
‘१२.१२.२०१६ या दिवशी चेन्नई येथे झालेल्या चक्रीवादळाने आपत्काळ निर्माण झाला होता. त्याच कालावधीत रामनाथी आश्रमात ‘कार्तिक दीपम्’च्या निमित्ताने विधी चालू असल्याने सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी चेन्नई येथील साधकांची विचारपूस करण्यासाठी आणि ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधकांवर लक्ष आहे’, हा साधकांना आश्वस्त करणारा निरोप देण्यासाठी कु. प्रियांका जोशी यांना चेन्नई येथील साधिका सौ. उमा रवीचंद्रन (उमाक्का) यांना संपर्क करण्यास सांगितले. महर्षींच्याच कृपेने त्यांचा संपर्क झाला. त्या वेळी बोलतांना उमाक्का म्हणाल्या, ‘‘चेन्नईत माहितीजाल (इंटरनेट), भ्रमणभाष इत्यादी सर्व संपर्कयंत्रणा वादळामुळे ठप्प झाल्या आहेत. मी बराच वेळ साधकांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते; पण संपर्क होत नव्हता. केवळ तुझाच भ्रमणभाष लागला.’’ निरोप ऐकून उमाक्कांचा भाव जागृत होऊन त्यांना संत, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि महर्षि यांच्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटली. संपर्कयंत्रणा पूर्णपणे बंद असतांना आपत्काळात संपर्क करता येणे, ही केवळ महर्षि आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचीच कृपा ! साधकांनो, ‘येणार्या घोर आपत्काळात देवच साधकांचे रक्षण करणार आहे’, हे चेन्नई येथे आलेल्या आपत्काळातून लक्षात येते. देवाला आपले रक्षण करावे, असे वाटण्यासाठी आपली साधना आणि देवावरील भक्ती वाढवा.’
– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.१२.२०१६)
चेन्नईतील साधकांनी संत सांगत असलेला आपत्काळ प्रत्यक्ष अनुभवणे
आणि केवळ साधनेमुळे आपत्काळात स्थिर राहू शकत असल्याची अनुभूती घेणे

‘१२.१२.२०१६ या दिवशी ताशी १२० किलोमीटर वेगाने वहाणारे ‘वरदा’ हे चक्रीवादळ चेन्नई किनारपट्टीवर धडकले. या आपत्काळात चेन्नई येथील साधकांनी देवाची कृपा अनुभवली. संत आणि महर्षि यांच्या सांगण्यानुसार पुढील काळात अशा प्रकारच्या अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. ‘तीव्र साधना करून देवाच्या साहाय्याने कोणत्याही आपत्काळात तरून पुढे जाता येवो’, ही भगवान श्रीकृष्ण, परात्पर गुरु डॉ. आठवले आणि महर्षि यांच्या चरणी अनन्यभावे प्रार्थना !
१. संतांच्या सांगण्यानुसार आपत्काळात प्रसंग घडणे
चक्रीवादळाने निर्माण झालेल्या या आपत्काळात सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ सत्संगामध्ये सांगत असलेल्या वाक्यांची आठवण होत होती. सद्गुरु ताई सांगायच्या, ‘‘पुढे एवढा आपत्काळ येणार आहे की, त्या वेळी सत्संग मिळेल, सेवा करता येईल, अशी स्थिती नसेल.’’ प्रत्यक्षातही आम्ही अगदी तशीच स्थिती अनुभवली. वादळामुळे संपर्कयंत्रणा ठप्प झाली होती. इंटरनेट नसल्याने सत्संग मिळत नव्हता, तर संपर्क करण्यातही अडचणी येत होत्या.
२. देवाच्या कृपेमुळे साधक शिकण्याच्या स्थितीत आणि स्थिर असणे
१३.१२.२०१६ या दिवशी असलेल्या दत्तजयंतीच्या निमित्ताने काही उपक्रमांचे नियोजन केले होते; पण वादळामुळे त्या सेवा करता आल्या नाहीत. देवाच्या कृपेने या कठीण प्रसंगातही साधक शिकण्याच्या स्थितीत होते. साधक स्थिरही होते. या प्रसंगात सेवा करता न आल्यानेे इतर वेळी मिळत असलेल्या सेवेच्या संधीविषयी कृतज्ञता वाटली.
३. सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू यांनी साधकांची विचारपूस करून त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवणे
चक्रीवादळाच्या कालावधीत सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू आमच्या समवेत होत्या. त्या मध्ये मध्ये ‘‘साधक कसे आहेत ?’’, असे विचारत होत्या. त्यांची कृपादृष्टी साधकांवर होती.
४. साधकांचे रक्षण होणार असल्याचे सांगून महर्षींनी साधकांना आश्वस्त करणे
त्याच कालावधीत झालेल्या एका यज्ञाच्या वेळी महर्षींनी सांगितले, ‘आम्ही साधकांची काळजी घेऊ.’ याच काळात प्रतिवर्षीप्रमाणे तमिळनाडूत ‘कार्तिक दीपम्’ हा धार्मिक विधी होता. चक्रीवादळामुळे मानवी हानी होणार असली, तरी ‘कार्तिक दीपम्’मुळे साधकांचे रक्षण होणार असल्याचे सांगून महर्षींनी साधकांना आश्वस्त केले होते.’
– श्री. श्रीराम लुकतुके, चेन्नई (१७.१२.२०१६)