परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्म आणि त्यांचे आध्यात्मिक प्रवृत्तीचे कुटुंब

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे
आनंदमय जीवन जगणारे कुटुंबीय सर्वांसाठी आदर्शवत् !

ppdr_parents_600
आई पू. (सौ.) नलिनी (पू. ताई) आणि वडील पू. बाळाजी (पू. दादा) आठवले (मुंबई, वर्ष १९८६)

शुद्ध बिजा पोटी ।
फळे रसाळ गोमटी । – (तुकारामगाथा, अभंग ३७, ओवी १)

या ओवीनुसार परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा जन्म ६ मे १९४२ (वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, कलियुग वर्ष ५०४४) या दिवशी श्री. बाळाजी वासुदेव आठवले (वर्ष १९०५ ते वर्ष १९९५) आणि सौ. नलिनी बाळाजी आठवले (वर्ष १९१६ ते वर्ष २००३) यांच्या पोटी झाला. ते दोघेही पुढे संतपदाला पोहोचले.

‘पू. बाळाजी (उपाख्य श्रीकृष्ण) वासुदेव आठवले, हे माझे वडील. त्यांना आम्ही दादा म्हणायचो. त्यांचा जन्म ९.९.१९०५ या दिवशी नाशिक येथे झाला. त्यांनी २८.१.१९९५ या दिवशी देहत्याग केला.

दादा (पातळी ८३ टक्के) आणि ताई (आईला आम्ही ताई म्हणायचो.) (पातळी ७५ टक्के) यांनी लहानपणापासून आम्हा पाचही मुलांवर व्यावहारिक शिक्षणासोबतच सात्त्विकतेचे आणि साधनेचे संस्कार केल्यामुळे आम्ही साधनारत झालो. आई-वडिलांचे भांडण झाल्याचे आम्ही पाचही भावंडांनी आयुष्यात एकदाही पाहिले नाही. एवढेच नव्हे, तर आम्हा पाच भावंडांतही कोणाचेही कोणाबरोबर कधीच भांडण झालेले नाही. आमचे एकमेकांवर प्रेमच होते आणि ते अजूनही आहे. आम्हा सर्वांवर दादा आणि ताई यांनी केलेल्या संस्कारांमुळेच हे झाले. १९९५ या वर्षी देहत्याग करीपर्यंत, म्हणजे १९६६ ते १९९५ या ३० वर्षांच्या कालावधीत त्यांनी बरेच लिखाण केले. जीवनातील शेवटची ५ वर्षे ते अंथरुणाला खिळून होते, तरी त्यांचे अध्यात्मशास्त्रावरील लिखाण चालू असे. उरलेल्या वेळेत त्यांचे वाचन आणि नामजप चालू असे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

कलियुगातील आदर्श कुटुंब !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे बालपणीचे छायाचित्र

पू. बाळाजी आठवले (प.पू. डॉ. आठवले यांचे वडील) यांचे कुटुंब त्यांच्या अलौकिक गुणवैशिष्ट्यांमुळे सर्वांनाच आदर्श आहे. अध्यात्मातील त्यांचे अपूर्व योगदान अन् त्यांनी समष्टीसाठी उपलब्ध करून दिलेली अनमोल ज्ञानसंपदा यांमुळे अखिल मानवजात त्यांची उपकृत आहे. – एक साधक

(पू. बाळाजी आठवले, त्यांच्या पत्नी पू. नलिनी (पू. ताई) आठवले आणि कुटुंबीय यांविषयीची सविस्तर माहिती सनातनच्या प.पू. डॉक्टरांचे सर्वांगांनी आदर्श आई-वडील आणि भाऊ या विषयाच्या ग्रंथमालिकेत आहे.)

खाली बसलेले (डावीकडून) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू आणि सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ वैद्याचार्य पू. डॉ. वसंत आठवले (वर्ष १९३३ ते वर्ष २०१३) यांनीदेखील साधना करून संतपद गाठले होते.

दुसरे मोठे बंधू श्री. अनंत आठवले यांची आध्यात्मिक पातळी (टीप) सध्या ६८ टक्के आहे, तर धाकटे बंधू कै. डॉ. सुहास आठवले (वर्ष १९४४ ते वर्ष २००७) यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती. सर्वांत धाकटे बंधू डॉ. विलास आठवले यांचीही आध्यात्मिक उन्नती झालेली असून तेही सर्वत्र जाऊन साधनेविषयी मार्गदर्शन करतात.

(टीप – आध्यात्मिक पातळी : कलियुगातील सर्वसाधारण व्यक्तीची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते आणि मोक्ष म्हणजे १०० टक्के आध्यात्मिक पातळी असे गृहित धरले, तर ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी असलेल्या व्यक्तीची संतत्वाच्या दिशेने वाटचाल चालू होते आणि संतांची आध्यात्मिक पातळी ७० टक्क्यांहून अधिक असते.)

ppdr_brothers_600
पाठीमागे उभे असलेले (डावीकडून) डॉ. विलास आणि डॉ. सुहास; बसलेले (डावीकडून) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, पू. डॉ. वसंत (अप्पाकाका) आणि श्री. अनंत (भाऊकाका), अभियंता (मुंबई, ९.१२.२००२)

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा
जीवनपट उलगडणारे पू. डॉ. वसंत बाळाजी आठवले !

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बालरोगतज्ञ पू. डॉ. वसंत बाळाजी आठवले यांनी वर्ष २००४ मध्ये त्यांचे लहान बंधू आणि सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे शिष्यत्व पत्करले. भाव, तीव्र तळमळ, जिज्ञासू वृत्ती आणि विनम्रता या गुणांमुळे ते १६ डिसेंबर २०१२ या दिवशी संतपदी विराजमान झाले. पू. डॉ. वसंत आठवले (पू. अप्पाकाका) यांचे परात्पर गुरु डॉ. आठवले हे लहान बंधू असूनही पू. अप्पाकाकांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ भाव आहे. त्यामुळेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी संतांच्या स्वभाववैशिष्ट्यांचे विविध पैलू उलगडणारे पुष्कळसे लिखाण पू. अप्पाकाका यांनी केले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये आणि कार्य (संक्षिप्त ओळख) हा पू. अप्पाकाकांनी (पू. वसंत आठवले यांनी) लिहिलेला ग्रंथ सनातनने मराठी भाषेत प्रकाशित केला आहे. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अध्यात्ममार्गावरील प्रवासाचे वर्णन करणारे हे चरित्र आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना करून जगभर हिंदु धर्माचा प्रसार करणे हे ध्येय उराशी बाळगलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सनातन संस्थेच्या स्थापनेनंतरचा जीवनपट यात सोप्या भाषेत उलगडून दाखवला आहे. रंगीत छायाचित्रांचा अंतर्भाव असलेला हा चरित्र-ग्रंथ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या राष्ट्र आणि धर्म संबंधित अजोड कार्याविषयी जिज्ञासा असलेल्या कोणाचेही समाधान करू शकतो !

 

श्रीमद्भगवद्गीतेवर सुगम विवेचन करणारा
‘गीताज्ञानदर्शन’ हा ग्रंथ लिहिणारे ती. भाऊकाका !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू तसेच ६६ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले श्री. अनंत आठवले (ती. भाऊकाका) यांनी गीतेवर गीताज्ञानदर्शन हा ग्रंथ लिहिला आहे. श्रीमद्भगवद्गीता म्हणजे हिंदु धर्म आणि नीतीशास्त्र यांविषयीचा मूलभूत ग्रंथ आणि महाभारताचा मुकुटमणी ! हिंदूंच्या या महान धर्मग्रंथाच्या प्रत्येक अध्यायातील तत्त्वज्ञान, साधना आणि तिचे फळ गीताज्ञानदर्शन या ग्रंथात सांगितले आहे. आवश्यक तेथे विषय स्पष्ट करणारे सुगम विवेचनही केले आहे. यामुळे सर्वसाधारणपणे कठीण वाटणारी गीता समजून घेणे सामान्य माणसालाही सोपे झाले आहे !

 

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे
शिक्षण आणि त्यांनी विद्यार्थीदशेत केलेले कार्य

इयत्ता ७ वीमध्ये माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रतिमास सहा रुपये, याप्रमाणे सतत ४ वर्षे शिष्यवृत्ती मिळाली. अकरावीपर्यंतचे शिक्षण चालू असतांना त्यांनी चित्रकलेच्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षा, तसेच राष्ट्रभाषा हिंदीची कोविद पदवीपरीक्षा उत्तीर्ण केली. शालान्त माध्यमिक परीक्षेतही ते गुणवत्ता सूचीत आले. १९६४ मध्ये त्यांनी एम्.बी.बी.एस्. ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली.

विद्यार्थीदशेत केलेल्या कार्याचा पुढील आयुष्यात झालेला लाभ

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विद्यार्थीदशेत विविध संघटनांमध्ये केलेल्या कार्याच्या अनुभवांचा त्यांना भविष्यातील अध्यात्मसाराच्या कार्याचे दायित्व सांभाळणे; आध्यात्मिक ग्रंथांचे संकलन करणे; सनातन भात नियतकालिकांचे संपादन करणे, तसेच हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी राष्ट्रेमी अन्धर्मेमी यांचे संघटन करणे, या कार्यासाठी लाभ झाला.

विद्यार्थीदशेत विविध संस्थांमध्ये सांभाळलेला कार्यभार

जीवनापासून ते वैद्यकीय पदवी प्राप्त करून नोकरीनिमित्त इंग्लंडमध्ये जाईपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध संस्थांमध्ये दायित्व घेऊन कार्य केले. या कार्याची संक्षिप्त सूची पुढे दिली आहे.

वर्ष

शाळा / संघटना

शाखा

कार्यभार

१९५६ – १९५७  आर्यन एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल, मुंबई.  आर्यसभा  वाचनालय मंत्री
१९५६ – १९५७   आर्यन एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल, मुंबई. आर्य संपादक मंडळ संपादक (विद्यार्थी प्रतिनिधी)
१९५८ – १९५९ विल्सन महाविद्यालय, मुंबई. ज्युनियर केमिस्ट्री असोसिएशन अध्यक्ष
१९५८ – १९५९  विल्सन महाविद्यालय, मुंबई.  हिंदी वाङ्मय मंडळ वर्गप्रतिनिधी
१९६५ यूथ फोरम (राजकीय पक्षांशी संबंधित नसलेली विद्यार्थ्यांची संघटना) अध्यक्ष
१९६९-१९७१ शिवसेना भारतीय विद्यार्थी सेना संघटक
१९७०-१९७१ आर्यन एज्युकेशन सोसायटी माजी विद्यार्थी संघ, मुंबई. कार्याध्यक्ष

 

वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनकार्य

मुंबईतील विविध रुग्णालयांत ५ वर्षे नोकरी केल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९७१ ते वर्ष १९७८ या कालावधीत ब्रिटनमध्ये नोकरीनिमित्त वास्तव्य केले. या काळात त्यांनी पुढील संशोधनकार्य केले.

अ. मनोविकारांवरील संमोहन-उपचारपद्धतींवर संशोधन केले.

आ. वापरून टाकून देण्यायोग्य (Use & Throw) कान तपासण्यासाठीचे प्लास्टिकचे उपकरण (डिस्पोझेबल ऑरल स्पेक्युलम्) वैद्यकीय शास्त्रात प्रथमच बनवले.

इ. वापरून टाकून देण्यायोग्य नाक तपासण्यासाठीचे प्लास्टिकचे उपकरण (डिस्पोझेबल नोझल स्पेक्युलम्) बनवण्याचा विचार चालू असतांना भारतात परतण्याचे ठरल्याने हे शोधकार्य अपुरे राहिले.