त्याग आणि सेवाभाव यांचे मूर्तीमंत उदाहरण असलेले अन् संसारात राहून साधना करून संतपद प्राप्त करणारे रायगड येथील पू. अनंत (तात्या) पाटील !

anant_patil_clr
पू. अनंत (तात्या) पाटील

रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे रहाणारे पू. अनंत (तात्या) पाटील हे वर्ष २०१६ च्या गुरुपौर्णिमेला संतपदी विराजमान झाल्याचे घोषित करण्यात आले. ते ८३ वर्षांचे आहेत. ते वर्ष १९९४ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. सध्या ते समष्टीसाठी नामजप करतात. ते आदर्श कुटुंबप्रमुख आहेत. त्यांनी संसारात राहून साधना केली. आज कार्तिक पौणिमेला (१४.११.२०१६) त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त नागोठणे येथील साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहेत.

पू. अनंत (तात्या) पाटील यांना
वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार

१. पूर्वसूचना

तात्या संतपदी विराजमान झाले असावेत, असे जाणवणे : उज्जैन येथील सिंहस्थ पर्वातील सेवेहून आल्यानंतर मी जून २०१६ मध्ये पू. तात्यांना भेटलो. तेव्हा ते संतपदी विराजमान झाले असावेत, असे मला जाणवले होते. – श्री. जगन्नाथ जांभळेगुरुजी

२. व्यवस्थितपणा

पू. तात्यांनी त्यांची दैनिक सनातन प्रभातच्या अहवालाची वही मला दिली. ती इतकी नीटनेटकी होती की, मला कधी कुठलीच अडचण आली नाही.

३. इतरांचा विचार

पू. तात्यांकडे दैनिक सनातन प्रभातची वर्गणी कधीच मागावी लागली नाही. ते वर्गणी स्वतः आणून द्यायचे. – श्री. आनंद उपाध्ये

४. प्रसारकार्याची तळमळ

पू. तात्यांनी पोलादपूर, बिरवाडी, महाड, माणगाव, नागोठणे, पनवेल, कळंबोली, रसायनी आणि कर्जत या सर्व गावांत स्वतः फिरून प्रवचने केली. – श्री. जगन्नाथ जांभळेगुरुजी

५. साधकांना परिपूर्ण सेवा शिकवणे

पू. तात्यांनी मला ग्रंथ प्रदर्शन कसे लावायचे ? वेळेचा सदुपयोग नामजप करण्यासाठी कसा करायचा ? एखादा कार्यक्रम असल्यास स्वयंपाक किती आणि कसा करायचा ? स्वयंपाकाचा अंदाज कसा घ्यायचा ? किती सामान आणायचे ?, हे सर्व शिकवले. – सौ. वर्षा रावकर

६. प.पू. डॉक्टरांवर दृढ श्रद्धा

अ. प.पू. डॉक्टरच सर्व करतात. आपण केवळ निमित्त आहोत, अशी पू. तात्यांची दृढ श्रद्धा आहे. ते नागोठणे येथील प.पू. डॉक्टरांच्या जन्मस्थानातील सेवा भावपूर्ण करतात. – श्री. जगन्नाथ जांभळेगुरुजी

आ. प.पू गुरुदेवांविषयी बोलतांना त्यांच्या डोळ्यांत अश्रू येतात. – सौ. वर्षा रावकर

७. सतत भावावस्थेत असणे

पू. तात्या सतत भावावस्थेत असतात. त्यांची कधीही कोणत्याच गोष्टीविषयी तक्रार नसते. सौ. काकूंचे निधन झाल्यावरही ते शांत आणि स्थिर होते. – सौ. वर्षा रावकर

८. साधकांचीही उन्नतीची तळमळ
असल्याने साधकांचे आधारस्तंभ बनलेले पू. तात्या !

मी पू. तात्यांना सनातनचा अंगफलक आणि टोपी घालून नागोठण्यात प्रसार करतांना पाहिले आहे. एकदा मी त्यांच्याकडून दैनिक सनातन प्रभात घेतले आणि नंतर सत्संगाला जाऊ लागलो. त्यांच्यामुळे मी संस्थेशी जोडला गेलो आणि दैनिक सनातन प्रभातच्या वितरणाची सेवा करू लागलो. आपल्यासमवेत अन्य साधकांचीही उन्नती व्हावी, अशी त्यांना तळमळ असते. साधनेत सातत्य ठेवून प्रत्येक गोष्ट वेळेत आणि भावपूर्ण कशी करायची, हे पू. तात्यांनी आम्हाला शिकवले. पू. तात्यांनी संतपद गाठले, ही आम्हा सर्व साधकांना अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ते आम्हा सर्व साधकांचे आधारस्तंभ आहेत. ते नागोठणे केंद्रात आहेत, ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. – श्री. श्रीकांत देशपांडे

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात