१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन झाले. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली. त्यांनी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.
१. अशा आश्रमाच्या उभारणीची कल्पना हे दिवास्वप्न आणि
अशक्य वाटते, असा आश्रम केवळ दैवी कृपेनेच उभारला जाऊ शकतो.
– अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, अध्यक्ष, संस्थापक आणि विश्वस्त, बुद्धीमत्ता समुह के साथ भारत, वाराणसी, उत्तरप्रदेश. (२०.६.२०१६)
२. या आश्रमाच्या कणाकणातून हिंदुत्वाची स्फूर्ती मिळते !
हा आश्रम बघून मी आध्यात्मिक विश्वात प्रवेश करत आहे, असे वाटले. या आश्रमात येणार्यांना हिंदुत्वाची स्फूर्ती मिळते. या आश्रमाच्या कणाकणांतून हिंदुत्वाची स्फूर्ती मिळते.
– अधिवक्ता के.वी. रमणामुर्थी, रंगा रेड्डी, तेलंगण. (२०.६.२०१६)
३. आश्रमात मानव कल्याणासाठी नवनवीन
आध्यात्मिक शोध सतत चालू असल्याने समाधान वाटले !
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रम आवारात आल्याबरोबर चैतन्याचा अनुभव येतो. येथील सर्व साधक सेवावृत्तीने सेवा करत असल्यामुळे येथील स्पंदने चांगली वाटतात. येथे मानव कल्याणासाठी नवनवीन आध्यात्मिक शोध सतत चालू असल्याने समाधान वाटले.
– श्री. प्रशांत ज्ञानेश्वर पाटील, अकोला, महाराष्ट्र. (२४.६.२०१६)
४. आश्रम पाहिल्यावर मीसुद्धा माझ्या
क्षमतेनुसार धर्मासाठी योगदान दिले पाहिजे, असे वाटले !
आश्रम पाहून मला आनंद वाटला. माझे मन प्रसन्न झाले. येथील सर्व साधक पुष्कळ शिस्तप्रिय आहेत. सगळे जण आपापल्या परीने धर्मासाठी योगदान देत आहेत. मलासुद्धा हे पाहून वाटते, मीसुद्धा माझ्या क्षमतेनुसार धर्मासाठी योगदान दिले पाहिजे.
– अधिवक्ता सचिन नामदेव पोटे, पुणे, महाराष्ट्र. (२४.६.२०१६)
५. आश्रमामध्ये आल्यावर आपण एका वेगळ्या विश्वात आलो आहोत, असे वाटले !
आश्रमातील नीटनेटकेपणा आणि प्रत्येक साधक आत्मीयतेने करत असलेली सेवा पाहून मनाला पुष्कळ शांतता वाटली. आश्रमामध्ये आल्यावर आपण एका वेगळ्या विश्वात आलो आहोत, असे वाटले.
– श्री. किरण पुंडलिक पाटील, अध्यक्ष, जय श्रीराम ग्रुप, जळगाव, महाराष्ट्र. (२४.६.२०१६)
६. आश्रम पाहिल्यावर माझ्यातील धार्मिक बळ
वाढून मीसुद्धा धर्मासाठी काहीतरी केले पाहिजे, असे वाटले !
मी आश्रमात प्रवेश केल्याबरोबर माझ्यात एक प्रकारचे चैतन्य आल्यासारखे वाटले आणि संपूर्ण आश्रम पाहिल्यावर माझ्यात धार्मिक बळ वाढले आणि मीसुद्धा धर्मासाठी काहीतरी केले पाहिजे, असे मला वाटले.
– अधिवक्ता उमाशंकर एफ्. मेगुंडी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बेंगळुरू, कर्नाटक. (२०.६.२०१६)
७. आश्रमातील वातावरण पुष्कळ शांत आणि प्रसन्न आहे !
आश्रमामधील शांततेमुळे माझ्या मनाला हलके वाटले. माझे मन पुष्कळ प्रसन्न झाले. आश्रमामधील सर्व साधक पुष्कळ शांत आणि प्रसन्न दिसत होते. आश्रमामध्ये पुष्कळ शांत आणि प्रसन्न वातावरण आहे.
– श्री. सुनील ज्ञानेश्वर शहाणे, अध्यक्ष, श्रीराम मित्र मंडळ, यवतमाळ, महाराष्ट्र. (२३.६.२०१६)
८. मला आतापर्यंत इतके प्रसन्न कधीच वाटले नव्हते,येथील साधकांमधील लीनता
पाहून मला प्रसन्नता वाटली. सर्व साधक आणि हिंदू असे झाले, तर लवकरच हिंदु राष्ट्र निर्मिती होईल.
– श्री. कैलास विनायकराव कुर्हाडे, उपाध्यक्ष, धर्मयोद्धा संघटना, संभाजीनगर, महाराष्ट्र. (२४.६.२०१६)
९. आश्रम पाहून माझ्या जीवनाचे सार्थक झाले !
आश्रम पाहून मला पुष्कळ आनंद आणि प्रसन्नता वाटली. माझे मन निर्विचार झाले. आश्रमात पुष्कळ सात्त्विकता जाणवली. चैतन्य मिळाले. सर्व साधक-साधिकांकडे पाहून आदर आणि प्रेमभाव जाणवला. संपूर्ण आश्रमात मला पुष्कळ पावित्र्य, थंडावा आणि शांती अनुभवास आली. माझ्या जीवनाचे सार्थक झाले.
– श्री. प्रसाद श्रीराम काळे, नालासोपारा, पालघर. (२४.६.२०१६)
१०. आश्रम पाहून मला माझ्या मनातील वाईट शक्तीपासून
सुटका झाल्यासारखे वाटले आणि माझ्या मनाची सकारात्मकता वाढली !
सनातनच्या आश्रमात प्रथमच आल्यामुळे मला पुष्कळ आनंद झाला. आश्रम पाहून मला माझ्या मनातील वाईट शक्तीपासून सुटका झाल्यासारखे वाटले आणि मनाची सकारात्मकता वाढल्याचे जाणवले.
स्वागतकक्षातील श्रीकृष्णाचे चित्र पाहिल्यावर त्यात सकारात्मकता जाणवली.
– श्री. अभिषेक रमेश परदेशी, सदस्य, स्वा. सावरकर युवा मंच, महाराष्ट्र. (१३.६.२०१७)
११. रामनाथी आश्रमात साक्षात भगवान श्रीकृष्ण विराजमान आहेत !
‘आश्रमात पुष्कळ चांगले वाटले. ‘ईश्वराचे वास्तव्य असल्यामुळे अनिष्ट काय आहे ?’, हे समजू शकले. कर्मप्रधान माहिती येथे मिळाली. साक्षात भगवान श्रीकृष्ण येथे विराजमान आहे. येथे सेवा करणारे साधक परिपूर्ण आहेत. जो कोणी येथे एकदा आला, त्याला दुसरीकडे कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. येथील साधक दुसर्यांसाठी जगत आहेत.’
– परम पूज्य भागिरथी महाराज, संस्थापक अध्यक्ष, श्री गुरुकृपा आश्रम सेवा संस्थान, नागपूर, महाराष्ट्र. (३०.५.२०१९)
१२. हिंदु संस्कृती आणि धर्मग्रंथ यांचा सन्मान करून रामराज्य
बनवण्याचे निमित्त असलेला रामनाथी आश्रम पाहून अभिमान वाटला !
‘रामनाथी आश्रम पुष्कळ विस्मयकारक वाटला. आश्रमात दैवी शक्ती जाणवली. आमच्या ऋषिमुनींच्या भारताची प्रचीती आली. ‘हिंदु संस्कृती आणि आमची पुराणे अन् शास्त्रे यांचा सन्मान करून आपल्या देशात रामराज्य बनवण्याचे निमित्त असलेला आश्रम पाहायला मिळाला’, याचा आम्हाला अभिमान आहे. आश्रम पाहायला मिळाल्यामुळे आमची हिंदु धर्माप्रतीची श्रद्धा अधिक वाढली आहे.’
– पूज्य चंद्रकांत महाराज शुक्ल, समादेशक, शिव-शक्ति सहयोग सेवाश्रम चॅरिटेबल ट्रस्ट, वलसाड, गुजरात. (१.६.२०१९)
१३. रामनाथी आश्रमात पोचताच आतूनच आपोआप
रोमांचित, आध्यात्मिक आणि आल्हाददायक वातावरण अनुभवता येणेे !
‘रामनाथी आश्रमात पोचल्याबरोबर मला एक अनुभूती आली. मी आतूनच आपोआप रोमांचित, आध्यात्मिक आणि आल्हाददायक झालो आहे. येथील साधक ज्या तळमळीने आणि सेवाभावाने प्रेरित आहेत, त्यामुळे विश्वासाने नाही, तर स्वभाव पालटल्याने हिंदु राष्ट्र, म्हणजे रामराज्य स्थापणे शक्य होणार आहे. आपणही या प्रदर्शनातून प्रेरणा घेऊन आपले जीवन पवित्र आणि सात्त्विक बनवायला पाहिजे’, असे मला जाणवले.’