देवद (पनवेल) – वारकरी संप्रदायाचे लांजा तालुका अध्यक्ष ह.भ.प. मनोहर सदाशिव रणदिवे यांनी येथील सनातन आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. श्री. आेंकार कापशीकर यांनी त्यांना आश्रमातील सेवांविषयी अवगत केले.
आश्रमातील स्वभावदोष आणि अहं निर्मूलनाच्या अंतर्गत असणारे चुकांचे फलक पाहून या प्रक्रियेचे साधनेत पुष्कळ महत्त्व आहे, असे त्यांनी सांगितले. आश्रमातील टापटीपपणा, शांतता, शिस्तबद्ध नियोजन, पाण्याची केली जाणारी काटकसर हे पाहून त्यांनी साधकांचे कौतुक केले. दैनिक सनातन प्रभातमध्ये बातम्यांना दिल्या जाणार्या संपादकीय टीपा पुष्कळ चांगल्या असतात, असेही ते म्हणाले. तसेच समाजात हिंदूसंघटन नसल्याने आपण यशस्वी होऊ शकत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
सर्व पक्ष आणि संप्रदाय यांनी हेवेदावे विसरून संघटित व्हायला हवे अन् राष्ट्र-धर्म यांसाठी १ घंटा वेळ द्यायला हवा, असे त्यांनी सांगितले.
क्षणचित्र
आश्रमात समोर येणार्या प्रत्येक साधकाला ते नम्रतेने नमस्कार करत होते.
परिचय
गेल्या १० वर्षांपासून ह.भ.प. मनोहर सदाशिव रणदिवे सनातन संस्थेच्या संपर्कात आहेत. ते कीर्तनातून राष्ट्र आणि धर्म यांच्या विषयीची सूत्रे मांडतात.