भारताच्या पुनरुत्थानातील समस्या आणि त्यांवरील उपाय !

Anand_jakhotiya
श्री. आनंद जाखोटिया

 

सद्यस्थितीत भारतातील बहुसंख्य हिंदूंपैकी बहुतांश जण विविध हिंदुत्ववादी संघटना आणि संप्रदाय यांत विभागले गेले आहेत. या संघटना आणि संप्रदाय आपापल्या परीने काही क्षेत्रांत कार्य करत आहेत; पण भारताच्या किंवा हिंदु धर्माच्या पुनरुत्थानासाठी या सर्वांचे संघटन का होत नाही ?, असा प्रश्‍न अनेकदा पडतो. त्या वेळी लक्षात येते की, यांच्यापैकी अनेक जणांचे कार्य मानसिक स्तरावर चालू आहे.

१. मानसिक स्तरावरील कार्य करतांना भीती असणे

विविध हिंदुत्ववादी संघटना आणि संप्रदाय यांना भीती वाटते की, संघटितरित्या कार्य करत असतांना आपला कार्यकर्ता किंवा साधक दुसर्‍यांकडे आकर्षित झाला तर ? त्यामुळे अशा सीमारेषेवरील कार्यकर्त्यांना संघटना पदे देऊन, तर सांप्रदायिक मानसिक शिकवण देऊन स्वतःमध्ये अडकवून ठेवतात.

२. आध्यात्मिक स्तरावरील कार्य केल्याने व्यापक दृष्टी निर्माण होणे

याउलट सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य आध्यात्मिक स्तरावर चालते. यांतील प्रत्येकाचे व्यष्टी ध्येय मोक्षप्राप्ती, तर समष्टी ध्येय हिंदु राष्ट्राची स्थापना हेच आहे. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे समष्टी ध्येयाला व्यष्टी ध्येयाचा पायाही आहे. या ध्येयापेक्षा आणखी कोणतेच ध्येय उदात्त असू शकत नाही. त्यामुळे कार्यकर्ता आणि साधक यांच्यात व्यापक दृष्टी यायला साहाय्य होते. परिणामी हिंदु धर्मासाठी कार्य करणारी कोणत्याही संघटनेतील किंवा संप्रदायातील व्यक्ती त्याला आपली वाटते.

३. सनातन वृक्षाचे घटक असलेल्या सर्व
संघटना आणि संप्रदाय यांनी वृक्षाचे रक्षण करावे !

सध्या हिंदु धर्मावर होत असलेले आघात लक्षात घेता सर्व हिंदुत्ववादी संघटना आणि संप्रदाय यांनी लक्षात घेतले पाहिजे की, आपण चिरंतन अशा सनातन वृक्षाचे घटक आहोत. वृक्षाच्या फांदीपेक्षा खोडाचे रक्षण करण्याचे ध्येय आपण ठेवले, तर आपोआपच फांद्यांचे रक्षण आणि भरभराट होईल !

– श्री. आनंद जाखोटिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.६.२०१६)