मंगळुरू (कर्नाटक) येथे सात दिवसीय राज्यस्तरीय शिबीर भावपूर्ण वातावरणात संपन्न

Shibir2_c
साधकांना मार्गदर्शन करतांना सद्गुरु सत्यवान कदम (डावीकडे)

मंगळुरू : साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि विहंगम धर्मप्रसार व्हावा, याकरता १० ते १६ सप्टेंबर या कालावधीत येथे साधनावृद्धी आणि विहंगम धर्मप्रसार हे ७ दिवसीय राज्यस्तरीय शिबीर उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिराला कर्नाटक राज्यातून ६५ साधक उपस्थित होते. या शिबिराला सद्गुरु सत्यवान कदम यांची वंदनीय उपस्थिती लाभली.

१. शिबिराचा उद्देश सद्गुरु सत्यवान कदम यांनी स्पष्ट केला.

२. नवीन ठिकाणी धर्मप्रसारकार्य चालू करणे, धर्मशिक्षण वर्ग चालू करणे, हिंदु धर्मजागृती सभा आणि हिंदू अधिवेशन यांचे आयोजन करणे, सनातन प्रभात नियतकालिकाची वाचकवृद्धी मोहीम आदींविषयी शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले.

३. सध्या विविध दूरचित्रवाहिन्यांवर सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले जाते. त्यामुळे प्रवक्ता कसे बनायचे ?, याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.

कोणत्याही प्रसंगावर साधनेनेच मात करता येते ! – सद्गुरु सत्यवान कदम

साधकांनी भावपूर्ण सेवा + परिपूर्ण सेवा = ईश्‍वरप्राप्ती हे सूत्र लक्षात ठेवून सेवा करणे आवश्यक आहे. आपल्याला एवढे श्रेष्ठ गुरु लाभले आहेत, याचे सतत स्मरण ठेवून साधकांनी साधनेचे प्रयत्न करायला हवेत. स्वभावदोषांमुळे साधकांकडून चुका झाल्यानंतर ते न्यूनपणा घेत नाहीत आणि मी कसा बरोबर आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करतात. यापेक्षा प्रत्येक प्रसंगात आपण कुठे न्यून पडलो, हे बघून प्रयत्न करायला हवेत. साक्षात् भगवान श्रीकृष्णाने अजुर्र्नाच्या रथाचे घोडे स्वच्छ केले, राजसूय यज्ञाच्या वेळी उष्ट्या पत्रावळी गोळा केल्या, तर आपण किती न्यूनपणा घ्यायला हवा ? आपल्यावर कोणतेही संकट आले, तरी त्यावर केवळ साधनेनेच मात करता येते. स्वत:ची साधना वाढणेच महत्त्वाचे आहे.

क्षणचित्रे

१. हे शिबीर ५ दिवसांचे होते; मात्र साधकांचा उत्साह आणि तळमळ यांमुळे ते ७ दिवसांचे करण्यात आले.

२. साधकांनी व्यष्टी साधनेविषयी मनमोकळेपणाने चर्चा करून शिबिराचा लाभ करून घेतला.

शिबिराच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

१. शिबिर नसून भावसत्संगच चालू आहे, असे वाटत होते.

२. व्यष्टी आढावा घेतल्यामुळे साधकांचे मन हलके होऊन त्यांच्या साधनेच्या प्रयत्नांना प्रारंभ झाला आणि अंतर्मुुखता वाढली.

३. हे शिबीर मंगळुरू येथे होत नसून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातच होत आहे, असे वाटत होते.

४. व्यष्टी साधनेचा आढावा घेतांना काही साधकांना श्री. रमानंद गौडा यांच्या स्थानी श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले दिसत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात