वाचक श्री. मनीष शर्मा यांनी जन्माष्टमीच्या निमित्ताने जयपूर येथील शास्त्रीनगरमधील लोहामंडी येथील भोमयोजी मंदिरात देवालय दर्शन आणि धर्माचरण यांची माहिती देणारे ५ फ्लेक्स फलक २ दिवसांसाठी लावले होते. मंदिरात येणार्या जिज्ञासूंनी या फलकांचे वाचन केले. आणि या उपक्रमाचे कौतुक केले. श्री. मनीष शर्मा हे आता मंदिराचे पुजारी आणि जिज्ञासू यांना संपर्क करून त्यांना अशा प्रकारचे फ्लेक्स फलक लावण्याच्या महत्त्वाविषयी सांगत आहेत.
– श्री. गजानन केसकर आणि श्री. आनंद जाखोटिया, राजस्थान