संत, धर्माचार्य आणि शंकराचार्य हेच राममंदिराची उभारणी करणार ! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती

shankaracharya_Swaroopanand_Saraswatiवाराणसी : राममंदिराची उभारणी कोणतेही सरकार करणार नाही. त्याची उभारणी संत, धर्माचार्य आणि शंकराचार्य हेच करतील, असे प्रतिपादन द्वारका आणि ज्योतिष पिठाचे  शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी येथे केले.

शंकराचार्य पुढे म्हणाले, धनुष्यबाण हातात घेतलेल्या भगवान श्रीरामाचे चित्र दाखवून अयोध्येत राममंदिर बनवण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत; परंतु अयोध्येत श्रीरामाचा जन्म झाल्याने तेथे बालक रामाचीच स्थापन केली जाईल.

नोटाबंदीचा काळ्या पैशांवर परिणाम नाही !

नोटाबंदीविषयी पत्रकारांनी प्रश्‍न विचारल्यावर शंकराचार्य म्हणाले, आतंकवाद, बनावट नोटा, भ्रष्टाचार आणि काळा पैसा समाप्त करण्याचा दावा करत नोटाबंदीचे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले; मात्र याचा काळ्या पैशांवर कोणताही परिणाम झालेला नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात