पनवेल – मणदूर, तालुका शिराळा (जिल्हा सांगली) येथील प्रखर हिंदुत्ववादी ह.भ.प. श्री अनिल महाराज देवळेकर यांनी १७ एप्रिल या दिवशी सकाळी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना आश्रमातील विविध विभागांची माहिती सनातनचे साधक श्री. ओंकार कापशीकर यांनी करून दिली. ह.भ.प. अनिल महाराज हे ह.भ.प. वक्ते महाराज यांचे अनुयायी असून प्रखर हिंदुत्ववादी विचार कीर्तनातून मांडतात. तसेच ते पू. भिडेगुरुजींच्या मार्गदर्शनानुसार हिंदु तरुणांचे संघटन आणि दुर्गामाता दौडीचे आयोजन करतात. “आश्रम पाहून त्यांना दैवी भूमीत आल्यासारखे वाटले”, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी आश्रमात चाललेले कार्य त्यांनी आस्थेने जाणून घेतले. ह.भ.प. महाराज त्यांच्या कार्यक्रमाला अनुमती मिळवण्यासाठी गेल्यावर पोलीस त्यांना “तुम्ही सनातनचे कार्य करतात का”, असे विचारतात, तेव्हा ते अभिमानाने ‘हो’ म्हणून सांगतात. या वेळी ते म्हणाले, “लव्ह जिहादविषयी अजून व्यापक कार्य करायचे आहे, सनातनच्या साधकांना मिळत असलेला आनंद आणि साधनेचे तेज त्यांच्या तोंडावळ्यावर जाणवते. साधकांच्या त्यागाने हिंदु राष्ट्र लवकर येईल. आज देवालयात आल्याचे समाधान मिळाले. प्रत्येक हिंदूने ‘सनातन प्रभात’चे वाचन केले पाहिजे आणि हिंदु राष्ट्राकरता कार्यात सहभागी झाले पाहिजे.”