मी ए.के. जोशी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहे. एकदा शाळेतील संगीत स्पर्धेत मी भाग घेऊन कॅसिओ हे वाद्य वाजवले. माझ्या संगीत शिक्षकाने सांगितल्याप्रमाणे वाद्य वाजवण्यापूर्वी प्रथम मी नमस्काराची मुद्रा करून प्रार्थना केली. त्यांनी मला दोन्ही हात जोडून अंगठ्याची दोन्ही टोके आज्ञाचक्रावर ठेवून हाताच्या तळव्यात अल्पशी पोकळी ठेवून नमस्कार करायला सांगितले होते. अशा प्रकारे नमस्काराची मुद्रा अनेक वेळा केल्याने माझ्यात चांगले पालट झाले आहेत. मी करत असलेला अभ्यास माझ्या लक्षात राहू लागला. मला संगीत स्पर्धेत दुसरे पारितोषक मिळाले. मला नमस्काराची योग्य मुद्रा केल्यावर मनःशांती मिळत असल्यामुळे माझ्या वयोगटातील सर्व मित्रांना मी तसे करण्यास सुचवतो. – कु. आर्य शांतीलाल निशार, ठाणे (वय १४ वर्षे)
प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात