हिंदु संस्कृतीला मागासलेली संबोधून नावे ठेवणार्यांना चपराक !
भारताच्या महान हिंदु संस्कृतीचे महत्त्व लक्षात घ्या !
- जर्मन संशोधकांचे मत
- मंत्रध्वनी चिकित्सेचा विदेशातील रुग्णांवर यशस्वी प्रयोग
वॉशिंग्टन – प्राचीन काळात भारतीय ऋषिमुनी वापर करत असलेली मंत्रध्वनी (मंत्रोच्चार) चिकित्सा हीच आजच्या काळातील आधुनिक अल्ट्रा साऊंड थेरपी आहे, असे अमेरिका आणि जर्मन येथील संशोधकांनी मान्य केले आहे. प्राचीन काळात भारतीय ऋषिमुनी मंत्राद्वारे उपचार करत असत. याच आधारावर अमेरिकेच्या लॉस एंजिल्स आणि जर्मनीच्या वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी अल्ट्रा साऊंड थेरपी विकसित केली आहे. याचाच अर्थ आता भारताच्या प्राचीन उपचार पद्धतीला नवे नाव देऊन मंत्रध्वनी चिकित्सा पद्धतीचा जगात नव्याने वापर होऊ लागला आहे.
काही दिवसांपूर्वी उच्च दाबाच्या तारेला स्पर्श होऊन गंभीररित्या घायाळ झालेल्या तरुणाला न्यूयॉर्क येथील माऊंट सिनाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक औषधोपचार करूनही तो बरा न झाल्यामुळे त्याच्यावर मंत्रध्वनी चिकित्सा म्हणजेच अल्ट्रा साऊंड थेेेेरेपीद्वारे उपचार करण्यात आले. त्यानंतर हा तरुण केवळ १५ दिवसांत बरा झाला. अशाच प्रकारे जर्मनीतील अनेक डॉक्टरांनी मंत्रध्वनी चिकित्सेद्वारे अनेक असाध्य व्याधी झालेल्या रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले आहेत. पॅरिसमधील सालपेट्री रुग्णालयामध्ये अवयव कापले गेलेल्या २७ लोकांवर अल्ट्रा साऊंड थेरपी म्हणजे मंत्रध्वनी चिकित्सेद्वारे उपचार करण्यात आले आहेत.
संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’