कलेचे सात्त्विक सादरीकरण होण्यासाठी संशोधन करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

साधनेच्या दृष्टीतून १४ विद्या आणि ६४ कला यांच्या
शिक्षणाचे बीजारोपण करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

साधनेच्या संदर्भात व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग, या सिद्धांताला अनुसरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची विद्या ग्रहण करण्याची क्षमता आणि कलेची आवड यांनुसार त्यांना साधना शिकवली. आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, हे ध्येय ठेवून अनेक साधक चित्रकला, मूर्तीकला, संगीत, नृत्यकला, वास्तूविद्या आदी कलांच्या माध्यमांतून साधना करत आहेत. पुढे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्थापन केलेल्या महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या माध्यमातून साधनेच्या दृष्टीतून १४ विद्या आणि ६४ कला यांचे शिक्षण देण्यात येणार आहे.

 

देवतांच्या सात्त्विक मूर्ती घडवण्याविषयी मार्गदर्शन

ppdr_murtishastra_700
श्री गणेशमूर्ती सात्त्विक कशी बनवावी, याविषयी सनातनचे साधक-मूर्तीकार श्री. गुरुदास खंडेपारकर यांना मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (वर्ष २००५)

सूक्ष्मातील स्पंदने अभ्यासून श्री दुर्गादेवीची सात्त्विक मूर्ती बनवण्याविषयी सनातनचे साधक-मूर्तीकार श्री. गुरुदास खंडेपारकर यांना मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले. ही मूर्ती अपूर्णावस्थेत असतांनाही तिच्यात जिवंतपणा असल्याची अनुभूती अनेकांनी घेतली आहे !

 

देवतांची सात्त्विक चित्रे काढण्याविषयी मार्गदर्शन

ppdr_chitrakala_700
सनातनच्या कलाकार साधिका सौ. जान्हवी रमेश शिंदे यांना चित्रातील बारकावे सांगतांना परात्पर गुरु डॉ. आठवलेे
देवतांची सात्त्विक चित्रे काढण्याविषयी मार्गदर्शन

प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या साधिका सौ. जान्हवी शिंदे आणि अन्य साधक-कलाकार यांनी श्री गणपति, श्रीराम, श्रीकृष्ण, मारुति, शिव, श्री दुर्गादेवी, दत्त अन् श्री लक्ष्मीदेवी या देवतांची चित्रे साकारली. या चित्रांत २७ ते २९.३ टक्के इतके त्या त्या देवतेचे तत्त्व आले आहे. (कलियुगात देवतेच्या चित्रात अधिकाधिक ३० टक्के एवढेच देवतातत्त्व येऊ शकते.)

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कलांमध्ये पारंगत साधक-कलाकार त्यांच्या कलेचे सात्त्विक सादरीकरण होण्याविषयी संशोधन करत आहेत.

 

चित्रकला आणि मूर्तीकला

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधक-कलाकारांनी बनवलेल्या विष्णु, लक्ष्मी, श्रीराम, मारुति, श्रीकृष्ण, शिव, दुर्गादेवी, गणपति आणि दत्त या नऊ देवतांची चित्रे, विविध देवतांची तत्त्वे असणार्‍या रांगोळ्या, तसेच श्री गणेशाची मूर्ती यांमध्ये त्या त्या देवतेचे तत्त्व, तसेच शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती अधिकाधिक यावे, यासाठी प्रत्येक टप्प्याला मार्गदर्शन केले. येत्या १ – २ वर्षांत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मूर्तीकार-साधक श्री दुर्गादेवीचे मारक तत्त्व असलेली मूर्ती बनवणार आहेत.

 

रांगोळीच्या सात्त्विक कलाकृती काढण्याविषयी मार्गदर्शन

डावीकडून कु. कुशावर्ता माळी आणि कु. संध्या माळी यांना रांगोळी सात्त्विक होण्यामागील शास्त्र सांगतांना परात्पर गुरु डॉ. आठवले

सात्त्विक रांगोळ्यांमुळे देवतांची तत्त्वे आणि चैतन्य, आनंद आदी स्पंदने आकृष्ट अन् प्रक्षेपित होऊन उपासकाला आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या साधिका कु. कुशावर्ता माळी आणि कु. संध्या माळी यांनी स्पंदनांचा अभ्यास करून विविध देवतांशी संबंधित रांगोळ्यांच्या सात्त्विक कलाकृती बनवल्या आहेत. यांत सरासरी ३ ते ४ टक्के एवढे देवतेचे तत्त्व आणि स्पंदने आली आहेत. श्री गणेशाच्या एका रांगोळीत तर १० टक्के गणेशतत्त्व आले आहे. कलियुगात रांगोळीमध्ये अधिकतम १० टक्के देवतातत्त्व व स्पंदने येऊ शकतात. (या कलाकृती ‘सात्त्विक रांगोळ्या’ या ग्रंथमालिकेत प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.)

 

सात्त्विक अक्षरे आणि अंक, तसेच सात्त्विक मेंदी

कलियुगात अक्षरे किंवा अंक यांत अधिकाधिक ३० टक्केच सात्त्विकता येऊ शकते; मात्र परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातनच्या सौ. जान्हवी रमेश शिंदे यांनी सिद्ध केलेली देवनागरी अक्षरे आणि अंक यांत ३१ टक्के एवढी सात्त्विकता आली आहे ! सनातनने लहान मुलांसाठी ‘सात्त्विक देवनागरी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत’ हा ग्रंथ प्रकाशित केला आहे, तसेच ही अक्षरे आणि अंक यांवर आधारित संगणकीय लिपी बनवण्याची सेवाही चालू आहे. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘परात्पर गुरु डॉ आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन खंड १’)

अंकांमध्ये अधिकाधिक सात्त्विकता येण्यासाठी त्यांच्यातील सूक्ष्म-स्पंदनांचा अभ्यास करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सात्त्विक अक्षरे अन् अंक यांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच सात्त्विक मेंदीच्या कलाकृतीची निर्मिती करण्यात आली आहे.

 

संगीत

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध देवतांच्या नामजपांना त्या त्या देवतेचे तत्त्व, तसेच भाव आणि क्षात्रगितांना क्षात्रवृत्ती जागृत होईल, अशा चाली दिल्या. त्याबरोबरच शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांमुळे होणार्‍या विकारांवर संगीताद्वारे उपचार करण्याविषयी संशोधनही चालू आहे.

 

नृत्यकला

नृत्यातील विविध शारीरिक स्थिती आणि मुद्रा यांचा आध्यात्मिक दृष्टीने अभ्यास केला.

 

सूक्ष्मातील ज्ञान ग्रहण करता येत असल्यामुळे मार्गदर्शन करता येणे !

विविध विषयांवर मार्गदर्शन करता येण्यासंदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेले कारण

‘परात्पर गुरु डॉ. आठवले अनेक विषयांत मार्गदर्शन करतात, म्हणजे ते किती मोठे आहेत !’, असे बर्‍याच साधकांना वाटते. विषय कळण्यात माझा विविध विषयांचा अभ्यास इत्यादी काही नसून मला एकच गोष्ट ज्ञात आहे आणि ती म्हणजे ‘ईश्‍वरकृपेने सूक्ष्मातून ज्ञान कसे मिळवायचे ?’ त्यामुळे कोणत्याही विषयाचा अभ्यास न करता मला बहुतेक विषय अध्यात्माच्या भाषेत कळतात आणि सांगता येतात.

यावरून मला संत रहीम यांच्या ‘एकै साधे सब सधै, सब साधे सब जाय ।’ या ओळीची आठवण येते. तिचा आध्यात्मिक स्तरावरील अर्थ आहे, ‘एक (ईश्‍वरप्राप्ती) साध्य केले, तर सर्व साध्य होते. सर्व साध्य करायला गेलो, तर काहीच साध्य होत नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

अधिक माहितीसाठी वाचा सनातनचे ग्रंथ :

१. देवतांची तत्त्वे आकृष्ट आणि प्रक्षेपित करणार्‍या सात्त्विक रांगोळ्या आणि श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार असावी !
२. सात्त्विक मराठी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत अन् सात्त्विक मेंदी (२ भाग)
३. देवतांचा नामजप आणि उपासनाशास्त्र (३ भाग) आणि क्षात्रगीते या ध्वनी-चकत्या