क्रांतीविरांचे ऋण फेडून राष्ट्रधर्माचे पालन करण्यासह साधनेतील पूर्णत्वही साधा !

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व
ज्ञात-अज्ञात क्रांतीविरांना आमचे वंदन आणि कोटी कोटी कृतज्ञता !

P_Sandip_Alshi
पू. संदीप आळशी

मातृभूमीलाच देवता मानून तिच्यासाठी कित्येक क्रांतीविरांनी ब्रिटिशांचा क्रूर कारावास भोगला, फासाच्या दोराला हसत हसत आलिंगन दिले, अंदमानच्या निर्दयी एकलकोंडीत मरणयातना सोशीत काया झिजवली… हे सारे त्यांनी हिंदुस्थानला सुजलाम् सुफलाम् पहाण्यासाठी आणि भावी पिढ्यांना स्वातंत्र्यसुख उपभोगता येण्यासाठीच केले होत; मात्र आज हिंदुस्थानची पावन भूमी भ्रष्टाचार्‍यांनी कलंकित; जिहादी आतंकवाद्यांच्या आघातांनी विदीर्ण; धर्मांध, जात्यंध अन् राष्ट्रद्रोही यांच्या विषारी डंखांनी घायाळ आणि तथाकथित पुरोगामी अन् नास्तिकतावादी यांच्यामुळे धर्मभ्रष्ट झाली आहे.

 

अशा स्वराज्यासाठी क्रांतीविरांनी प्राणांचे बलिदान केले होते का ?

हिंदुस्थानची ही दुःस्थिती पालटण्यासाठी प्रत्येक हिंदुस्थानीने प्रयत्न करणे, हीच क्रांतीविरांप्रती कृतज्ञता आणि देशाला मानवंदना ठरेल. हाच राष्ट्रधर्म आहे आणि ही समष्टी साधनाही आहे. क्रांतीविरांचे आपल्यावर जे ऋण आहे, ते फेडल्यावाचून कोणाचीही इहलोकीची साधना पूर्णत्वास जाणार नाही. यासाठी हिंदुस्थानी बंधूंनो, जागृत व्हा ! सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी प्रज्वलित केलेल्या राष्ट्रयज्ञातील समिधा बना, राष्ट्र अन् धर्म यांवरील सर्व समस्यांचे एकमेव उत्तर असलेल्या हिंदु राष्ट्र (सनातन धर्मराज्य) स्थापनेच्या कार्याला हातभार लावा आणि जीवनाचे सार्थक करून घ्या !

– (पू.) श्री. संदीप आळशी (९.८.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात