उपासकाला हृदयातील भक्तीदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे ‘आरती’. संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निःसंशय सफल होतात, पण तेव्हाच जेव्हा आरत्या हृदयातून, म्हणजेच आर्ततेने, तळमळीने आणि अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य रीतीने म्हटल्या जातात.
एखादी गोष्ट आपल्याकडून आर्ततेने, म्हणजे अंतःकरणपूर्वक तेव्हाच होते, जेव्हा तिचे महत्त्व आपल्या मनावर बिंबते. उपासना करतांना कोणतीही कृती अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य करणे अत्यावश्यक असते; कारण अशा कृतीचेच परिपूर्ण फळ मिळते.
आरतीचे महत्त्व
अ. ‘आरती म्हणजे कलियुगात मानवाला देव बघण्यासाठी केलेला सोपा उपाय आहे; कारण कलियुगात ‘देव आहे कि नाही ?’, इथपासूनच आरंभ होतो. आरती म्हणजे देवतेला आर्ततेने (आतून) हाक मारणे. एखाद्या मानवाने आरतीद्वारे जर अशी हाक मारली, तर देवता त्या मानवाला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील.’
– श्री गणपति (श्री. भूषण कुलकर्णी यांच्या माध्यमातून, ३१.१.२००४, सायंकाळी ६.१०)
५ आ. देवता स्तुतीप्रिय आणि कृपाळू असल्याने तिची स्तुतीपर आरती म्हणणार्या भक्तावर ती प्रसन्न होते.
५ इ. बहुतांश आरत्यांची रचना ही संत किंवा उन्नत भक्त यांनी केलेली आहे. उन्नतांचा संकल्प आणि आशीर्वाद असल्याने, आरती म्हटल्याने उपासकाला ऐहिक अन् पारमार्थिक अशा दोन्ही दृष्ट्या लाभ होतो.
५ ई. भक्तीमार्गानुसार साधना करणार्यात ईश्वराविषयी भक्तीभाव लवकर निर्माण होणे आवश्यक असते. प्राथमिक अवस्थेतील साधकात अमूर्त म्हणजे निर्गुण रूपातील ईश्वराप्रती भाव निर्माण होणे कठीण असते. याउलट मूर्त म्हणजे सगुण रूपातील, मानवी देह धारण केलेला ईश्वर साधकाला जवळचा वाटतो आणि त्याच्याप्रती साधकात भावही लवकर निर्माण होतो. आरती हे सगुणोपासनेचे एक सोपे माध्यम आहे.
५ उ. आरतीच्या वेळी साधकाचा देवतेविषयी भाव वाढत असल्याने त्याला अनुभूती येते. अनुभूतीमुळे त्याची देवावरची श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते.
५ ऊ. आरतीच्या वेळी देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होत असल्याने त्या वेळी साधकाला देवतेची शक्ती आणि चैतन्य यांचा अधिक लाभ होतो. म्हणून देवळात इतर वेळी उपस्थित रहाण्याच्या तुलनेत आरतीच्या वेळी उपस्थित रहाणे अधिक लाभदायक असते.
५ ए. ‘आरतीतून निर्माण झालेल्या नादलहरींमुळे जिवाच्या भोवती असलेले वायूमंडल सात्त्विक बनून परिसराची शुद्धी होते.’
आरतीचे महत्त्व
अ. ‘आरती म्हणजे कलियुगात मानवाला देव बघण्यासाठी केलेला सोपा उपाय आहे; कारण कलियुगात ‘देव आहे कि नाही ?’, इथपासूनच आरंभ होतो. आरती म्हणजे देवतेला आर्ततेने (आतून) हाक मारणे. एखाद्या मानवाने आरतीद्वारे जर अशी हाक मारली, तर देवता त्या मानवाला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील.’
– श्री गणपति (श्री. भूषण कुलकर्णी यांच्या माध्यमातून, ३१.१.२००४, सायंकाळी ६.१०)
आ. देवता स्तुतीप्रिय आणि कृपाळू असल्याने तिची स्तुतीपर आरती म्हणणार्या भक्तावर ती प्रसन्न होते.
इ. बहुतांश आरत्यांची रचना ही संत किंवा उन्नत भक्त यांनी केलेली आहे. उन्नतांचा संकल्प आणि आशीर्वाद असल्याने, आरती म्हटल्याने उपासकाला ऐहिक अन् पारमार्थिक अशा दोन्ही दृष्ट्या लाभ होतो.
ई. भक्तीमार्गानुसार साधना करणार्यात ईश्वराविषयी भक्तीभाव लवकर निर्माण होणे आवश्यक असते. प्राथमिक अवस्थेतील साधकात अमूर्त म्हणजे निर्गुण रूपातील ईश्वराप्रती भाव निर्माण होणे कठीण असते. याउलट मूर्त म्हणजे सगुण रूपातील, मानवी देह धारण केलेला ईश्वर साधकाला जवळचा वाटतो आणि त्याच्याप्रती साधकात भावही लवकर निर्माण होतो. आरती हे सगुणोपासनेचे एक सोपे माध्यम आहे.
उ. आरतीच्या वेळी साधकाचा देवतेविषयी भाव वाढत असल्याने त्याला अनुभूती येते. अनुभूतीमुळे त्याची देवावरची श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते.
ऊ. आरतीच्या वेळी देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत होत असल्याने त्या वेळी साधकाला देवतेची शक्ती आणि चैतन्य यांचा अधिक लाभ होतो. म्हणून देवळात इतर वेळी उपस्थित रहाण्याच्या तुलनेत आरतीच्या वेळी उपस्थित रहाणे अधिक लाभदायक असते.
ए. ‘आरतीतून निर्माण झालेल्या नादलहरींमुळे जिवाच्या भोवती असलेले वायूमंडल सात्त्विक बनून परिसराची शुद्धी होते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २१.४.२००५, रात्री ९.०२)
आरती भावपूर्ण आणि सात्त्विक होण्यासाठी आवश्यक घटक
आरती म्हणणार्यांचा ईश्वराप्रती भाव जितका जास्त, तितकी आरती जास्त भावपूर्ण आणि सात्त्विक होते. अशी आरती ईश्वरापर्यंत लवकर पोहोचते.
आरतीमधील शब्दांचा उच्चार, शब्द म्हणण्याची गती, शब्द जोडून म्हणणे किंवा वेगवेगळे म्हणणे इत्यादींवर शब्दांतून निर्माण होणारी सात्त्विकता आणि चैतन्य अवलंबून असते.
बहुतांश आरत्यांची रचना ही संत किंवा उन्नत भक्त यांनी केली आहे. उच्च पातळीच्या अशा संतांनी रचलेल्या आरत्यांचा अर्थ समजायला काही वेळा कठीण जाते. मात्र आरतीचा अर्थ समजून घेऊन आरती म्हटली, तर देवतेप्रती भावजागृती लवकर व्हायला साहाय्य होते.
देवीची आरती कशी करावी ?
आरती म्हणण्याची योग्य पद्धत कोणती ?
‘देवीचे तत्त्व, म्हणजेच शक्तीतत्त्व हा तारक-मारक शक्तीचा संयोग आहे. त्यामुळे देवीच्या आरतीतील शब्द हे अल्प आघातजन्य, मध्यम वेगाने आणि आर्त चालीत, तसेच उत्कट भावात म्हणणे इष्ट ठरते..
आरतीच्या वेळी कोणती वाद्ये वाजवणे योग्य आहे ?
देवीतत्त्व हे शक्तीतत्त्वाचे प्रतीक असल्याने देवीची आरती करतांना शक्तीयुक्त लहरी निर्माण करणारी चर्मवाद्ये हलक्या हाताने वाजवावीत.
भावजागृती होण्यास साहाय्य करणा-या आरत्या
‘सनातन’च्या भाव असलेल्या म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाविषयी दृढ जाणीव असलेल्या साधकांनी ही आरती म्हटलेली असून तिच्यात वाद्यांचा न्यूनतम उपयोग केला असल्याने ती अधिक भावपूर्ण झाली आहे. आरतीमधील शब्दांचा उच्चार कसा करायचा, शब्द म्हणण्याची गती कशी असावी, कोणते शब्द जोडून म्हणावेत किंवा वेगवेगळे म्हणावेत, हेही यातून कळेल. ही आरती ऐकण्याने अन् तशा पद्धतीने म्हणण्याने आपल्यातही जलद भावजागृती होण्यास साहाय्य होईल. तर ऐकूया, सनातनच्या साधकांच्या आवाजातील आरत्या…
आरती करण्याची संपूर्ण कृती
१. आरतीच्या पूर्वी ३ वेळा पुढील पद्धतीने शंख वाजवावा.
१ अ. शंख वाजवण्यास प्रारंभ करतांना मान वर करून, ऊर्ध्व दिशेकडे मनाची एकाग्रता साधावी.
१ आ. शंख वाजवतांना डोळे मिटून, ‘ऊर्ध्व दिशेकडून येणार्या ईश्वराच्या मारक लहरींना आपण आवाहन करून त्यांना जागृत करत आहोत’, असा भाव ठेवावा.
१ इ. शंख वाजवतांना शक्यतो आधी श्वास पूर्णतः छातीत भरून घेऊन मग एका श्वासात वाजवावा.
१ ई. शंखध्वनी करतांना तो लहानापासून मोठ्या ध्वनीकडे न्यावा आणि तिथेच सोडावा.
२. शंखनाद झाल्यानंतर आरती म्हणायला प्रारंभ करावा.
‘भगवंत प्रत्यक्ष समोर आहे आणि मी त्याची आळवणी करत आहे’, या भावाने आरती म्हणावी.
२ अ. आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी.
२ आ. आरती म्हणतांना शब्दोच्चार अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य असावेत.
३. आरती म्हणत असतांना टाळ्या वाजवाव्यात.
३ अ. प्राथमिक अवस्थेतील साधक : ताल धरण्यासाठी टाळ्या हळुवारपणे वाजवाव्यात.
३ आ. पुढच्या अवस्थेतील साधक : टाळ्या न वाजवता अंतर्मुखता साधण्याचा प्रयत्न करावा.
४. आरती म्हणत असतांना टाळ्यांच्या जोडीला वाद्ये वाजवावीत.
४ अ. घंटा मंजुळ नादात (आवाजात) वाजवावी आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे.
४ आ. टाळ, झांज, पेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावी.
५. आरती म्हणत असतांना देवाला ओवाळावे.
५ अ. तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकृती फिरवावे.
५ आ. आरती ओवाळतांना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये, तर देवाच्या अनाहत ते आज्ञा चक्रापर्यंत ओवाळावी.
६. प्रार्थना
‘घालीन लोटांगण’ ही प्रार्थना म्हणावी.
७. कापूर-आरती करावी.
‘यानंतर ‘कर्पूरगौरं करुणावतारं’ हा मंत्र म्हणत कापूर-आरती करावी.
८. कापूर-आरती ग्रहण करावी
कापूर-आरती ग्रहण करावी, म्हणजे ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून पाठी मानेपर्यंत फिरवावा. (काही कारणास्तव कापूर-आरती केली नसल्यास पूजेसाठी लावलेल्या तुपाच्या निरांजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी.)
८ अ. देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा.
८ आ. त्यानंतर पूजकाने देवतेला प्रदक्षिणा घालाव्यात.
८ इ. यानंतर दोन्ही हातांच्या ओंजळीत फुले घेऊन उपास्यदेवतेचा (उदा. श्रीकृष्णाचा ‘कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने…….’ हा) श्लोक म्हणावा. मग ओंजळीतील फुले देवतेच्या चरणी अर्पण करावीत.
८ ई. आरती झाल्यानंतर पुढील श्लोकांच्या माध्यमातून प्रार्थना आणि क्षमायाचना करावी.
आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर ॥
मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे ॥
अपराधसहस्राणि क्रियन्तेऽहर्निशं मया ।
दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर ॥
अर्थ : मला तुझे आवाहन आणि अर्चन, तसेच ‘तुझी पूजा कशी करावी ?’, हेही ज्ञात नाही. पूजा करतांना काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर. हे देवा, मी मंत्रहीन, क्रियाहीन आणि भक्तीहीन आहे. मी तुझी पूजा केली आहे, ती तू परिपूर्ण करवून घे. दिवस-रात्र माझ्याकडून कळत-नकळत सहस्रो अपराध घडतात. ‘मी तुझा दास आहे’, असे समजून मला क्षमा कर.
८ उ. नंतर देवतांच्या नावांचा जयघोष करावा.
८ ऊ. त्यानंतर उजव्या हाताच्या मध्यमेने स्वतःला भ्रूमध्यावर विभूती (उदबत्तीची राख) लावावी.
आरती करतांना एकारतीने ओवाळावे कि पंचारतीने ?
पंचारती हे अनेकत्वाचे, म्हणजेच चंचलरूपी मायेचे प्रतीक आहे. आरती ओवाळणारा नुकताच साधनेला प्रारंभ केलेला प्राथमिक अवस्थेतील साधक (५० टक्क्यांपेक्षा अल्प आध्यात्मिक पातळी असलेला) असल्यास त्याने देवीला ओवाळतांना पंचारतीने ओवाळावे.
एकारती हे एकत्वाचे प्रतीक आहे. भाव असलेल्या आणि ५० टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकाने देवीला एकारतीने ओवाळावे.
७० टक्क्यांपेक्षा जास्त पातळी असलेला आणि अव्यक्त भावात प्रवेश केलेला उन्नत जीव स्वतःतील आत्मज्योतीनेच देवीला अंतर्यामी न्याहाळतो. आत्मज्योतीने ओवाळणे, हे एकत्वातील स्थिरभावाचे प्रतीक आहे.
विविध देवतांची उपासना करण्यामागील गूढार्थ समजून घेण्यासाठी तसेच उपयुक्त माहिती जाणून त्याची भक्ती भावपूर्ण केल्यास आपल्याला त्याचा अधिक लाभ होतो. यासाठी अशी उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी…
सनातन संस्थेच्या ऑनलाइन सत्संगात सहभागी व्हा !
‘सूर्योदयाच्या वेळी रात्रीच्या रज-तमात्मक वातावरणाचा लय होऊन ब्रह्मांडात देवतांच्या तेजतत्त्वात्मक लहरींचे आगमन होते. त्यांचे स्वागत म्हणून सकाळच्या वेळी देवपूजा करून आरती करावी. सूर्योदयाच्या वेळी देवतांच्या लहरींचे आगमन होत असतांना प्रक्षेपित होणार्या तारक चैतन्याचे स्वागत जिवाने आरतीच्या माध्यमातून करायचे असते, तर सूर्यास्ताच्या वेळी रज-तमात्मक लहरींचे उच्चाटन करण्यासाठी देवतांच्या मारक चैतन्याची आवाहनात्मक आराधना जिवाने आरतीच्या माध्यमातून करावयाची असते. यासाठी सकाळच्या वेळी आणि सायंकाळच्या वेळी, अशी दोन वेळा आरती करावी.
सायंकाळची आरतीही पूजकाने स्नान आणि देवपूजा झाल्यावरच करावी. ज्यांना सायंकाळी स्नान करून पूजा करणे शक्य नाही, त्यांनी हात-पाय धुऊन देवापुढे दिवा आणि उदबत्ती लावावी. नंतर आरतीऐवजी श्लोक, तसेच स्तोत्रे म्हणावीत. बहुतांश श्लोक आणि स्तोत्रे ऋषिमुनींनी किंवा संतांनी रचलेली असल्यामुळे ती भावपूर्ण म्हटल्यास त्यांचाही आरती केल्याप्रमाणे लाभ होण्यास साहाय्य होते.
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.६.२००५, सायं. ६.३३)
सूर्यास्ताच्या वेळी सूर्याच्या किरणांतील तेजतत्त्वाचे प्रमाण घटू लागल्याने वायूमंडलातील रज-तम कणांचे प्राबल्य वाढते, तसेच रज-तमात्मक लहरींच्या निर्मितीचे प्रमाणही वाढते. या संधीचा लाभ उठवून वाईट शक्ती वातावरणातील आपला संचार वाढवतात. अशा रज-तमात्मक वायूमंडलाचा त्रास होऊ नये, यासाठी आरतीच्या माध्यमातून प्रक्षेपित होणार्या नादलहरींतून देवतांच्या लहरींना आवाहन करून त्यांना ब्रह्मांडकक्षेत आणणे आवश्यक असते. आरतीमुळे वायूमंडलात देवतांच्या चैतन्यमय लहरींचे प्रमाण वाढून त्रासदायक स्पंदनांचे प्रमाण घटते आणि जिवाच्या देहाभोवती संरक्षक-कवच निर्माण होते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.६.२००५, सायं. ६.३३)
wah
नमस्ते