तूप किंवा तेल नव्हे, तर पाण्याने पेटतो मध्यप्रदेशातील मंदिरातील दिवा !

अंनिसला याविषयी काय म्हणायचे आहे ?

gadiyaghat-mataji

शाजापूर (मध्यप्रदेश) : येथील कालीसिंध नदीच्या काठावर वसलेल्या मंदिरात तूप किंवा तेलाने नव्हे, तर पाण्याने दिवा पेटवला जात असल्याचे समोर आले आहे. गडियाघाटाच्या मातेचे मंदिर असे या मंदिराचे नाव असून गेल्या ५ वर्षांपासून या मंदिरात अखंड दिवा पेटत आहे. कालीसिंध नदीचे पाणी या दिव्यामध्ये घातल्यानंतर पाण्यावर तवंग तयार होतो आणि दिवा पेटतो. मंदिरातील हा चमत्कार केव्हापासून आणि कसा चालू झाला, हे कोणालाच ठाऊक नाही; परंतु हा दिवा पहाण्यासाठी दूरदूरहून भाविक येथे येत आहेत.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात