वर्षभरासाठी लागणारा गहू ठेवलेल्या पिंपात
सनातनचा सात्त्विक भीमसेनी कापूर घातल्यावर गव्हामध्ये एकही किडा न आढळणे
आम्ही प्रतिवर्षी वर्षभरासाठी लागणारे धान्य एकाच वेळी खरेदी करून भरून ठेवतो. ते सुरक्षित रहाण्यासाठी त्यात खडेमीठ, लवंगा, बोरीक पावडर, एरंडेल तेल इत्यादी घालून ठेवत होतो. अशा प्रकारे सर्व काळजी घेऊनसुद्धा धान्याला कीड लागत असे. गेल्या वर्षी देवाने मला गव्हाच्या पिंपात सनातनचा सात्त्विक भीमसेनी कापूर ठेवण्याचा विचार दिला आणि त्याच्याच कृपेने लगेचच तशी कृतीही झाली. जेव्हा मी साठवणातून गहू काढले, तेव्हा मला गव्हात एकही किडा दिसला नाही. यावरून सनातनच्या सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व माझ्या लक्षात आले. त्यामुळे चालू वर्षीच्या धान्यातही सनातनचा कापूर घालून ठेवला आहे.
– सौ. आसावरी म्हसकर, सनातन आश्रम, मिरज, जिल्हा सांगली. (१९.३.२०१६)