आध्यात्मिक सोपी कोडी (उत्तरांसह) या सदरात चांगले जाणवणे आणि त्रास जाणवणे यांत बराच भेद असलेली कोडी दिली आहेत. येथे चांगले जाणवणे आणि त्रासदायक जाणवणे यांची तुलना न करता चांगले जाणवणे आणि थोडेसे अधिक चांगले जाणवणे, तसेच त्रासदायक जाणवणे आणि थोडेसे अधिक त्रासदायक जाणवणे, यांची तुलना करण्याचे प्रयोग दिले आहेत. त्यांची उत्तरे योग्य यायला लागली की, जीवनातील प्रत्येक गोष्टीतच अधिक चांगले काय, ते वापरण्याकडे कल राहील, उदा. काळ्या रंगाऐवजी पिवळ्या अथवा निळ्या रंगाचे कपडे स्वतःसाठी वापरणे जास्त चांगले, हे कळेल. त्यामुळे जीवन आनंदी होण्यास साहाय्य होईल.
१. डोळ्यांनी करावयाचे प्रयोग
१ अ. डावीकडून उजवीकडे अस्पष्ट होत गेलेला ॐ
१ अ १. प्रयोग : अक्षरांवरून डावीकडून उजवीकडे सावकाश नजर फिरवत प्रत्येक ॐ कडे पाहिल्यावर काय जाणवते, त्याचा अभ्यास करा. असे १ – २ मिनिटे करा. मन एकाग्र करण्यासाठी आवश्यक असल्यास एका ॐ कडे पहातांना इतर आकृत्या कोर्या कागदाने झाकून ठेवा.
प्रयोगाचे उत्तर
अस्पष्ट होत गेलेल्या ॐ कडे पाहून अधिकाधिक चांगले वाटते.
विश्लेषण
अस्पष्ट होत जाणारे ॐ जास्त चांगले वाटतात; कारण ते निर्गुणाच्या अधिकाधिक जवळ जातात. त्यामुळेच सर्वांत अस्पष्ट दिसणार्या ॐ कडे पाहिल्यावर सगळ्यांत चांगले वाटते.