ठाणे : येथे दत्तजयंतीनिमित्त ३३ ठिकाणी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. त्यांपैकी काही ठिकाणच्या प्रदर्शनांना विविध मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांनी भेटी दिल्या.
- ठाणे, नौपाडा येथील विठ्ठल सायंन्ना दत्त मंदिरातील ग्रंथ प्रदर्शनाला शिवसेनेचे खासदार श्री. राजन विचारे, तसेच कौपिनेश्वर मंदिर ट्रस्टचे सर्वेसर्वा श्री. मा.य. गोखले यांनी भेट दिली.
- कळवा येथील व्हाईट हाऊसमध्ये लावलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला भाजपचे माजी उपमहापौर श्री. अशोक भोईर आणि खारेगावचे नगरसेवक श्री. उमेश पाटील यांनी भेट दिली. त्यांनी सनातनचे कार्य चांगले असल्याचे सांगून प्रशंसाही केली.
- माजी विरोधी पक्ष नेते श्री. प्रकाश बर्डे यांनीही नेहमीप्रमाणे ग्रंथप्रदर्शन लावण्यास सहकार्य केले.
- श्री. कळवा येथील ग्रंथ प्रदर्शनाला शिवसेनेच्या नगरसेविका सौ. अनिता गौरी यांनी भेट दिली.
- डोंबिवली येथे एका ठिकाणी धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमानी महिलांनी स्वत:हून ग्रंथ प्रदर्शन लावले. गळ्यात ‘क्रॉस’ घालून आलेल्या एका हिंदूचे महिलांनी प्रबोधन करून त्याला सनातननिर्मित पदकाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर त्याने ‘क्रॉस’ काढून पदक विकत घेऊन गळ्यात घातले.
- कल्याण येथे वाचक सौ. सोनाली भारांबे यांनी त्याच्या कार्यालयात दत्तजयंतीचे महत्त्व सांगितले. त्यांचे पती श्री. भारांबे यांनीही त्यांच्या कार्यालयातील ग्रंथालयासाठी ग्रंथांची मागणी केली.
- अंबरनाथ येथे ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी धर्मशिक्षणवर्गातील महिला उपस्थित होत्या. सेवेतून मिळणार्या आनंदाने त्या लवकर न निघता शेवटपर्यंत थांबल्या.