१. हिंदु राष्ट्र स्थापन न होण्यातील अडथळे
१ अ. समाजात, श्रीमंती आणि गुंडगिरी करणार्यांना प्रतिष्ठित
व्यक्ती म्हणून गणले जात असलेल्या देशाचा उद्धार कसा होईल ?
आपल्या देशात प्रतिष्ठित व्यक्ती व्हायचे असेल, तर प्रामाणिकपणा, विद्या, बुद्धी, परोपकारी वृत्ती आणि नेतृत्वगुण यांपैकी कोणताही गुण असण्याची आवश्यकता नाही. समाजावर प्रभाव, श्रीमंती आणि गुंडगिरी एवढे असले, तरी पुरे आहे. सर्व जण तुमचा सन्मान करतील. यावरून आपल्या देशातील नागरिक किती बुद्धीमान आहेत !, याची जाणीव होते. एखादा गुंड अथवा खुनी निवडणुकीला उभा राहिला आणि तो कारावासात असला, तरी त्याला सर्व जण मतदान करून निवडून देतात. याला काय म्हणावेे ? असे मतदार असलेल्या देशाचा उद्धार कसा होईल ?
१ आ. नागरिकांमध्ये प्रामाणिकपणा आणि देशप्रेम नसेल, तर देशाचा विकास होणे अशक्य !
देशाचा विकास व्हायचा असेल, तर नागरिकांमध्ये प्रामाणिकपणा, देशप्रेम, वैचारिक क्षमता, बुद्धी आणि शक्ती असायला हवी. कुणी एक राजकारणी विकासासाठी लढा देत असला, तरी नागरिकांमध्ये प्रामाणिकपणा आणि देशप्रेम नसेल, तसेच शासनाच्या नीतीनियमांचे जनसामान्य पालन करत नसतील, तर देशाचा विकास वा उद्धार होणे शक्य नाही.
१ इ. भ्रष्टाचार नसानसांत मुरलेले बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी !
भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्यासाठी आणि काळे धन बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदी आणली आणि त्याच्या दुसर्याच दिवशी लोकांनी नवीन नोटांचा संग्रह करण्यास प्रारंभ केला. त्यांना सहकार्य करणारे आणि शासनाकडून वेतन घेऊन पैशांचा व्यवहार करणारे बँकवालेच होते. या नोटा पालटतांनाही लोकांनी भ्रष्टाचार केला.
२. साधनेनेच गुणसंपन्न नागरिक घडणार असणे
आणि हिंदु राष्ट्र स्थापन झाल्यावरच हे शक्य होणार असणे
देशाचा उद्धार करायचा असल्यास आधी देशाच्या नागरिकांमध्ये प्रामाणिकपणा, देशप्रेम, वैचारिक क्षमता आदी गुण आलेे पाहिजेत. ते गुण अंगी बाणवण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान मिळवून साधना केली पाहिजे आणि हे हिंदु राष्ट्र (सनातन धर्मराज्य) स्थापन झाल्यावरच शक्य होईल. त्यासाठी सर्व राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनी एकत्र येऊन लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करूया !
– श्री. श्रीनिवास शेट्टीगार, नेरूळ, नवी मुंबई.
स्वतंत्र भारताची सत्तर वर्षांनंतरची दुःस्थिती आणि हिंदु राष्ट्र्राची अपरिहार्यता !
३. स्वातंत्र्यासाठी भारतियांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा देणे; आता
मात्र आपल्याच लोकांचा विरोध करण्याची वेळ आली असणे
‘नुकताच भारताचा ७० वा स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा करण्यात आला. त्या वेळी ‘खर्या अर्थाने आपला देश स्वतंत्र झाला आहे का ?’, ‘आपण खरंच स्वतंत्र आहोत का ?’, असे प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले. आधी भारतीय जनतेला ब्रिटिशांनी दास्यत्वात (गुलामगिरीत) ठेवले. आता आपले राजकारणी जनतेला दास्यत्वात ठेवत आहेत. स्वातंत्र्यासाठी भारतियांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिला; परंतु आज आपल्याला आपल्याच लोकांचा विरोध करण्याची वेळ आली आहे. देशात उघडपणे भ्रष्टाचार आणि गुंडगिरी चालू आहे; परंतु कुणीही त्याविरुद्ध चकार शब्दही काढत नाही. उलट आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून जनता स्वतःला दास्यत्वात ठेवून दिवस कंठत आहे.
४. कुठे अपराध्यांना कठोर शासन करणारे
पूर्वीचे राजे, तर कुठे ‘प्रजेला कसे लुटता येईल’
या ध्येयाने प्रयत्न करणारे आताचे राजकारणी !
५. सैनिकांना कवडीचीही किंमत
नसल्याप्रमाणे वागवणारे शासन !