संत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आगामी काळ हा आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबीय आणि देशबांधव यांचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. या पार्श्वभूमीवर पुढील विचारमंथन निश्चितच लाभदायक ठरेल.
आपत्काळाला तोंड देता येण्यासाठी ग्रंथमालिकेचे प्रयोजन !
आपत्काळात दळणवळणाची साधने तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळाला तोंड देेण्याच्या सिद्धतेचा एक भाग म्हणून भावी आपत्काळात संजीवनी ठरणारी ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. आतापर्यंत यातील ११ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. सध्या आपत्काळाला काही प्रमाणात आरंभ झालेलाच आहे. आताच हा विषय नीट समजून घेतला, त्यातील शंकांचे निरसन करून घेतले आणि ग्रंथमालिकेत दिलेल्या विविध उपचारपद्धतींमध्ये प्रशिक्षित झालो, तर आगामी भीषण आपत्काळ निश्चितच सुसह्य होईल, याची निश्चिती बाळगा !
ग्रंथमालिकेतून शिकून घेतलेल्या उपचारपद्धती केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीही उपयुक्तच आहेत.
१. अग्नीशमन, प्रथमोपचार आणि
आपत्कालीन साहाय्य यांचे प्रशिक्षण देणारे ग्रंथ
सध्या गावागावात चिकित्सालये असतात. शहराशहरांमध्ये अग्नीशमन यंत्रणा उपलब्ध असतात. त्यामुळे बहुतेकांना अग्नीशमन, प्रथमोपचार आणि आपत्कालीन साहाय्य यांचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता वाटत नाही. आगामी आपत्काळाच्या दृष्टीने मात्र हे प्रशिक्षण घेणे अनिवार्य बनले आहे; कारण यामुळेच आपण जीवित आणि वित्त यांची होणारी अपरिमित हानी रोखू शकतो. सध्या हे प्रशिक्षण देणारी पुस्तके उपलब्ध असतात; परंतु सनातनच्या ग्रंथांत विषय अत्यंत सोप्या भाषेत आणि शास्त्रीय आधारे समजावला आहे.
२. बिंदूदाबन-उपचार, रिफ्लेक्सॉलॉजी
आणि मर्मचिकित्सा यांविषयीचे ग्रंथ
बिंदूदाबन-उपचार आणि रिफ्लेक्सॉलॉजी यांमध्ये शरिरातील विशिष्ट दाब-बिंदूंवर दाब देऊन उपाय करायचे असतात, तर मर्मचिकित्सा यामध्ये शरिरातील विशिष्ट मर्मस्थानांवर दाब द्यायचा असतो. त्यामुळे शरिरातील चेतनेच्या प्रवाहातील अडथळे दूर होऊन विविध शारीरिक अन् मानसिक त्रासांवर मात करता येते.
३. प्राणशक्तीवहन उपायांविषयीचा ग्रंथ
मानवाच्या स्थूलदेहात असलेल्या रक्ताभिसरण, श्वसन, पचन इत्यादी विविध संस्थांना कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते, ती प्राणशक्ती (चेतना) वहन संस्था पुरवते. तिच्यात अडथळे निर्माण झाल्यास विकार निर्माण होतात. ते अडथळे स्वतः शोधून दूर करण्याचे नाविन्यपूर्ण उपाय या ग्रंथात सांगितले आहेत. यामध्ये विकार बरा करण्यासाठी पंचतत्त्वांशी संबंधित मुद्रा, न्यास आणि नामजप करायचा असतो.
४. संमोहन उपचाराविषयीचे ग्रंथ
कित्येक जणांना निरर्थक विचारध्यास, निराशा, व्यसनाधीनता यांसारख्या मानसिक समस्या असतात. तोतरेपणा, दमा, लैंगिक समस्या यांसारख्या शारीरिक समस्यांमागेही बर्याचदा मानसिक कारणच असते. या समस्यांवर संमोहन उपचार केल्याने त्या बर्या व्हायला साहाय्य होते.
५. औषधी वनस्पतींची लागवड
तहान लागल्यावर विहीर खोदायची नसते, अशा आशयाची एक म्हण आहे. आगामी आपत्काळात औषधी वनस्पती उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच त्यांची लागवड घराच्या अंगणात वा परिसरात करणे आवश्यक आहे. तसेच हा विषय अनेकांपर्यंत पोहोचवून त्यांनाही यासंदर्भात कृतीशील करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सनातनने औषधी वनस्पतींची लागवड करा ! हा ग्रंथ प्रकाशित केला आहे.
६. ग्रंथमालिका व्याधींच्या निवारणासाठी विविध उपचारपद्धती
यामध्ये शारीरिक आणि मानसिक त्रासांवर उपयुक्त ठरतील अशा विविध उपचारपद्धती दिल्या आहेत. वाचकाला प्रत्येक व्याधी / त्रास यांवर उपयुक्त घरगुती आयुर्वेदीय उपाय, आसने, प्राणायाम, बिंदूदाबन-उपाय, मुद्रा-उपाय, देवतांचे नामजप, मंत्रोपचार इत्यादी उपचारपद्धतींविषयी एकाच ठिकाणी माहिती कळेल, हे या ग्रंथमालिकेचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. या ग्रंथमालिकेत दिलेल्या पद्धतींनुसार उपचार केल्यास रुग्ण बरे होऊ शकतील किंवा त्यांचा त्रास सुसह्य होईल. या ग्रंथमालिकेतील काही उपचारपद्धतींचा थोडक्यात ऊहापोह पुढे केला आहे.
६ अ. सोपे घरगुती आयुर्वेदीय उपचार
यामध्ये घरात, परसात, तसेच जवळच्या परिसरात उपलब्ध असलेल्या भाज्या, धान्य, मसाले, फळे, औषधी वनस्पती आदींद्वारे उपचार करण्याविषयीचे मार्गदर्शन केले आहे.
६ आ. पुष्पौषधी
यात स्वभावदोष तसेच मनोविकार यांवर लाभदायक असलेल्या तयार पुष्पौषधींचे विवेचन केले आहे. ही औषधे होमिओपॅथीच्या औषधांप्रमाणे असतात.
६ इ. फिजिओथेरपीचे व्यायामप्रकार,
योगासने, बंध, प्राणायाम आणि शुद्धीक्रिया (षट्क्रिया)
आधुनिक जीवनशैलीमुळे सध्या लोकांच्या अनारोग्याचे प्रमाण अतिशय वाढले आहे. २५-३० वर्षांचे अनेक तरुण-तरुणीही मानदुखी, पाठदुखी, बद्धकोष्ठता, निद्रानाश आदी विकारांनी त्रस्त दिसतात. अॅलोपॅथीच्या औषधांचे दुष्परिणामही समोर येत आहेत. अशा परिस्थितीत शेकडो वर्षांची परंपरा लाभलेले योगशास्त्र हे एक वरदानच आहे. यासाठी ग्रंथमालिकेत विविध शारीरिक, मानसिक, तसेच मनोकायिक विकारांवर योगोपचार पद्धत (उदा. आसने, बंध, प्राणायाम, शुद्धीक्रिया) कशी अवलंबावी, याचे विवेचन केले आहे.
६ ई. मुद्रा-उपचार
मनुष्यदेह पंचतत्त्वांनी बनलेला आहे. पंचतत्त्वांपैकी कोणत्याही तत्त्वाचे देहातील प्रमाण अल्प किंवा अधिक झाले, तर त्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकार उद्भवतात. हातांची बोटे विशिष्ट स्थितीत ठेवून केलेल्या मुद्रेमुळे मनुष्याला स्वतःच्या देहातील पंचतत्त्वांचे संतुलन राखणे शक्य होते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रासांचे निवारण होण्यास साहाय्य होते.
६ उ. देवतांचे नामजप आणि
बीजमंत्र, तसेच पुराणोक्त अन् वेदोक्त मंत्र
विशिष्ट मंत्राच्या आधारे जीवनातील समस्या दूर करणे अथवा व्याधीवर उपाय करणे, हा प्राचीन काळापासून हिंदु धर्मात सांगितलेला उपाय आहे. ग्रंथमालिकेत शारीरिक आणि मानसिक त्रासांच्या निवारणासाठी नामजप आणि मंत्र दिले आहेत, तसेच चांगले आरोग्य लाभावे, भविष्यात येणारी संकटे टळावीत आदींसाठीही मंत्र दिले आहेत.
६ ऊ. अन्य उपचारपद्धती
चुंबक चिकित्सा, स्वमूत्रोपचार, रिकाम्या खोक्यांचे उपाय, पिरॅमिड चिकित्सा, ज्योतिषशास्त्रानुसार उपाय, रेकी इत्यादी उपचारपद्धतीही दिल्या आहेत.
७. अग्निहोत्र या विषयावरील ग्रंथ
आगामी तिसर्या महायुद्धात अण्वस्त्रांपासून निघणार्या किरणोत्सर्गाचा प्रभाव नष्ट करू शकेल, असा सोपा अन् अल्प वेळेत होणारा यज्ञविधी म्हणजे अग्निहोत्र ! सनातनच्या अग्निहोत्र या ग्रंथाद्वारे अग्निहोत्राचे महत्त्व समजून घेऊन तो केल्यास आपत्काळात परिवाराचे रक्षण होण्यात साहाय्य होईल.
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ करून घ्या !
आगामी काळाची पावले ओळखून मानवजातीच्या कल्याणासाठी भावी आपत्काळात संजीवनी ठरणारी ग्रंथमालिका प्रसिद्ध करण्याचा, एवढा दूरदृष्टीचा विचार परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्यासारखे संतच करू शकतात ! हे उपाय श्रद्धापूर्वक केल्यास त्यांचे फळही अवश्य मिळेल, याची निश्चिती बाळगा !
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पन्थाः ।
– यक्षप्रश्न, श्लोक ११७
अर्थ : धर्माची तत्त्वे सामान्य माणसाला समजण्यास गूढ असल्याने थोर माणसे ज्या मार्गाचा अवलंब करतात त्याच मार्गाने आपणही जावे.
भावार्थ : परात्पर गुरु प.पू. डॉक्टरांसारख्या थोर विभूतीने आपत्काळातून तरून जाण्यासाठी सुचवलेले उपाय आचरणात आणण्यातच आपले कल्याण आहे.
आपत्काळ ओढवण्यामागील कारणमीमांसा
जाणून साधना वाढवा आणि ईश्वरी राज्य स्थापा !
अतिवृष्टिः अनावृष्टिः शलभा मूषकाः शुकाः ।
स्वचक्रं परचक्रं च सप्तैता ईतयः स्मृताः ॥
– कौशिकपद्धति
अर्थ : (राज्यकर्ता धर्मनिष्ठ नसला की, प्रजा धर्मपालन करत नाही. प्रजेने धर्माचे पालन न केल्यामुळे) अतीवृष्टी, अनावृष्टी (दुष्काळ), टोळधाड, उंदरांचा त्रास, पोपटांचा उपद्रव, आपापसांत लढाया आणि शत्रूचे आक्रमण, अशी सात प्रकारची संकटे (राष्ट्रावर) येतात.
तात्पर्य, प्रजा आणि राजा, दोन्हीही धर्मपालक आणि साधना करणारे हवेत. तरच आपत्काळाची तीव्रता अल्प होईल किंवा आपत्काळ सुसह्य होईल.
१. मुद्रा-उपाय, मंत्रजप आदी उपाय हे सूक्ष्म-स्तरावरील उपाय असल्याने या उपायांचा अपेक्षित परिणाम होण्यासाठी उपाय करणार्यामध्ये श्रद्धा, भाव यांसारखे ईश्वरी गुणही असावे लागतात. ते साधनेमुळेच निर्माण होऊ शकतात.
२. सध्याचा समाज धर्माचरणापासून दुरावला आहे. त्यामुळे राष्ट्र आणि धर्म यांच्यावर अनेक संकटे ओढवली आहेत. एकेका संकटाचा प्रतिकार करण्यापेक्षा संपूर्ण समाजाला नीतीमान बनवणारे, म्हणजे सर्व संकटांचा समूळ नाश करणारे आणि विश्वकल्याणाचे ध्येय बाळगणारे धर्माधिष्ठित ईश्वरी राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापणे, हाच यावरील एकमेव उपाय आहे. यासाठी सर्वांनी धर्मपालक आणि नीतीमान राज्यकर्त्यांनाच निवडून दिले पाहिजे.
प्रार्थना !
सर्वांमध्ये आगामी भीषण आपत्काळाविषयीचे गांभीर्य निर्माण व्हावे आणि सनातनच्या ग्रंथमालिकेचा लाभ करून घेऊन आपत्काळाला तोंड देण्याची क्षमता निर्माण व्हावी, ही परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी भावपूर्वक प्रार्थना !
– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.३.२०१३)