दत्त जयंती निमित्त नवी मुंबई, मुंबई, पालघर येथे सनातनने उभारलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचा सहस्रावधी जिज्ञासूंनी लाभ घेतला

  • शिवसेनेचे नेते मनोहर जोशी आणि माजी नगरसेवक अधिवक्ता जगदीश सावंत यांची ग्रंथ प्रदर्शनाला भेट
  • वाय-फाय सुविधेद्वारे ६७ जिज्ञासूंनी केले सनातन पंचांग डाऊनलोड
1
दैनिक सनातन प्रभातविषयी जाणून घेतांना श्री. मनोहर जोशी

मुंबई : दत्त जयंती निमित्त १३ डिसेंबर या दिवशी सनातन संस्थेच्या वतीने मुंबई, नवी मुंबई येथे ५० ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाला सहस्रावधी जिज्ञासूंनी भेट देऊन सनातनचे ग्रंथ खरेदी केले. वरळी सुंदरनगर येथील ग्रंथकक्षावर शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांनी भेट दिली. सनातन संस्थेच्या वतीने त्यांना दैनिक सनातन प्रभात चा दत्तजयंती विशेषांक, तर मंदिर समितीच्या वतीनेही सनातनचा दत्त हा ग्रंथ भेट देण्यात आला. यासह वरळी बी.डी.डी. चाळ येथील ग्रंथप्रदर्शनाला शिवसेनेचे माजी नगरसेवक अधिवक्ता जगदीश सावंत यांनी भेट दिली. त्यांनी सनातनचा लघुग्रंथ घेऊन १५ सनातन पंचांगांची मागणी केली. या वेळी अधिवक्ता जगदीश सावंत यांनी ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी उपस्थितांना उद्देशून हे देवाचे भक्त आहेत आणि मी यांचा (सनातन) चा भक्त आहे, असे सनातनविषयी कौतुकोद्गार काढले. या सर्व ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी पुढील संपर्काच्या दृष्टीने ४५१ जिज्ञासूंनी स्वत:चा संपर्क नोंद केला. ग्रंथप्रदशाच्या ठिकाणी आलेल्या जिज्ञासूंपैकी ६७ जणांनी भ्रमणभाषच्या वाय-फाय सुविधेद्वारे सनातन पंचांग डाऊनलोड करून घेतले. या नाविन्यपूर्ण उपक्रम प्रथमच राबवण्यात आला. विशेष म्हणजे ग्रंथप्रदर्शनाद्वारे होणार्‍या धर्मप्रसाराच्या सेवेत सनातनच्या साधकांसह ७६ धर्माभिमानी आणि दैनिक सनातन प्रभात चे १८ वाचकही सहभागी झाले होते. (अन्य वृत्तपत्रांच्या वाचकांप्रमाणे दैनिक सनातन प्रभात चे वाचक हे केवळ वाचक नसून धर्मकार्यात सहभागी होणारे कृतीशील धर्मप्रचारक आहेत, हे यातून दिसून येते. – संपादक, दैनिक सनातन प्रभात).