सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी लावलेले प्रदर्शन !
धर्मजागृतीसाठी आवश्यक असलेल्या
कार्याच्या माहितीचे प्रदर्शनात विश्लेषण !
– अनंत श्री दण्डीस्वामी हेमेन्द्रानन्द सरस्वती महाराज

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती करत असलेले कार्य साधू-संताचेच कार्य आहे. प्रत्येक हिंदूला धर्मविषयक कोणते कार्य करणे अपेक्षित आहे त्या सर्वांची माहिती या प्रदर्शनात आहे. हे विशेष महत्त्वाचे आहे. सध्याचा हिंदु समाज झोपलेला आहे. त्याला जागृत करण्याची आवश्यकता आहे. संघे शक्ती कलौयुगे । या मंत्राचे पालन केल्यास हिंदूंचे पुढच्या काळात रक्षण होऊ शकते, असे प्रतिपादन उज्जैन दण्डी सेवा आश्रम ट्रस्ट गुरुकुल शिक्षण संस्थानचे अनंत श्री दण्डी स्वामी हेमेन्द्रानन्द सरस्वती महाराज यांनी प्रदर्शन पाहिल्यावर केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचे सन्मान करण्यात आला.
