
आकुर्डी, ७ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील भवानीमाता मंदिरात नवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने आध्यात्मिक आणि धार्मिक ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले आहे. त्याला भाविकांचा उत्तम प्रतिसाद लाभत असून या निमित्ताने सनातनच्या अनमोल ग्रंथ संपदेचे ज्ञानभांडार भाविकांना खुले झाले आहे. ग्रंथप्रदर्शन कक्षामध्ये धर्मशिक्षणविषयक काही फलकही लावण्यात आले आहेत. ११ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते रात्री १० या वेळेत हे प्रदर्शन चालू रहाणार असून देवीभक्तांनी त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.