सनातनवर बंदी येणे, साधकांचा खोट्या आरोपाखाली नाहक छळ केला जाणे, यांसारखी संकटे तर पुढे कुठच्या कुठे कचर्यासारखी उडून जातील. यापेक्षा आपत्काळात साधकांच्या प्राणरक्षणाकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे, असे महर्षींनी सांगणे
प्रश्न : सध्या समाजातील काही धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही व्यक्ती यांच्याकडून, तसेच राजकारणी व्यक्तींकडून पोलीस प्रशासन आणि न्यायालय यांच्यावर दबाव आणून सनातनवर बंदी आणण्याचे षड्यंत्र मोठ्या प्रमाणात रचले जात आहे. याविषयी काही आध्यात्मिक उपाय करायचे आहेत का ?
महर्षींचे उत्तर : काही करायला नको. सनातनवर बंदी येणे किंवा साधकांचा खोट्या आरोपाखाली नाहक छळ केला जाणे, तसेच सनातनची संकेतस्थळे आणि ईमेल पत्रे यांना अडथळा आणला जाणे, ही संकटे तर पुढे कुठच्याकुठे कचर्यासारखी उडून जातील. आपल्याला खरे प्रयत्न आपत्काळात साधकांचे प्राण वाचवण्यासाठी करायचे आहेत. आता करत असणार्या विधींतून वरील समस्या सुटतीलच; परंतु अधिकतर हे सर्व विधी साधकांभोवती वज्रासारखे कवच निर्माण होण्यासाठी केले जात आहेत. पुढे भयंकर अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. प्रलयासारख्या आपत्तींत साधकांच्या घरांनाही काही होऊ नये, म्हणूनही आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आता सनातनवर बंदी, साधकांना अटक या सर्व संकटांपेक्षा साधकांच्या प्राणांचे रक्षण होणे अधिक महत्त्वाचे आहे.
– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१४.७.२०१६, सकाळी ८.०५)