रामनाथी आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय

ashram

१९ ते २५.६.२०१६ या कालावधीत विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन झाले. या अधिवेशनात सहभागी झालेल्या हिंदुत्ववाद्यांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमाला भेट दिली आणि येथील कार्याची ओळख करून घेतली. त्यांनी दिलेले अभिप्राय येथे देत आहोत.

१. आश्रमात पुष्कळ ऊर्जात्मक आणि
चैतन्यदायी वातावरण असून ते उत्तरोत्तर वाढत आहे !

माझ्या मागील २ वर्षांच्या अनुभवावरून आश्रमात पुष्कळ ऊर्जात्मक आणि चैतन्यदायी वातावरण आहे, जे उत्तरोत्तर प्रगतीपथावर अग्रेसर होत आहे. माझ्या आध्यात्मिक चेतनेच्या आधारावरून येथे ब्रह्मांडातील ऊर्जा स्थलांतरित होत असल्याचे जाणवते, जी काळानुरूप भविष्यामध्ये अधिक वाढेल.
(समादेश – आश्रमामध्ये जर शिवलिंगाची शास्त्रशुद्ध वैदिक पद्धतीने स्थापना केली, तर विशेष चमत्कार पहायला मिळतील. माझ्या शिवचक्राच्या आधारावरील अनन्य श्रद्धेच्या अनुभवावरून मी हे सांगत आहे.)

आध्यात्मिक गुरु राजेंद्र शर्मा, मुंबई (२४.६.२०१६)

२. आश्रम पाहून माझ्या मनाला शांती मिळाली !

माझे धर्माविषयी ज्ञान वाढले. आश्रमातील स्वच्छता आणि व्यवस्थापन पाहून मला चांगले वाटले. आश्रमातील स्वयंपाकघरही फार स्वच्छ आहे. येथे मला सण कसे साजरे करायचे ?, याविषयी माहिती मिळाली.

श्री. कमलेश कनौजिया, महानगर अध्यक्ष, हिंदु धर्म सेना, जबलपूर, मध्यप्रदेश. (२४.६.२०१६)

३. आश्रमात मला एक दैवी शक्ती अनुभवायला मिळाली !

या देेेवस्थानाचे रक्षण परमब्रह्मच करत आहे, असे मला वाटले. मला माझ्या कार्यक्षेत्रामध्ये निर्भयतेने धर्मरक्षणासाठी लढण्यास ऊर्जा मिळाली.

– अधिवक्त्या श्रीमती चेतना शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदू स्वाभिमान, मेरठ, उत्तरप्रदेश (२४.६.२०१६)

 

अधिवक्ता ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी व्यक्त केलेले
मनोगत आणि त्यांना जाणवलेले स्वतःतील पालट !

१. रामनाथी आश्रमात आल्यावर स्वतःत पालट जाणवू लागणे

मी गेल्या वर्षी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला आलो नव्हतो. तेव्हा मला वाटत होते, अधिवेशनात नुसती भाषणे देतील. सर्व जण ती ऐकून निघून जातील आणि नंतर काहीच होणार नाही. या वर्षी अधिवेशनासाठी आल्यावर मला रामनाथी आश्रमात निवास करण्याची संधी मिळाली आणि प्रतिदिन मला स्वतःत पालट जाणवू लागला. मी घरी प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्राला उदबत्ती ओवाळतांना सूक्ष्मातून प्रतिदिन त्यांना विचारायचो, माझा क्रमांक कधी येणार ? इथे आल्यावर मला समजले. ते हेच सांगत होते.

२. स्वभावदोष अन् अहं निर्मूलन प्रक्रिया करण्याचा निश्‍चय होणे

आता ८-९ मासांत मी माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण न्यून करीन. पूर्वी मी इस्कॉनच्या माध्यमातून साधना करत होतो. तेव्हा प्रतिदिन जप करत असे आणि गीता वाचत असे. नंतर मला नामजप करतांना कंटाळा येऊ लागला. आता त्यामागील कारण समजले आहे. देवाने जीवनात सर्वकाही दिले, सर्वकाही उपभोगले. आता वानप्रस्थाश्रमात जायचे आहे, असे विचार मनात येत होते. मी पत्नी आणि सून यांना तसे सांगितलेही. या वेळी अधिवेशनाला माझी पत्नीही आली आणि सर्वांची उद्बोधक भाषणे ऐकून म्हणाली, मला आता समजले. तुमचे योग्य आहे. देवाने पत्नीच्या विचारांतही पालट केला आणि इथे आल्यावर सनातनचा वानप्रस्थाश्रमही असेल, असे ऐकल्यावर देवच माझे विचार योग्य असल्याची प्रचीती देत आहे, असे वाटले.

– अधिवक्ता ईश्‍वरप्रसाद जी. खंडेलवाल, राष्ट्रीय अध्यक्ष, लष्कर ए हिंद, ठाणे, महाराष्ट्र. (२९.६.२०१६)