या ठिकाणी उदाहरणासाठी काही त्रासदायक आणि चांगल्या लिंगदेहांची छायाचित्रे दिली आहेत. वाचक या छायाचित्रांकडे २ मिनिटे पाहून काय वाटते ?, ते अनुभवू शकतात.
जगात काही गोष्टी डोळ्यांनी दिसतात, तर काही दिसत नाहीत. काही गोष्टी डोळ्यांनी दिसत नाहीत, म्हणजे त्या अस्तित्वातच नसतात, असे नव्हे, उदा. वारा डोळ्यांना दिसत नाही, म्हणजे तो नसतो, असे नाही. डोळ्यांनी तो दिसत नसला, तरी आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवते. स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. अशा सूक्ष्मातून घडणार्या घटनांचा व्यक्तीच्या देहावर स्थुलातून आणि सूक्ष्मातूनही परिणाम होतो किंवा जाणवतो.
काही छायाचित्रांमध्ये आपल्याला विशिष्ट प्रकारचे पारदर्शक गोळे दिसतात. या गोळ्यांंना ऑब्जर्र् म्हणतात. ऑब्जर्र् म्हणजे ऊर्जात्मक शक्ती होय. ऑब्जर्र् गोलाकार पारदर्शक असतात. एखाद्या व्यक्तीला अनिष्ट शक्तीचा त्रास असल्यास तिच्याजवळ अथवा वास्तूमध्ये त्रासदायक स्पंदने असल्यास तेथे ऑर्ब्ज दिसतात, हे आतापर्यंत आपल्याला ठाऊक होते. अशा त्रासदायक ऑर्ब्जप्रमाणेच चांगले ऑर्ब्जही दिसतात. ऑर्ब्ज दिसणे, त्यांचे आकार, त्यांना असणारे विविध रंग, त्यांची विशिष्ट हालचाल यांसंदर्भातील माहिती अनेक संकेतस्थळांवर उपलब्ध आहे; परंतु ऑब्जर्र्र् म्हणजे काय आणि त्या संदर्भातील आध्यात्मिक स्तरावरील माहिती पुढे देत आहोत.
१. ऑब्जर्र्र्च्या संदर्भातील आध्यात्मिक माहिती
ऑर्ब्ज म्हणजे आध्यात्मिक भाषेत लिंगदेह होय. मृत्यूच्या क्षणी शरीर कार्यरहित होत असल्यामुळे नेहमी शरिराच्या कार्यासाठी वापरली जाणारी प्राणशक्ती मुक्त होते. मुक्त शक्तीमुळे लिंगदेह अंतराळात दूरवर फेकला जातो. एखादा अग्नीबाण उपग्रहाला अंतराळात किती दूरवर नेऊन सोडेल, हे जसे उपग्रहाच्या वजनावर आणि अग्नीबाणाच्या क्षमतेवर अवलंबून असते, त्याप्रमाणे शरिरातून बाहेर पडणारा लिंगदेह विश्वातील कोणत्या टोकापर्यंत जाऊ शकेल, हे त्या लिंगदेहाच्या जडपणावर, म्हणजे त्यातील तमोगुणाच्या प्रमाणावर आणि चैतन्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. लिंगदेहामध्ये तमोगुणाचे प्रमाण अधिक असल्यास तो पुष्कळ जड होतो आणि त्यांतील काही लिंगदेह जडत्वामुळे भुवलोकाच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत, तर काही लिंगदेह त्यांच्या अतृप्त इच्छेनुसार भूलोकाच्या जवळच संचार करतात आणि तेच छायाचित्राच्या माध्यमातून आपण टिपू शकतो. जे लिंगदेह सत्त्वप्रधान असतात, ते हलके असल्यामुळे वर-वर जातात.
२. वरील छायाचित्रांचे विश्लेषण
२ अ. त्रासदायक लिंगदेह
१. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील कलामंदिरामध्ये ७.३.२०१५ या दिवशी रात्री ९.२२ वाजता वातावरणात पुष्कळ दाब जाणवत होता. त्या ठिकाणी काही आवाज येत असल्याप्रमाणे जाणवून भीती वाटत होती. त्या वेळी तेथील छायाचित्र काढले असता वातावरणामध्ये अनेक लिंगदेह दिसले आणि त्यामध्ये काही लिंगदेह अर्धगोलाकार होते. – श्री. मेहूल राऊत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (छायाचित्र क्र. १)
२. एका ठिकाणी सभेच्या मैदानाच्या बाहेरील बाजूस लावण्यात आलेल्या फलकाच्या ठिकाणी लिंगदेह दिसतात. त्यांतील काही लिंगदेहांचा आकार अमिबासारखा असल्याचे दिसून येते. (छायाचित्र क्र.२)
३. वर्ष २००६ मध्ये एका कार्यक्रमाच्या ठिकाणी प.पू. पांडे महाराज यांच्यासमवेत पू. (कु.) अनुराधा वाडेकर आणि सौ. शुभांगी पिंपळे आहेत. या छायाचित्रामध्ये पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या तोंडवळ्यावर एक लिंगदेह दिसतो. त्या लिंगदेहामध्ये काही काळसर ठिपके असल्याप्रमाणे दिसतात.
२ आ. चांगले लिंगदेह
१. ४.५.२०१३ या दिवशी प.पू. डॉक्टरांच्या खोलीतील देवघराच्या पुढील बाजूस एक तेजस्वी पिवळ्या रंगाची रेघ किंवा मंडल असलेला आणि गोलाकार अन् त्यामध्ये अनेक वलये असलेला लिंगदेह दिसला. (छायाचित्र क्र. ३)
२. एका साधकाच्या घरातील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रामध्ये आलेल्या गोलाकार पांढर्या रंगाच्या लिंगदेहांचे वैशिष्ट्य म्हणजे ते पांढरे आहेत. इतर लिंगदेहांप्रमाणे त्यामध्ये कोणतेही डाग दिसून येत नाहीत आणि त्यांच्याभोवती पिवळ्या रंगाची प्रभावळ आहे.
३. ७.२.२०१६ या दिवशी बार्शी, सोलापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेमध्ये पू. (कु.) स्वाती खाड्ये यांच्या मागील बाजूस दिसणारा लिंगदेह पंचकोनी आहे, तसेच या सभेमध्ये असंख्य पंचकोनी लिंगदेह दिसत आहेत. (छायाचित्र क्र. ४)
३. चांगल्या आणि त्रासदायक
लिंगदेहांचा आकार आणि आकारातील वैशिष्ट्ये
छायाचित्रामध्ये दिसणार्या लिंगदेहांमध्ये काही लिंगदेह चांगले आणि काही त्रासदायक असतात. त्यांच्या पुढील वैशिष्ट्यांवरून ते लक्षात येऊ शकतात. चांगल्या आणि त्रासदायक लिंगदेहांचा आकार आणि आकारातील वैशिष्ट्ये यांसंदर्भात पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांना मिळालेले ज्ञान पुढे देत आहोत.
– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०१३)
चांगले आणि त्रासदायक लिंगदेह हा सूक्ष्म स्तरावरील घटक आहे. साधनेमुळे जिवाची सात्त्विकता वाढू लागते. साधना जसजशी वृद्धींगत होत जाते, तसतशी स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्मातील कळू लागते. केवळ डोळ्यांनी दिसते, तेच सत्य असे न मानता एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून पाहिल्यास तिच्यातील चांगली आणि त्रासदायक स्पंदने जाणवतात, दिसतात किंवा त्यासंदर्भात अनुभूती येते.
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय (१३.३.२०१६)