ईश्‍वर असल्याची साक्ष देणारे चित्तूर (आंध्रप्रदेश) येथील कनिपकम् विनायक मंदिर !

आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात असलेले कनिपकम् विनायक मंदिर हे स्वयंभू गणेशमूर्ती आणि अनेक आख्यायिका यांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे. चोल वंशाच्या राजाने ११व्या शतकात हे मंदिर बांधल्याचे सांगितले जाते. विजयनगरच्या राजाने वर्ष १३३६ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

kanipakamvinayakamandir

ईश्‍वर आहे, याची साक्ष देणारी रोचक कथा या मंदिराविषयी सांगितली जाते. या गावात ३ भाऊ रहात होते. त्यातील एक आंधळा, एक बहिरा आणि एक मुका होता. त्यांचा उदरनिर्वाह छोट्याशा शेतीच्या तुकड्यावर होत होता. एकदा त्यांच्या शेतातील विहिरीतील पाणी आटले. तेव्हा विहीर आणखी खणावी म्हणून एक भाऊ विहिरीत उतरला. तेथे खणतांना त्याच्या पहारीचा घाव एका दगडी मूर्तीवर बसला आणि मूर्तीतून रक्त येऊ लागले. पहाता पहाता रक्त पाण्यात मिसळल्याने या विहिरीचे पाणी लाल झाले. त्याचवेळी या तिन्ही भावांचे अपंगत्व दूर झाले. त्यानंतर गावकर्‍यांनी या गणेशमूर्तीला पाण्याबाहेर काढून तिची पूजा केली. तेव्हापासून ही विहीर कधीच आटली नाही. येथे सापडलेल्या गणेशमूर्तीचा आकार दिवसेंदवस पालटतो आहे. या मंदिरात येऊन विहिरीकडे तोंड करून श्री गणेशाची शपथ घेऊन वादांचा निवाडा केला जातो. म्हणजे श्री गणेशाची शपथ घेईल, त्याचा पक्ष खरा मानला जातो. येथे अट्टल गुन्हेगारही विहिरीतील पाण्यात स्नान केल्यानंतर गुन्ह्याची स्वीकृती देतात आणि पाप मुक्त होतात. या गावात न्यायाची ही पद्धत खात्रीशीर मानली जाते.

संदर्भ : माझा पेपर संकेतस्थळ