उत्तराखंड येथील कसारदेवी मंदिराच्या क्षेत्रातील भू-गर्भीय लहरींचे नासाकडून संशोधन !

हिंदूंची मंदिरे चैतन्यस्रोत आहेत, याचे संशोधन विज्ञानवादी नासाला करावेसे वाटते; मात्र तेच अंनिससारख्या तथाकथित विज्ञानवाद्यांना करावेसे वाटत नाही!

kasar-devi-templeअल्मोडा (उत्तराखंड) – जिल्ह्यातील कसारदेवी मंदिराच्या शक्तीमुळे विज्ञानवादी चकीत झाले आहेत. पर्यावरणतज्ञ डॉ. अजय रावत यांनी या मंदिराच्या स्थानाचे अनेक वर्षे संशोधन केले आहे. येथील क्षेत्राच्या भूमीखाली विशाल भू-चुंबकीय दगडी स्तर आहे. यावर विद्युत कणांचे आवरण आहे. ते संपूर्णपणे भारित आहे. त्याद्वारे चुंबकीय लहरी प्रक्षेपित होत आहेत.

गेल्या २ वर्षांपासून अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचे शास्त्रज्ञ या क्षेत्राचे संशोधन करत आहेत. या चुंबकीय दगडी स्तराच्या चुंबकीय लहरींचा मनुष्याच्या मेंदूवर काय परिणाम होतो, याचा हे शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत.

आतापर्यंत करण्यात आलेल्या संशोधनातून कसारदेवी मंदिर आणि दक्षिण अमेरिकेतील पेरू देशातील माचू-पिच्चू, तसेच इंग्लंडच्या स्टोन हेंग येथील स्थानांमध्ये समानता आहे. या तीनही ठिकाणी चुंबकीय शक्ती आहे. डॉ. रावत यांच्या संशोधनात ही चारही ठिकाणे चुंबकीयदृष्ट्या भारित असल्याचे लक्षात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात