परिणाम अभ्यासण्यासाठी पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेली वैज्ञानिक चाचणी !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक-कलाकारांनी काढलेली सात्त्विक रांगोळी आणि श्री लक्ष्मीदेवीचे सात्त्विक चित्र यांत श्री महालक्ष्मी यंत्राप्रमाणे सकारात्मक स्पंदने पुष्कळ प्रमाणात आहेत, हे दर्शवणारी पिप छायाचित्रे
रांगोळी ही ६४ कलांपैकी एक कला आहे. ही कला घरोघरी पोचली आहे. सणा-समारंभांत, देवळांत आणि घरोघरी रांगोळी काढली जाते. सौंदर्याचा साक्षात्कार आणि मांगल्याची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश आहेत. ज्या ठिकाणी सात्त्विक रांगोळी काढली जाते, त्या ठिकाणी आपोआपच मंगलदायी वातावरणाची निर्मिती होते. हिंदु धर्मातील सर्व सण आणि विधी विविध देवतांशी संबंधित असतात. त्या त्या सणाच्या दिवशी आणि विधीच्या वेळी त्या त्या देवतेचे तत्त्व वातावरणात नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात असते अन् विधीमुळे रांगोळीमध्ये आकृष्ट होते. प्रत्येक सणानुसार त्या-त्या देवतेचे तत्त्व रांगोळीतून अधिक प्रमाणात आकृष्ट होऊन त्याचा सर्वांना लाभ व्हावा, अशा उद्देशाने सनातनच्या साधकांनी संतांच्या मार्गदर्शनाखाली विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्या अनेक सात्त्विक रांगोळ्या सिद्ध केल्या आहेत. या रांगोळ्यांमुळे देवतेचे तत्त्व आकृष्ट आणि प्रक्षेपित झाल्यामुळे तेथील वातावरण त्या तत्त्वाने भारित होऊन त्याचा सर्वांना लाभ होतो. या गोष्टीचा वैज्ञानिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास करण्याच्या उद्देशाने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
१. वैज्ञानिक चाचणी करण्याचा उद्देश
एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत, तो घटक सात्त्विक आहे कि नाही, तसेच तो आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्द प्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक चाचणीद्वारे, म्हणजेच यंत्राने सिद्ध करून दाखवली, तरच ती खरी वाटते.
२. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणारे श्री महालक्ष्मी यंत्र, सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे चित्र आणि रांगोळी यांची छायाचित्रे चाचणीसाठी ठेवण्यापूर्वीच्या अन् ठेवल्यानंतरच्या वातावरणाची घेतलेली पिप छायाचित्रे निवडली आहेत. या तीनही छायाचित्रांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?, हे या चाचणीद्वारे जाणता आले.
३. वैज्ञानिक चाचणीतील घटकांविषयी माहिती
३ अ. श्री महालक्ष्मी यंत्र
यंत्र म्हणजे एक विशिष्ट आकृतीबंध. शेकडो वर्षांपूर्वी आद्य शंकराचार्यांनी विविध देवतांची तत्त्वे आकृष्ट करणारी विविध यंत्रे निर्मिली आहेत. त्यांपैकी श्री महालक्ष्मी यंत्र हे श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करणारे आहे.
३ आ. सनातन-निर्मित श्री लक्ष्मीदेवीचे सात्त्विक चित्र
सनातन संस्थेच्या कलाकार साधिकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार श्री लक्ष्मीदेवीचे चित्र सिद्ध केले आहे. यात अधिक प्रमाणात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व आले आहे.
३ इ. श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व अधिक प्रमाणात असलेली रांगोळी
या रांगोळीमध्ये श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट होते. ही रांगोळी सनातनच्या कलाकार साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली रेखाटली आहे.
४. पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाची ओळख !
या तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या वस्तूची सामान्यपणे डोळ्यांना न दिसणारी अशी रंगीत प्रभावळ (ऑरा) पाहू शकतो. पिप या संगणकीय प्रणालीला व्हिडिओ कॅमेर्याशी जोडून त्याद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांची ऊर्जाक्षेत्रे विविध रंगांत पहाता येतात. यात सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा आहे. त्या रंगांचे विवरण ६ अ या सारणीतील पहिल्या स्तंभात दिले आहे.
५. चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता
अ. या चाचणीची पिप छायाचित्रे घेण्यासाठी विशिष्ट कक्ष (खोली) वापरण्यात आला. या कक्षाच्या भिंती, छत आदींच्या रंगांचा छायाचित्रांच्या प्रभावळीतील रंगांवर परिणाम होऊ नये, यासाठी भिंती, छत आदींना पांढरा रंग दिला होता.
आ. संपूर्ण चाचणीच्या वेळी कक्षातील प्रकाशव्यवस्था एकसारखीच ठेवली होती, तसेच कक्षाबाहेरील हवा, प्रकाश, उष्णता यांचा कक्षातील चाचणीवर परिणाम होऊ नये, यासाठी चाचणीच्या वेळी कक्ष बंदिस्त ठेवण्यात आला होता.
६. निरीक्षणे आणि त्यांचे विवरण
६ अ. पिप छायाचित्रांत दिसणार्या प्रभावळींचे रंग, ते
कशाचे दर्शक आहेत आणि त्यांच्या प्रमाणात होणारी वाढ किंवा घट
चाचणीसाठी छायाचित्र ठेवण्यापूर्वीच्या (मूळ नोंदीच्या) तुलनेत छायाचित्र ठेवल्यानंतरच्या प्रभावळीतील रंगाच्या प्रमाणात वाढ किंवा घट होते. ही वाढ किंवा घट त्या छायाचित्रातून प्रक्षेपित होणार्या त्या रंगाशी संबंधित स्पंदनांच्या प्रमाणानुसार असते, उदा. चाचणीसाठी छायाचित्र ठेवल्यानंतर त्यातून चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण पुष्कळ प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण वाढते, तर चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण न झाल्यास किंवा इतर स्पंदनांच्या तुलनेत अल्प प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण घटते. हे लक्षात घेऊन खालील सारणी वाचावी.
टीप १ : या चाचणीमध्ये आपण एखाद्या घटकामुळे वातावरणात झालेल्या पालटाची नोंद घेतो; पण वातावरणात सातत्याने पालट होत असल्यामुळे घटकाची चाचणी करण्यापूर्वी घटक ठेवणार असलेल्या वातावरणाची नोंद प्रथम घ्यावी लागते. हिला मूळ नोंद म्हणतात. त्यामुळे चाचणीसाठी छायाचित्र ठेवण्यापूर्वीच्या निरीक्षणाची नोंद प्रथम केली.
टीप २ : याच्या प्रभावळीची तुलना मूळ नोंदीशी केली आहे.
टीप ३ : घटकाच्या अंतर्बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता
टीप ४ : मात्र पुष्कळ प्रमाणात पवित्रता आणि थोड्या प्रमाणात चैतन्य यांची स्पंदने प्रक्षेपित झाली, हे सारणीतील सूत्र क्र. १ आणि २ वरून स्पष्ट होते.
६ आ. पिप छायाचित्रांत दिसणार्या विविध रंगांच्या प्रमाणानुसार
आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायी असणार्या स्पंदनांचे प्रमाण (टक्के)
टीप : छायाचित्रांत दिसणार्या विविध रंगांचे प्रमाण ठरवण्यासाठी पिप छायाचित्रावर संगणकीय प्रणालीद्वारे आलेख कागदावर असतात, तशा अनेक चौकटी योजल्या. त्यानंतर छायाचित्रातील एकूण चौकटी आणि त्यांच्या तुलनेत प्रभावळीतील प्रत्येक रंगाने व्यापलेल्या चौकटी यांची संख्या मोजली. या संख्येचे टक्क्यांमध्ये रूपांतर करून प्रभावळीतील प्रत्येक रंगाचे प्रमाण सर्वसाधारणपणे निश्चित केले आहे.
६ इ. निरीक्षणांचे विवरण आणि निष्कर्ष
६ इ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधक-कलाकारांनी काढलेल्या सात्त्विक रांगोळीमध्ये आणि श्री लक्ष्मीदेवीच्या सात्त्विक चित्रात श्री महालक्ष्मी यंत्राप्रमाणे सकारात्मक स्पंदने पुष्कळ प्रमाणात असणे
श्री लक्ष्मीदेवीचे सात्त्विक चित्र हे सनातनच्या साधकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेले असल्याने ते अत्यंत सात्त्विक आहे. त्यामुळे त्यात पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने आहेत, तसेच श्री महालक्ष्मी यंत्रही आद्य शंकराचार्यांनी (अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींनी) बनवले असल्याने त्यातही पुष्कळ सकारात्मक स्पंदने आहेत.
सर्वसाधारणपणे सर्वच रांगोळ्यांमध्ये सकारात्मक स्पंदने नसतात. रांगोळी जेवढी सात्त्विक, तेवढी तिच्यात सकारात्मक स्पंदनांचे प्रमाण अधिक असते. सात्त्विक रांगोळीतील सकारात्मक स्पंदनांचा लाभ रांगोळी काढणारे आणि पहाणारे या दोघांनाही होतो.
येथे चाचणीसाठी निवडलेली रांगोळी ही सनातनच्या साधक-कलाकारांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली काढलेली आहे. ती काढत असतांना त्यात श्री लक्ष्मीदेवीचे तत्त्व अधिकाधिक प्रमाणात आकर्षित होईल, असेच आकृतीबंध वापरले आहेत. त्यामुळे रांगोळीतही श्री लक्ष्मीदेवीचे सात्त्विक चित्र आणि यंत्र यांप्रमाणेच सकारात्मक स्पंदने पुष्कळ प्रमाणात आढळतात. हेच या चाचणीतून स्पष्ट होते.
६ इ २. साधक-कलाकारांमध्ये सूक्ष्म स्पंदने जाणण्याची क्षमता असणे
स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. सात्त्विक रांगोळी विकसित करतांना रांगोळीत देवतेचे तत्त्व येत आहे का ?, हे कळण्यासाठी चित्रकारामध्ये सूक्ष्मातील स्पंदने जाणण्याची क्षमता असावी लागते. ही क्षमता योग्य साधनेने विकसित होते. साधक-कलाकारांमध्ये ती क्षमता असल्याने ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार देवतांची तत्त्वे आकृष्ट करणार्या सात्त्विक रांगोळ्या अन् देवतांची चित्रे सिद्ध करू शकले.
सूचना १ : ही वातावरणातील प्रभावळीची चाचणी असल्याने पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) छायाचित्र क्र. २, ३ आणि ४ यांची तुलना मूळच्या प्रभावळीशी (छायाचित्र क्र. १ शी) करतांना छायाचित्रातील पटल, पुठ्ठा, तसेच चाचणीसाठी ठेवलेले वस्तूचे छायाचित्र यांवरील रंग येथे ग्राह्य धरलेले नाहीत.
सूचना २ : पी.आय.पी छायाचित्रांत रंगांविषयी लिहितांना नकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांविषयी लिखाण तपकिरी रंगात, तर सकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांविषयी लिखाण निळ्या रंगात दिले आहे.
सूचना ३ : पी.आय.पी छायाचित्रात पोपटी किंवा पांढरा (चंदेरी) हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते.
– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (३.९.२०१६)
ई-मेल : [email protected]