स्वतःकडून झालेल्या चुकांचा परिणाम
अन्य व्यक्तींवर न होण्यासाठी काय कराल ?
१. तोंडवळा प्रसन्न ठेवणे
आपला उदासीन तोंडवळा दुसर्याला दिसून तोही उदास होऊ नये; म्हणून आपण आपला तोंडवळा प्रसन्न ठेवला पाहिजे. त्यामुळे आपलाही निरुत्साह जाऊन उत्साह वाढेल. आपल्याला सकारात्मक विचार सुचतील आणि झालेल्या चुकांवर योग्य ते मार्गदर्शक विचार वाढतील. यासाठी मधूनमधून प्रार्थना केल्यास ईश्वराकडून चैतन्य मिळून आत्मबळ वाढेल. यासाठी नेहमी भगवंताच्या अनुसंधानात राहून सेवा केल्यास निरुत्साह येणार नाही आणि त्यामुळे आपल्याकडून चुकाही होणार नाहीत.
२. चुकांचे मूळ शोधणे
आपल्या हातून होणार्या चुकांचे मूळ कारण शोधले पाहिजे. त्यासाठी प्रार्थना करून चिंतन केल्यास मूळ कारण सापडते. हे मूळ कारण नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यावर दोषांच्या तीव्रतेनुसार स्वयंसूचनांची ५ ते १० अभ्याससत्रे प्रतिदिन करावीत.
– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.५.२०१५)