शनिशिंगणापूर येथील माजी महिला सरपंचांची देवद (पनवेल) येथील आश्रमाला भेट !

sarpanch_shanishingnapur

दैनिक सनातन प्रभातविषयी जाणून घेतांना
उजवीकडून दुसर्‍या माजी सरपंच आणि अन्य महिला

 देवद, पनवेल (वार्ता.) – श्री शनिशिंगणापूरच्या माजी सरपंच सौ. पुष्पाताई बानकर आणि सौ. कमलाबाई साबळे यांनी येथील सनातनच्या आश्रमाला ११ एप्रिलच्या रात्री सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासमवेत सौ. जनाबाई बानकर, सौ. संगीता साबळे, सौ. भीमाबाई साबळे, सौ. लहानुबाई डांगे, सौ. उषाताई ढोले, सौ. मंगलाताई बानकर, सर्वश्री दादासाहेब घायाळ, पांडुरंग साबळे, भीमराज महाले, भाऊसाहेब फलके हेही आश्रमदर्शनासाठी आले होते. त्या दिवशी दुपारी आझाद मैदान येथे रणरागिणीच्या वतीने घेण्यात आलेल्या धर्मपरंपरा रक्षणासाठीच्या आंदोलनातही त्या सहभागी झाल्या होत्या.
     आंदोलनानंतर रात्री उशिरा येऊनही त्या सर्वांनी तितक्याच उत्साहाने आश्रमात चालणार्‍या सेवा जाणून घेतल्या आणि विभागांनाही भेट दिली. सर्वांनीच “आश्रम आवडला”, असे सांगितले. सर्वांना सनातनचे लघुग्रंथ भेट म्हणून देण्यात आले.