१. आश्रमात पुष्कळ ऊर्जात्मक आणि चैतन्यदायी वातावरण असून ते उत्तरोत्तर वाढत आहे !
माझ्या मागील २ वर्षांच्या अनुभवावरून आश्रमात पुष्कळ ऊर्जात्मक आणि चैतन्यदायी वातावरण आहे, जे उत्तरोत्तर प्रगतीपथावर अग्रेसर होत आहे. माझ्या आध्यात्मिक चेतनेच्या आधारावरून येथे ब्रह्मांडातील ऊर्जा स्थलांतरित होत असल्याचे जाणवते, जी काळानुरूप भविष्यामध्ये अधिक वाढेल.
(समादेश – आश्रमामध्ये जर शिवलिंगाची शास्त्रशुद्ध वैदिक पद्धतीने स्थापना केली, तर विशेष चमत्कार पहायला मिळतील. माझ्या शिवचक्राच्या आधारावरील अनन्य श्रद्धेच्या अनुभवावरून मी हे सांगत आहे.)
– आध्यात्मिक गुरु राजेंद्र शर्मा, मुंबई (२४.६.२०१६)
२. आश्रम पाहून माझ्या मनाला शांती मिळाली !
माझे धर्माविषयी ज्ञान वाढले. आश्रमातील स्वच्छता आणि व्यवस्थापन पाहून मला चांगले वाटले. आश्रमातील स्वयंपाकघरही फार स्वच्छ आहे. येथे मला सण कसे साजरे करायचे ?, याविषयी माहिती मिळाली.
– श्री. कमलेश कनौजिया, महानगर अध्यक्ष, हिंदु धर्म सेना, जबलपूर, मध्यप्रदेश. (२४.६.२०१६)
३. आश्रमात मला एक दैवी शक्ती अनुभवायला मिळाली !
या देवस्थानाचे रक्षण परमब्रह्मच करत आहे, असे मला वाटले. मला माझ्या कार्यक्षेत्रामध्ये निर्भयतेने धर्मरक्षणासाठी लढण्यास ऊर्जा मिळाली.
– अधिवक्त्या श्रीमती चेतना शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदू स्वाभिमान, मेरठ, उत्तरप्रदेश (२४.६.२०१६)
४. आश्रमातील सर्व जण धर्मकर्तव्य म्हणून सेवा करत आहेत, ही गोष्ट अभिमानास्पद !
आश्रम पाहून पुष्कळ छान वाटले. सर्व व्यवस्था उत्तम आहे. इथून जे धर्मप्रसाराचे सेवाकार्य चालू आहे, ते पाहून मला फार आनंद झाला. कुणीही पगारी नोकर नाही. सर्व जण आपली सेवा धर्मकर्तव्य म्हणून करत आहेत. ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
– कु. रेखा, पूज्यपाद संतश्री आसारामबापू संप्रदाय (२३.६.२०१६)
५. हा आश्रम इतर हिंदु मठ, ‘मिशन’ वा संस्था यांपेक्षा संपूर्णपणे वेगळा आहे !
‘आश्रमाला भेट दिल्यावर पुष्कळ छान वाटले. हा आश्रम इतर हिंदु मठ, ‘मिशन’ वा संस्था यांपेक्षा संपूर्णपणे वेगळा आहे. ‘ही संस्था आधुनिक आणि शास्त्रीय हिंदु संस्था आहे’, असे मला वाटते.’ – श्री. चंदन रॉय (१८.६.२०१६)
६. आश्रमात आल्यावर मला अदृश्य दैवी शक्तीची अनुभूती आली !
‘साधना करून अध्यात्मातील अनुभूती घ्यावी’, असे मला वाटू लागले आहे. साधनेमुळे मला माझ्या सध्याच्या सामान्य जीवनाचे रूपांतर यशस्वी जीवनात करायचे आहे.’ – श्री. प्रकाश कामत (१९.६.२०१६)
७. ‘आतापर्यंत भारत देशामध्ये पुष्कळ आश्रम पाहिले; मात्र एवढा आदर्श आश्रम मला कुठेच पहायला मिळाला नाही.’ – ब्र. नागेश्वनंद, संभाजीनगर (२४.६.२०१६)
८. ‘या आश्रमात दैवी शक्ती आहे’, असे वाटले.’ – श्री. निखिल कजोजिया (२०.६.२०१६)
९.रामनाथी आश्रमात ५ – ६ दिवस राहून जेवढा आनंद मिळाला, तितका अन्य संप्रदायानुसार साधना करून न मिळणे
२० ते २६.८.२०१५ या कालावधीत मी सनातनच्या रामनाथी आश्रमात सेवेसाठी होतो. तेव्हा येथील साधक करत असलेली साधना आणि कार्य अन् अन्य संप्रदायातील साधक करत असलेली साधना यात मला भेद जाणवला.
प.पू. गुरुदेवांनी काळानुसार साधना सांगून जलद गतीने प्रगती करायला सांगितली आहे. मी ५ – ६ दिवस आश्रमात राहिल्यावर जेवढा आनंद आणि शांती अनुभवली, तेवढी मी प्रतिवर्षी करत असलेल्या वारीतूनही मिळाली नाही.
– श्री. उत्तम कल्लपा गुरव, बेळगाव (२५.८.२०१५)
१०. आश्रमात सकारात्मक ऊर्जा ओसंडून वहात असल्याचे जाणवले !
आश्रम पहातांना दिवसभर प्रवासात आलेला शीण, थकवा जाणवला नाही. कोणतीतरी ऊर्जा माझे मन प्रसन्न करत होती. सकारात्मक विचारांनी माझे मन भरून आले. मला साधकांमध्ये आत्मीयता जाणवली. आश्रमात सकारात्मक ऊर्जा ओसंडून वहात आहे. ती येथे येणार्या प्रत्येकामध्ये संचारत असावी. – श्री. विक्रमसिंह मारुति सावंत, शहर प्रमुख, युवा सेना, कोल्हापूर. (१५.६.२०१७)
११. आश्रमात आल्यावर आध्यात्मिक शांती मिळाली. – अधिवक्ता मधुसूदन बी. शर्मा, अकोला (१५.६.२०१७)
१२. या आश्रमात दैवी शक्ती निर्माण झाली आहे !
संपूर्ण आश्रम पाहिला असता प्रथम आम्हाला पुष्कळ आनंद वाटला; कारण हा एका माणसाप्रमाणे चालता-फिरता आश्रम आहे, म्हणजे या आश्रमात दैवी शक्ती निर्माण झाली आहे. – श्री. प्रशांत बतवल, प्रांत सदस्य, धर्मयोद्धा, संभाजीनगर, महाराष्ट्र. (१५.६.२०१७)
१३. आश्रम पाहिल्यावर रामराज्याची मुहूर्तमेढ झाली, असे वाटले !
आश्रम पहात असतांना सूक्ष्मातून देवलोकाकडे प्रवास करत असल्याचे जाणवले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सूक्ष्मातून अभ्यास करून आश्रमाची निर्मिती केली आहे. येथे आल्यावर स्वर्गलोकात फिरत आहोत, असे जाणवले. रामराज्याची मुहूर्तमेढ झाली, असे वाटले. – अधिवक्ता गोविंद जानकीराम तिवारी, प्रदेश कार्याध्यक्ष, हिंदू महासभा, जळगाव, महाराष्ट्र. (१५.६.२०१७)
१४. अतिशय सात्त्विक आणि समाधानी जगात आपण वावरत आहोत, असे पदोपदी जाणवले !
आश्रमाला भेट दिल्यावर मला एखाद्या आधुनिक गुरुकुलाला भेट दिल्याप्रमाणे वाटले. आयुष्याच्या प्रत्येक अंगाचा विचार करून आश्रमाची रचना केलेली आहे. अतिशय सात्त्विक आणि समाधानी जगात आपण वावरत आहोत, असे पदोपदी जाणवले. – अधिवक्ता सुशील अत्रेे, विश्वस्त, सावरकर राष्ट्रीय प्रबोधिनी, जळगाव, महाराष्ट्र. (१५.६.२०१७)
१५. भारत देशाला वाचवणारी शक्ती आश्रमातूनच प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले !
आश्रमातील शिस्तबद्धता, शांतता आणि स्वच्छता अप्रतीम आहे. संपूर्ण आश्रमात भूमीवर साधी धूळसुद्धा नाही. आश्रमातील भूमी अगदी गुळगुळीत आहे. येथे चैतन्य पुष्कळ मिळाले. आश्रम आणि आश्रमातील आध्यात्मिक शक्ती बघून वाटले, हे वेगळेच जग आहे आणि या आश्रमामुळे भारताचे रक्षण होत आहे. भारत देशाला वाचवणारी शक्ती आश्रमातूनच प्रक्षेपित होत आहे. – अधिवक्ता निरंजन भालचंद्र चौधरी, जळगाव, महाराष्ट्र. (१५.६.२०१७)
१६. आश्रम पाहिल्यावर अध्यात्माची जीवनातील आवश्यकता लक्षात आली !
श्रमातील कार्यपद्धती पाहून मला अतिशय प्रसन्न आणि सात्त्विक वाटले. आश्रमातील स्वच्छता, तसेच प्रत्येक कृती एखाद्या परदेशी आस्थापनापेक्षा पुष्कळ सरस आहे. प्रत्येक कृती करतांना साधकाचा त्या कृतीप्रती असलेला भाव मला पहायला मिळाला. आश्रम पहातांना माझ्या मनातील अनावश्यक विचार न्यून झाले. मला पुष्कळ शांतता अनुभवायला मिळाली, तसेच अध्यात्माची जीवनातील आवश्यकता लक्षात आली. – श्री. युवराज दिलीप पवळे, अध्यक्ष, शिववंदना संघ, वडगावशेरी, पुणे, महाराष्ट्र्र. (१३.६.२०१७)
१७. अशा आश्रमांची संख्या वाढवल्यास लवकरच हिंदु राष्ट्र निर्माण होईल !
आश्रमात मला आत्यंतिक सात्त्विकता आणि चैतन्य जाणवले. आश्रमात आल्यावर माझे मन निर्विचार झाले. अशा आश्रमांची संख्या वाढवल्यास लवकरच हिंदु राष्ट्र निर्माण होईल. – डॉ. नीलेश निवृत्ती लोणकर, अध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा मंच, पुणे, महाराष्ट्र. (१३.६.२०१७)
१८. ‘आश्रम हा धरतीवरचा स्वर्ग आहे. ‘आश्रम पाहून हिंदु राष्ट्र स्थापन होईल’, याची निश्चिती वाटते.’ – अधिवक्ता गोपीनाथ पाटील, लातूर, महाराष्ट्र. (१५.६.२०१७)
१९. ‘आश्रमातील संतांच्या अस्तित्वामुळे किती प्रभाव पडतो’, हे लक्षात आले !
‘आश्रम बघून पुष्कळ प्रसन्नता आणि मनःशांती जाणवली. येथील प्रत्येक कार्य पुष्कळ भावपूर्ण आणि शिस्तप्रिय असल्याचे जाणवले. आश्रमात संतांचे अस्तित्व असल्याने ‘त्यांच्या चैतन्याचा आणि ईश्वरी तत्त्वाचा किती प्रभाव पडतो’, हे बघून पुष्कळ चांगले वाटले.’
– सौ. आरती सचिन शिंदे, जालना, महाराष्ट्र. (१३.६.२०१७)
२०. ‘नामजप करायला बसल्यावर मन लवकर एकाग्र होऊन काही वेळातच आज्ञाचक्राच्या ठिकाणी स्पंदने जाणवली.’ – सौ. आरती सचिन शिंदे, जालना, महाराष्ट्र. (१३.६.२०१७)
२१. ‘आश्रम पाहून मला ‘देव, धर्म आणि राष्ट्र यांच्यासाठी कार्य करायला हवे’, अशी प्रेरणा मिळाली. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यामध्ये मी सहभाग घेणार आहे.’ – श्री. सुरेश यादव, रा. शिरोली, कोल्हापूर (१६.६.२०१७)
रामनाथी आश्रमात आल्यावर मान्यवरांना आलेली अनुभूती
‘परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत बसून नामजप केल्यावर माझे मन आपोआप शांत झाले आणि मनात सकारात्मक विचार चालू झाले.’
– श्री. सचिन शिंदे, सचिव, युवा सेवा संघ, जालना, महाराष्ट्र. (१३.६.२०१७)
पू. फलाहारी बाबा, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर-ए-हिन्द, हजारीबाग, झारखंड
‘आश्रम पुष्कळ सुंदर आहे. येथील कार्यपद्धती पुष्कळ चांगल्या आहेत. आश्रमातील साधकांमध्ये हिंदुत्वाप्रती पुष्कळ समर्पित भाव आहे. येथे दैनंदिन आचरणही पुष्कळ समर्पित भावाने करतात. मला चांगल्या अनुभूतीही आल्या.’
बाहेरील जग अनुभवल्यावर सनातन आश्रम म्हणजे स्वर्गच याची जाणीव होणे
सनातन आश्रम म्हणजे गोव्यातील स्वर्ग आहे आणि बाहेरील जग म्हणजे नरक आहे. तुम्ही स्वर्गात रहात आहात, असे मी साधकांना उद्देशून म्हणालो. मागील ४ दिवस आम्ही इफ्फी (इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल) आणि कॅसिनो अशा ठिकाणी होतो. त्या ठिकाणचे अन्न खाऊन आमचा देह अशुद्ध झाला. आज आम्ही या ठिकाणी पोहोचलो, हे ईश्वराचेच नियोजन आहे. येथील पवित्र अन्नामुळे आमच्या देहातील अशुद्धी दूर होईल. – ग्रुपकॅप्टन श्री. राकेश नंदा, मुंबई
सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी दिलेला अभिप्राय
अनिष्ट शक्ती कधीही जिंकू शकत नाहीत, विजय नेहमी सत्याचाच होत आला आहे !
जेव्हा कुणी धर्मप्रसारक, साधक वा संस्था प्रगती करू पहाते, तेव्हा त्यांना अधोगतीकडे नेण्यास सूक्ष्म अनिष्ट शक्ती काय खेळ करतात, ते पहायला मिळाले. सनातन संस्थेसमवेतही हेच घडत आहे; पण अनिष्ट शक्ती कधीही जिंकू शकत नाहीत, विजय नेहमी सत्याचाच होत आला आहे.
– कु. रेखा, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू संप्रदाय (२३.६.२०१६)
१. आश्रमात आल्यावर मन प्रसन्न झाले !
‘आश्रमात अती प्रसन्नता आणि जिवंतपणा आहे’, असे वाटले. कुठेही अंधश्रद्धा, ढोंग पाहिले नाही. इथे आल्यावर मन प्रसन्न झाले.’ – श्री. विवेक नारायण, बुलढाणा, महाराष्ट्र. (१७.६.२०१७)
२. आश्रमात ‘भाव तेथे देव’ हे अनुभवता आले !
‘आश्रम पाहून ‘आनंद, चैतन्य आणि देवलोक कसा आहे’, हे लक्षात आले. ‘भाव तेथे देव’ ते अनुभवता आले. परात्पर गुरु डॉक्टर यांनी पूर्वी निवास केलेल्या खोलीत ‘चैतन्याचा लाभ होऊ दे’, अशी प्रार्थना केल्यावर ‘संपूर्ण शरिरात पांढरा प्रकाश पसरत आहे आणि शरीर हलके होऊन तरंगत आहे’, अशी अनुभूती आली.’ – सौ. सुनिता उत्तम दीक्षित, अकलूज, सोलापूर. (१८.६.२०१७)
३. आश्रमात हिंदु राष्ट्राची अनुभूती आली !
‘आश्रम पाहून पुष्कळ आनंद झाला. ध्यानमंदिरात नामजप करतांना इतर वेळी जसे विचार येतात, तसे विचार आले नाहीत. आश्रमात प्रसन्न वाटत होते आणि नियोजनही पुष्कळ चांगले होते. ते पाहून हिंदु राष्ट्राची अनुभूती आली.’ – श्री. प्रकाश कृष्ण कोंडसकर, रत्नागिरी (१८.६.२०१७)
४. ‘आश्रमात राहून पूर्ण वेळ सेवा करावी’, असे वाटणे
‘आज आश्रम पाहून ‘साक्षात् स्वर्ग काय असेल ?’ याची अनुभूती आली. ‘सर्व साधकांप्रमाणे अधिकाधिक साधना करून आश्रमात पूर्ण वेळ द्यावा’, असे मनापासून वाटले.’ – श्री. अभिषेक विजयराव दीक्षित, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, अमरावती. (१८.६.२०१७)
५. रामनाथी आश्रमात देवतांचा वास असल्याने येथे सर्व कार्य घडू शकते !
‘रामनाथी आश्रम पाहिल्यावर मला समाधान मिळाले. येथील शिस्त, स्वच्छता आणि उपासना पाहून समाधान मिळाले आणि ‘जगात कसे वागावे ?’, हे शिकायला मिळाले. या आश्रमात देवतांचा वास आहे; म्हणूनच येथे सर्व घडू शकते.’ – वेदमूर्ती प्रमोद करंबेळकरगुरुजी, रत्नागिरी (२०.३.२०१८)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात