अनुक्रमणिका [hide]
१. यंत्राची उपयुक्तता
सातत्याने आजारी पडून किंवा दुखापत होऊन साधनेत अडथळे येणे, आध्यात्मिक त्रास होणे किंवा सेवा करतांना सेवेशी संबंधित उपकरण, वाहन इत्यादी बंद पडणे किंवा अन्य काही अडचणी येणे, यांवर हे यंत्र उपयुक्त आहे.
२. यंत्र काढण्यासंबंधी सूचना
यंत्र काढण्यासाठी ६० टक्के वा त्याहून अधिक पातळीचा किंवा भाव असलेला; पण वाईट शक्तीचा त्रास नसलेला साधक उपलब्ध असल्यास त्याच्याकडून हे यंत्र काढून घ्यावे. हे शक्य नसल्यास स्वतः काढावे.
३. यंत्र काढण्याची पद्धत
अ. यंत्र काढण्यापूर्वी हात-पाय धुवावेत.
आ. यंत्राचा हेतू सफल होण्यासाठी उपास्यदेवतेला प्रार्थना करावी.
इ. दोन्ही बाजूंनी कोर्या असलेल्या चौकोनी कागदाच्या मध्यभागी हे यंत्र पेनने काढावे.
ई. यंत्रातील अंक लिहितांना लहान संख्येपासून आरंभ करून मोठ्या संख्येपर्यंत लिहीत जावे, उदा. यंत्रामध्ये १ हा अंक असल्यास तो दिलेल्या चौकोनामध्ये प्रथम लिहावा. त्यानंतर २ हा अंक असल्यास तो दिलेल्या चौकोनामध्ये लिहावा. अशा पद्धतीने पुढचे पुढचे अंक त्या त्या चौकोनामध्ये लिहीत जावेत.
उ. अंक लिहितांना ॐ ह्रीम नमः । हा जप करावा.
४. यंत्राशी संबंधित उपचार
यंत्र काढून झाल्यावर त्याला उदबत्तीने ओवाळावे आणि ज्या अडचणी येत आहेत, त्या दूर होण्यासाठी यंत्राला प्रार्थना करावी.
५. यंत्र उपयोगात आणण्याची पद्धत
अ. यंत्र प्लास्टिकच्या पिशवीत घालून ते जवळ ठेवावे (उदा. खिशात ठेवावे) किंवा उपकरणाशी संबंधित अडचणी येत असल्यास त्या उपकरणाजवळ ठेवावे.
आ. प्रतिदिन यंत्र वस्त्राने पुसावे आणि त्याला उदबत्तीने ओवाळावे, तसेच अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करावी.
इ. खिशात ठेवलेले यंत्र शौचाला जातांना चांगल्या ठिकाणी काढून ठेवावे.
६. अडचणी दूर झाल्यावर यंत्र देवघरात ठेवावे.
अडचणी दूर झाल्यावर यंत्र देवघरात ठेवावे. जेव्हा पुन्हा अडचणी येतील, तेव्हा त्याचा पुन्हा उपयोग करावा.
(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ विकार-निर्मूलनासाठी आध्यात्मिक यंत्रे)
– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, गोवा. (६.७.२०१६)