प.पू. डॉक्टरांचे आरोग्य सुधारावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यांसाठी अविश्रांतपणे धडपडणारे अश्‍वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी

१. प.पू. नानांनी प.पू. डॉक्टरांचे आरोग्य सुधारावे, यासाठी
आयुष्कामेष्टी यज्ञ करणे आणि त्याचा परिणाम म्हणून प.पू.डॉक्टरांच्या
शरिराला सुटलेला कंप आणि त्यात येणारे झटके चमत्कार झाल्यासारखे बंद होणे

nana_kale१०.४.२०१६ या दिवशी प.पू. नानांचा दूरध्वनी आला होता. त्या वेळी मी त्यांना म्हटले, नाना, प.पू. डॉक्टरांची तब्येत बरी नाही. त्यांच्या हाताला, पायाला कंप आहे. इतका की, त्यांचे शरिर अचानक झटके बसल्यासारखे हलू लागते. हे झटके इतके जोरात आहेत की, त्यामुळे ते बसलेली आसंदीही हलते. गेल्या आठ दिवसांपासून हे सुरू आहे. यावर प.पू. नाना म्हणाले, आम्हाला काही झाले, तरी चालेल; परंतु त्यांना काहीही होता कामा नये. आमचा देह काय कामाचा ? त्यांचा देहच टिकला पाहिजे. आम्ही गेलो, तरी कुणाला काही वाटणार नाही. प.पू. डॉक्टरांचे आरोग्य सुधारावे, यासाठी मी आयुष्कामेष्टी यज्ञ करीन.

त्याप्रमाणे प.पू. नानांनी १२.४.२०१६ या दिवशी प.पू. डॉक्टरांचे आरोग्य सुधारावे, यासाठी आयुष्कामेष्टी यज्ञ केला आणि काय चमत्कार ! त्यानंतर २ दिवसांनी प.पू. डॉक्टरांच्या देहाला येणारे झटके बंद झाले.

१ अ. यज्ञातून उठणार्‍या भावतरंगांना परत परत होणारा अनिष्ट शक्तींचा विरोध नष्ट करण्यासाठी यज्ञ परत परत करावा लागणे : प.पू. नानांनी आजपर्यंत प.पू. डॉक्टरांच्या आरोग्यासाठी सहा वेळा आयुष्यकामेष्टी यज्ञ केला आहे. परत परत असा यज्ञ का करावा लागतो ?, असा प्रश्‍न विचारल्यावर प.पू. नाना म्हणाले, या यज्ञातून उठणार्‍या भावतरंगांना परत परत सूक्ष्म विरोध होत असतो. हे एक सूक्ष्मयुद्धच आहे. हा दुष्ट प्रवृत्तींचा होणारा विरोध नष्ट करण्यासाठी जेवढ्या वेळा विरोध होईल, तेवढ्या वेळा यज्ञ परत परत करावा लागतो.

 

कृतज्ञता !

प.पू. नाना ८६ वर्षांचे आहेत. या वयातही ते न थकता अविश्रांतपणे साधक, हिंदु राष्ट्र आणि प.पू. डॉक्टर यांच्यासाठी यज्ञकर्म करत आहेत. अशा या महान कर्मयोग्याच्या चरणी आम्हा साधकांचा कोटी कोटी प्रणाम !

२. गुढीपाडव्याच्या दिवशी प.पू. नानांचे दीक्षागुरु
प.पू. गुळवणी महाराज यांनी स्वप्नदृष्टांताद्वारे प.पू. नानांना हिंदु राष्ट्राच्या
स्थापनेसाठी आणखी एका अश्‍वमेध यज्ञाची आवश्यकता आहे, असा आदेश देणे

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ
सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

प.पू. नानांचा अचानक गुढीपाडव्याच्या दिवशी दूरध्वनी आला. ते म्हणाले, आज पहाटे मला प.पू. गुळवणी महाराजांनी (प.पू. नानांच्या दीक्षागुरूंनी) स्वप्नदृष्टांत दिला आणि सांगितले की, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणखी एका अश्‍वमेध यज्ञाची आवश्यकता आहे. प.पू. गुळवणी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आता प.पू. डॉक्टरांच्या हातून आपल्याला या यज्ञाचा संकल्प करवून घ्यावयाचा आहे. त्याप्रमाणे लगेच तो झालाही.

दुसरा अश्‍वमेध करणे, म्हणजे शिवधनुष्य उचलल्यासारखेच आहे; कारण हा यज्ञ जवळजवळ दीड वर्ष चालतो आणि प्रतिदिन ८ घंट्यांचे (तासांचे) कर्म करावे लागते. खरंच, संतच हिंदु राष्ट्र येण्यासाठी एवढे कष्ट घेऊ शकतात. संकटातून संतच आपल्याला वाचवू शकतात. हेच प.पू. नानांच्या उदाहरणातून लक्षात येते.

अश्‍वमेध करायचा म्हटले, तर किती मोठे कर्म करावे लागते, हे पुढील विधींवरून लक्षात येईल. अश्‍वमेध यज्ञातील कर्मांची सूची का देत आहे; कारण यावरून तरी प.पू. नाना आपल्यासाठी किती कष्ट घेत आहेत, याची थोडीफार तरी वाचकांना कल्पना यावी, यासाठी हे लेखन आहे.

२ अ. अश्‍वमेध यज्ञात केल्या जाणार्‍या विधीकर्मांचा आढावा

२ अ १. १४ एप्रिल – यज्ञाचा संकल्प : संकल्पांतर्गत साग्निचीत महासोमयाग करण्याचा अधिकार प्रदान करणे. यात अग्नीहोत्री अश्‍वमेधयाजी प.पू. नानांना यज्ञ करण्याचा यजमानपदाचा अधिकार प.पू. डॉक्टरांनी प्रदान केला.

२ अ २. २२ एप्रिल – सांग्रहेणी इष्टी : प्रत्यक्ष यज्ञाचे साहित्य गोळा करण्यासाठी तयारी सुरू करणे

२ अ ३. ६ मे – संज्ञानेष्टी : ज्ञान प्राप्त करून यज्ञ सफल व्हावे, यासाठी देवतांना आवाहन करणे

२ अ ४. २१ मे – प्रजापत्य याग : यज्ञकर्मकाळात सृष्टीचे संतुलन योग्य राखण्यासाठी प्रजापतीची कृपा संपादन करणे

२ अ ५. ५ जून – अश्‍वसंस्कार विधी : अश्‍व शुद्ध करण्याच्या या विधीत त्याला अंघोळ घालणे आणि मंत्रांचे पठण करून त्याला संस्कारीत करणे. या कर्मात एकूण २ इष्टी कराव्या लागतात.

२ अ ६. ७ जून – अश्‍व भ्रमणासाठी सोडणे : ११ महिन्यांसाठी अश्‍व या भारतवर्षात भ्रमणासाठी सोडणे

२ अ ७. अश्‍वरक्षणासाठी वर्षभर प्रतिदिन तीन इष्टी कराव्या लागणे : शिवाय वर्षभर नित्य तीन इष्टी कराव्या लागतात. प्रत्येक इष्टी अडीच घंट्यांची असते. यांतील सावित्री इष्टी सूर्याच्या कृपेसाठी करावी लागते. अश्‍वाला कुठे दुखलंखुपलं, तर त्याचे रक्षण व्हावे, यासाठी सूर्याला प्रार्थनाही केली जाते.

२ अ ८. अग्नीहोत्र होम : सकाळ आणि सायंकाळ नित्य अग्नीहोत्र होम करावा लागतो.

२ अ ९. प्रकृती इष्टी करणे : दर १५ दिवसांनी प्रकृती इष्टी करावी लागते. ही इष्टी कर्म करणार्‍या यजमानांची तब्येत चांगली रहावी, यासाठी असते.

२ अ १०. अश्‍वत्रिरात्र होमाचे आयोजन करणे : अश्‍व भ्रमण करून आल्यानंतर अश्‍वत्रिरात्र होम करावा लागतो.

२ अ ११. राजवैभवासाठी गज आणि अश्‍व पाळणे : राजवैभव प्राप्त होण्यासाठी गज आणि अश्‍व यज्ञशाळेच्या परिसरात उभे करावे लागतात. तसेच अश्‍व जोडलेल्या रथातून कर्म करणार्‍या ऋत्विजांची ने-आण करावी लागते.

२ आ. कलियुगात अश्‍वमेधासारखा यज्ञ करण्याचे धाडस परत एकवार करणे, हे एखाद्या महायोग्यालाच जमू शकते आणि अगदी तसेच आहेत आमचे प.पू. नाना !

अश्‍वमेधांतर्गत आणखी बरेच विधी असतात. त्यांतील काहीच विधी वर दिले आहेत. यातूनच कळते की, कलियुगात यज्ञ करण्यासाठी केवढी चिकाटी पाहिजे, तसेच केवढे आर्थिक बळ पाहिजे. प.पू. नाना म्हणतात की, हे बळ गुरुच उभे करतात. आपण केवळ आज्ञापालन करावयाचे आहे.

कृतज्ञता !

धन्य ते नाना आणि धन्य त्यांचे गुरु प.पू. गुळवणी महाराज ! या दोघांप्रती कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच आहे. प.पू. नाना, आम्हा साधकांचे हे चार शब्द सांभाळून घ्या आणि चुकलंमाकलं असेल, तर क्षमा करा !

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, रामनाथी आश्रम, गोवा