सोपी आध्यात्मिक कोडी – भाग २

साधना करणे चालू केल्यावर साधकाला टप्प्या टप्प्याने सूक्ष्म ते सूक्ष्मतम स्पंदने कळू लागतात. एखाद्यामध्ये जिज्ञासा असल्यास किंवा त्याने सूक्ष्मातील (पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील) जाणण्याचा सराव केल्यास पुढच्या पातळीची सूक्ष्म स्पंदने कळू लागतात. वाचकांची सूक्ष्मातील कळण्याची क्षमता विकसित करणे, हा अध्यात्मिक सोपी कोडी या सदराचा उद्देश आहे.

या सदरात प्राथमिक स्तरावरील सोपी कोडी दिली असल्यामुळे सर्व वाचकांना ती करता येतील. या प्रकारे चांगले, अधिक चांगले आणि वाईट यांच्यातील भेद कळू लागला की, जीवनातील प्रत्येक गोष्टीतच अधिक चांगले (सात्त्विक) काय आहे, ते वापरण्याकडे वाचकांचा कल राहील. उदा. स्वत:साठी काळ्या रंगाचे कपडे वापरण्याऐवजी फिकट पिवळ्या अथवा निळ्या रंगाचे कपडे वापरणे अधिक चांगले आहे, हे कळेल. असे प्रत्येकच गोष्टीत होऊन एकूणच जीवनाकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन मिळेल आणि जीवन आनंदी होण्यास साहाय्य होईल.

देवाला प्रार्थना करून आणि मन एकाग्र करून प्रयोग केल्यास योग्य उत्तर येण्याचे प्रमाण वाढेल.

 

प्रयोग

om

डावीकडून उजवीकडे सावकाश दृष्टी फिरवत प्रत्येक ॐ कडे पाहिल्यावर काय जाणवते, त्याचा अभ्यास करा. मन एकाग्र करण्यासाठी आवश्यक असल्यास एका ॐ कडे पाहतांना ॐ च्या इतर आकृत्या कोर्‍या कागदाने झाकून ठेवा. असे २ – ३ वेळा करा.

 

प्रयोगाचे उत्तर

१ आ १ आ. प्रयोगाचे उत्तर

डावीकडून उजवीकडे लहान होत गेलेल्या ॐ कडे पाहून अधिकाधिक चांगले वाटते.

१ आ १ इ. विश्‍लेषण

अध्यात्मातील सिद्धांतानुसार स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असते. त्यामुळे डावीकडील मोठ्या ॐ पेक्षा उजवीकडचे लहान होत जाणारे ॐ जास्त चांगले वाटतात. सर्वांत लहान दिसणार्‍या ॐ कडे पाहिल्यावर सगळ्यांत चांगले वाटते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात