
पनवेल – पिंपरी-चिंचवड येथील भाजपचे शहर जिल्हा सरचिटणीस श्री. विलासभाऊ मडिगेरी यांनी येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी श्री. मडिगेरी यांच्या समवेत त्यांचे सहकारीही उपस्थित होते. आश्रमातील साधक श्री. शशांक जोशी यांनी त्यांना आश्रमात चालणार्या सेवांविषयी अवगत केले. हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. शिवाजी वटकर यांनी त्यांना समितीच्या कार्याविषयी माहिती दिली. तसेच सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांची संकेतस्थळेही त्यांना दाखवण्यात आली.
आश्रमातील साधकांनी फलकावर लिहिलेल्या चुका वाचून श्री. मडिगेरी यांनी साधकांच्या प्रांजळपणाचे कौतुक केले. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया याविषयी त्यांनी आवडीने जाणून घेतले, तसेच सहकार्यांनाही लक्षपूर्वक ऐकण्यास सांगितले. या वेळी त्यांनी पिंपरी-चिंचवड येथे बालसंस्कारवर्गही चालू करणार असल्याचे सांगितले. समितीच्या वतीने घेण्यात येणारे उपक्रम आणि आंदोलने यांतही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. सनातनच्या सात्त्विक उत्पादनांच्या साहाय्याने जागेची शुद्धी केल्याने अनुभूती आल्याचेही त्यांनी सांगितले. आश्रम पहाण्यासाठी कुटुंबियांनाही घेऊन येतो, म्हणजे त्यांनाही स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रियेविषयी शिकायला मिळेल, असे श्री. मडिगेरी यांच्या मोठ्या बंधूंनी सांगितले.