तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही त्यांना आनंदाने तोंड कसे द्यायचे, याचा आदर्श देहत्यागाच्या क्षणापर्यंत सर्वांसमोर ठेवणार्‍या पू. (सौ.) सखदेवआजी !

IMG_0712_Clr
पू. (सौ.) आशालता सखदेवआजी संत घोषित झाल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना नमस्कार करतांना डावीकडून कु. राजश्री सखदेव आणि पू. (सौ.) आशालता सखदेवआजी

१. त्रास होत असतांना उपायांत आलेल्या जपाचे स्वरूप

वाईट शक्तींच्या त्रासावर उपाय म्हणून निर्गुण स्तरावरील जप आल्यानंतर सहसा १ ते २ घंट्यांत जप पालटतो; पण पू. (सौ.) सखदेवआजींना होत असलेल्या त्रासासाठी २७.७.२०१६ या दिवशी दुपारी ४.१५ वाजल्यापासून २९.७.२०१६ या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत निर्गुणातील जप येत होते.

२. श्‍वास घेण्यास तीव्र त्रास होत असतांना पू. आजींनी ठेवलेला भाव

२९.७.२०१६ या दिवशी पू. आजींना श्‍वास घेण्यास तीव्र त्रास होत असतांना त्यांनी त्या झोपलेला पलंग म्हणजे प.पू. डॉक्टरांचे चरण आहेत आणि त्या प.पू. डॉक्टरांच्या चरणांशी बसलेल्या आहेत. त्यामुळे कोणताच त्रास होणार नाही, असा भाव ठेवला. त्यामुळे तीव्र त्रास होत असतांनाही त्या तो सहन करू शकल्या.

३. पू. (सौ.) सखदेवआजी यांची जीवघेण्या त्रासाकडे पहाण्याची दृष्टी

श्‍वास घेण्यास होणारा त्रास सहन होत नाही; पण त्रास होतो, याचे मनाला दुःख होत नाही.

४. पू. (सौ.) सखदेवआजींना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

४ अ. त्रास न्यून होण्यात प्रत्येक टप्प्याला उपाय शोधण्याचे महत्त्व लक्षात येणे

२५.७.२०१६ या रात्री १०.४० वाजता श्‍वास घेण्यास त्रास होत असतांना पू. आजींनी उपाय शोधले, तसेच बरे वाटण्यास १.३० घंटा लागेल, असेही सांगितले हे उपाय केल्याने रात्री १२.१० वाजता पू. आजींचा त्रास सुसह्य झाला. यातून त्रास न्यून होतांना प्रत्येक टप्प्याला उपाय शोधण्याचे महत्त्व लक्षात आले.

– कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जुलै २०१६)

पू. (सौ.) आजींचे प्रतिदिन ऑरा क्लिंझिंग करतांना आलेल्या अनुभूती

१. आपोआप नामजपामध्ये मन एकाग्र होत होते.

२. खोलीमध्ये प.पू. डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून अस्तित्व जाणवत असे.

३. खोलीमध्ये भरभरून चैतन्य जाणवत होते.

प.पू. डॉक्टर, तुमच्या कृपेमुळे मला आजपर्यंत पू. आजींचे चैतन्य ग्रहण करण्याची संधी मिळाली, यासाठी तुमच्या आणि पू. आजींच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !

– कु. साधना पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.८.२०१६)

प.पू. डॉक्टरांनी पू. (सौ.) सखदेवआजींविषयी काढलेले उद्गार !

अ. आजींच्या इतके त्रास सहन करणारे पृथ्वीवर कुणी नाहीच !

आ. पू. (सौ.) सखदेवआजींची ५० प्रतिशत साधना समष्टीसाठी वापरली जात आहे.

पू. (सौ.) आशालता सखदेवआजींची वैशिष्ट्ये

१. सहनशक्ती अधिक असणे

पू. आजींना कोणताही त्रास असह्य झाला, तरच त्या सांगतात. एरव्ही अन्य कोणी मध्यम स्वरूपाचा त्रास होऊ लागल्यावर लगेच आधुनिक वैद्यांकडे जातात. यावरून आजींची सहनशक्ती जास्त आहे, हे लक्षात येते.

२. रात्रभर जागरण होऊनही तोंडवळा आनंदी असणे

एकदा रात्रभर आजींना जागरण होऊनही त्यांचा तोंडवळा आनंदी होता. त्यांच्यासारखं असं दुसरं उदाहरण नाही.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

प.पू. डॉक्टरांनी सांगितलेली पू. (सौ.) सखदेवआजींची अन्य वैशिष्ट्ये

१. पू. आजींची दृष्टी शून्यात आणि तोंडवळा आनंदी आहे.

२. पू. आजी तीव्र त्रास होत असतांना हसत बोलू शकतात. त्यामुळे त्यांना त्रास होत आहे, हे इतरांच्या लक्षात येत नाही.

३. पू. आजी दररोज मृत्यूशी झुंज देत आहेत. असे असतांनाही त्यांचा तोंडवळा आनंदी असतो.

– कु. राजश्री सखदेव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.७.२०१६)

आपला प्रत्येक श्‍वास समष्टीसाठी देणार्‍या पू. (सौ.) सखदेवआजी !

पू. (सौ.) सखदेवआजी संत होण्यापूर्वी साधारण २०१० या वर्षी अत्यवस्थ होत्या. त्यांना वारंवार डायलिसिसवर ठेवावे लागत होते. त्यानंतर आजतागायत त्यांचा जीवनप्रवास म्हणजे एक दैवी चमत्कारच ! वैद्यकीयदृष्ट्या त्यांच्या जगण्याची शाश्‍वती नसतांना साधनेच्या बळावर त्या नुसत्या जगल्याच नाही, तर त्यांनी आपल्या प्रत्येक श्‍वासाला समष्टीसाठी नामजप केला. यातूनच त्यांनी संतपद गाठले आणि पुढची उन्नतीही विहंगम गतीने केली. स्वतः मरणासन्न अवस्थेत असतांनासुद्धा पू. आजींना समष्टीचाच ध्यास होता. थोडा त्रास न्यून झाला की, त्या लगेच समष्टीसाठी नामजप चालू करीत. देवाने जणू काही त्यांना समष्टी कार्यासाठीच आयुष्य वाढवून दिले होते. धन्य त्या पू. आजी ! त्यांच्या चरणी आम्ही सर्व साधक नतमस्तक आहोत.

– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात