तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ !

 

१. मराठी भाषेचे महत्त्व

१ अ. मराठी भाषा जगातील दहा प्रमुख भाषांपैकी एक आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १.५ टक्के लोक मराठी भाषा बोलतात. तिला एक सहस्र वर्षांचा इतिहास आहे. – दि.पु. चित्रे (तरुण भारत, ६.१०.१९९९)
 
१ आ. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम यांसह अनेक संत मराठीतूनच घडले ! – ब्रह्मर्षी डॉ. प.वि. वर्तक, पुणे. 
 

२. मराठीची वैशिष्ट्ये

२ अ. मराठी भाषेस आवेश, गांभीर्य व सरसता या गुणांकरिता कोणत्याही अन्य भाषेच्या तोंडाकडे बघण्याची आवश्यकता नाही. – निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर
 
२ आ. फादर स्टिफन्सने केलेले वर्णन

जैसी हरळांमाजि रत्नकिळा । कि रत्नांमाजि हिरा निळा ॥

तैसी भासांमाजि (भाषांमध्ये) चोखळा । भासा मराठी ॥ १२२ ॥
जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी । कि परिमळांमाजि कस्तुरी ॥
तैसी भासांमाजि साजरी । मराठीया ॥ १२३ ॥
पखियांमधें मैओरू (पक्षांमध्ये मोर)। वृखियांमधे कल्पतरू ।
भासांमधे मानु थोरू । मराठियेसी ॥ १२४ ॥
तारांमधें बारा रासी । सप्त वारांमाजि रवी-शसी ।
या दीपिच्या भासांमधें तैसी । बोली मराठिया ॥ १२५ ॥
 
– फादर स्टिफन्सच्या ख्रिस्तपुराणातून
 
(एका ख्रिस्ती व्यक्तीला मराठी भाषेचे जे महत्त्व कळते, ते मराठी भाषिकांना कधी कळणार ? – संकलक)
 
२ इ. बंगाली भाषेपेक्षा मराठी भाषा संस्कृत भाषेशी जास्त संबंधित असल्याने मराठी भाषा जास्त सात्त्विक असणे
 
वरील सारणीवरून बंगाली भाषेपेक्षा मराठी भाषा संस्कृत भाषेशी जास्त संबंधित कशी आहे, हे लक्षात येईल. यामुळेच मराठी भाषा जास्त सात्त्विक आहे. – प.पू. डॉ. आठवले, कार्तिक कृष्ण पक्ष चतुर्दशी, कलियुग वर्ष ५११० (२६.११.२००८)
 
२ ई. माधुर्य इत्यादी विविध वैशिष्ट्ये : मराठी भाषेला माधुर्य आहे. ती सहज, सुंदर, सोपी व रसाळ आहे. तशीच ती समृद्धही आहे. मराठी भाषेत एक प्रकारची लवचिकता आहे, आदर व्यक्त करण्याची क्षमता आहे, शास्त्रशुद्धता आहे, अल्प शब्दांत आशय व्यक्त करण्याची क्षमता आहे. – कु. मधुरा भोसले, सनातन संस्था.
 
२ उ. भाषेतील प्रत्येक शब्दाला भावार्थही असणे : २३.११.२००५ या दिवशी एक वाजता जेवत असतांना मनात वाक्य आले, आपल्या भाषेतील प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. नंतर उदाहरण म्हणून पुढील शब्द व त्यांचे अर्थ मनात आले.
 
१. संत्र : जे खाल्ल्याने अंतरात सात रसांची निर्मिती होते. (शरीरात सप्तधातू आहेत.) 
 
२. सत्ता : जिथे षड्रिपू आणि अहं जास्त प्रमाणात (अधिकतम मर्यादेपर्यंत) कार्यरत असतात. 
 
– सौ. श्रुति नितीन सहकारी, रामनाथी, गोवा.
 
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ तामसिक इंग्रजीच्या तुलनेत सात्त्विक मराठी भाषा श्रेष्ठ !)