पू. (सौ.) अंजली गाडगीळ आणि सप्तर्षि जीवनाडीपट्टी यांच्या आगमनाप्रसंगीच्या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून रामनाथी आश्रमात साक्षात महर्षि अवतरले !

pu_gadgil_kaku
१. पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हातातील सप्तर्षि जीवनाडी आणि २. श्री. दिवाकर आगावणे यांच्या हातातील वज्र यांचे औक्षण करून स्वागत करतांना ३. सनातनच्या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ (२६.५.२०१६)
jeev_nadipatti_kale_guruji
सप्तर्षि जीवनाडीला पुष्पहार अर्पण करतांना अहिताग्नि सोमयाजी चैतन्य काळेगुरुजी (२६.५.२०१६)

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. महर्षींच्या अपार कृपेमुळे होत असलेल्या या आनंदसोहळ्यात आणखी एक सुवर्णयोग जुळून आला ! तो म्हणजे सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून झालेले सप्तर्षी जीवनाडीपट्ट्यांचे आगमन !  
 
पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून स्वयं महर्षिच आश्रमात येणार आहेत, असे आधीच महर्षींनी सांगितल्यामुळे सर्वांचीच उत्कंठा वाढली होती. २६ मे या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता ५ सप्तर्षि जीवनाडीपट्ट्या आणि वज्र घेऊन पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून साक्षात महर्षींचेच सनातनच्या आश्रमात आगमन झाले अन् साधकांना एक दैवी योग अनुभवायला मिळाला. या वेळी महर्षींच्याच आज्ञेने सनातनच्या संत (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ यांनी ५ सप्तर्षि जीवनाडीपट्ट्या आणि वज्र यांचे भावपूर्ण पूजन केले. स्वागताच्या वेळी बार्शी (जिल्हा सोलापूर) येथील श्री वेदविज्ञान आश्रमाचे अहिताग्नि सोमयाजी चैतन्य काळेगुरुजी आणि सहकारी ऋत्त्विज यांनी सामगान केले, तसेच पुष्पहार घालून जीवनाडीपट्ट्या आणि वज्र यांचे पूजन केले. या दैवी सोहळ्याला सनातनचे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ आणि आश्रमातील अन्य साधक उपस्थित होते. 
 

जीवनाडीपट्ट्यांच्या आगमनासंदर्भात महर्षींनी केलेले मार्गदर्शन !

आज (२६ मे या दिवशी) उत्तराषाढा नक्षत्र असून प.पू. डॉक्टरांचा जन्मही याच नक्षत्रात झाला आहे. हे नक्षत्र असतांना सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे आश्रमात आगमन झाले पाहिजे, असे महर्षींनी नाडीपट्टीत म्हटल्याचे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले होते. तसेच यात पुढे म्हटले, पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते नाडीपट्ट्या आश्रमात आणून पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांची आरती ओवाळावी. सप्तर्षि जीवनाडी पट्टीच्या माध्यमातून साक्षात् सप्तर्षिच आश्रमात प्रवेश करणार आहेत. नाडीपट्ट्यांचे आश्रमात आगमन होत असतांना सामवेदाचे पठण करण्यात यावे. आज (२६.५.२०१६) उत्तराषाढा नक्षत्राच्या रात्री ९ ते १० या कालावधीत आश्रमातील वेदब्राह्मणांनी श्री विष्णुसहस्रनामाचे पारायण करावे. प.पू. डॉक्टर म्हणजे साक्षात् श्रीविष्णूचे अवतार असल्यामुळे विष्णुसहस्रनामाच्या पारायणाने त्यांच्यातील विष्णुतत्त्वाला नमस्कार केल्यासारखे होईल.
 
– श्री. विनायक शानबाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२६.५.२०१६)