मानवाची जाणीव दिवस-रात्र कार्यरत असते. ही वैयक्तिक जाणीव आतील वैश्विक जाणिवेशी सतत जोडलेली असते. त्यामुळे माणसाला मीची जाणीव प्रत्येक सेकंदाला असते. आपण एखाद्या चांगल्या रस्त्यावरून चालत असतांना भूमीच्या स्पर्शाची जाणीव आपल्या मनाला आनंद देणारी असते; परंतु त्याच रस्त्यावर पुष्कळ खडक असतील, तर अशा रस्त्यावर एकही पाऊल चालणे कठीण आहे. ही आपल्या स्थूलदेहाला होणारी जाणीव असते; परंतु या सर्वांपेक्षा वरची अशी असामान्य जाणीव असते. तिला सूक्ष्म जाणीव असेही म्हणतात. ही जाणीव आध्यात्मिक प्रगतीमुळे साध्य होते. ही जाणीव जागृत झाल्यामुळे मानवाला वातावरणातील दैवी ऊर्जा आणि त्रासदायक ऊर्जा यांची खरी जाणीव होण्यास प्रारंभ होतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांच्या पलीकडील सूक्ष्मातील अनुभूती येतात. माणसाची अध्यात्मात जसजशी प्रगती होऊ लागते, तसतशी या जाणिवेची पातळीही उंचावत जाते. अशाच एका जाणिवेची आलेली अनुभूती येथे दिली आहे.
१. रामनाथी आश्रमातील मार्गिकेत चालतांना डोके जड
होऊन चक्कर येणे, एक संतसेवा करत असलेल्या खोलीत
चालतांना उत्साह जाणवणे आणि एका संतांच्या खोलीत पाऊल
टाकताक्षणी शरीर हलके होऊन मन निर्विचार होणे
३.३.२०१६ ला रामनाथी आश्रमातील मार्गिकेतून चालतांना काय जाणवते ? त्यानंतर एक संत सेवा करत असलेल्या खोलीत आणि एक संत वास्तव्य करत असलेल्या खोलीत चालल्यानंतर काय जाणवते ?, असा प्रयोग केला. मार्गिकेतून चालल्यावर डोके जड होऊन चक्कर आल्याप्रमाणे झाले. एक संत सेवा करत असलेल्या खोलीत चालल्यानंतर थोडासा उत्साह जाणवला आणि एक संत वास्तव्य करत असलेल्या खोलीत पाऊल टाकताक्षणी शरीर हलके झाल्याप्रमाणे जाणवलेे अन् काही वेळाने मन निर्विचार झाल्याप्रमाणे जाणवले.
२. मार्गिकेत चालतांना सूर्यनाडी, एक संत सेवा करत
असलेल्या खोलीत चंद्रनाडी आणि एक संत वास्तव्यास
असलेल्या खोलीत सुषुम्ना नाडी कार्यरत असल्याचे लक्षात येणे
३.३.२०१६ या दिवशी सकाळी वरील प्रयोगाचा देहावर काय परिणाम होतो ?, हे अभ्यासण्यासाठी कोणती नाडी कार्यरत आहे ?, हे पाहिले असता मार्गिकेमध्ये चालतांना सूर्यनाडी कार्यरत होती. त्यानंतर एक संत सेवा करत असलेल्या खोलीत गेल्यावर लगेचच चंद्रनाडी कार्यरत होती. हा प्रयोग मी ३ – ४ वेळा करून पाहिला; पण परिणाम तसाच होता. त्यानंतर एक संत वास्तव्य करत असलेल्या खोलीत लगेचच सुषुम्ना नाडी कार्यरत होत होती. कार्यरत झालेल्या सुषुम्ना नाडीचा परिणाम १ घंटा २० मिनिटे टिकून राहिला, अशी अनुभूती आली.
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.३.२०१६)
३. साधिकेला वरील अनुभूती
येण्यामागील आध्यात्मिक कारणमीमांसा
३.३.२०१६ या दिवशी एक संत खोलीमध्ये ग्रंथ लिखाणाची सेवा करत असतांना त्यांनी स्वतःची कोणती नाडी कार्यरत आहे ?, हे पाहिले असता त्यांनाही स्वतःची सुषुम्ना नाडी कार्यरत असल्याचे जाणवले. यावरून साधिकेला आलेली अनुभूती योग्य असल्याचे लक्षात येते.
३ अ. चंद्रनाडी चालू असल्यामुळे देहामध्ये सत्त्वगुण कार्यरत होणे
इडा नाडीलाच डावी नाडी किंवा चंद्रनाडी असे म्हणतात. हिचे खालचे तोंड मूलाधारचक्रात उघडते. मूलाधारचक्रापासून आज्ञाचक्रापर्यंत ही नाडी शरिराच्या डाव्या बाजूला असते. आज्ञाचक्राच्या पातळीला ती डोक्याच्या पुढच्या भागात येऊन पुढे सहस्रारचक्रातील ब्रह्मविवरात उघडते. ब्रह्मविवर मेंदूच्या मध्यभागी असते. हा मेंदूचा, म्हणजे स्थूलदेहाचा भाग नसतो, तर ते सूक्ष्म विवर आहे. चंद्रनाडीवाटे सहस्रारातील क्रियाशक्ती कार्यरत होते आणि त्यामुळे देहामध्ये सत्त्वगुण कार्यरत होतो.
३ आ. सूर्यनाडी चालू असल्यामुळे देहामध्ये
रज-तमात्मक स्पंदनांचे प्रक्षेपण होणे
पिंगला नाडीलाच सूर्यनाडी किंवा उजवी नाडी असेही म्हणतात. हिचे खालचे तोंड मूलाधारचक्रात उघडते. आज्ञाचक्राच्या पातळीला ती डोक्याच्या पाठच्या भागात येऊन पुढे सहस्रारातील ब्रह्मविवरात उघडते. तिच्यावाटे मूलाधारचक्रातील इच्छाशक्ती कार्यरत होते आणि त्यामुळे देहामध्ये रजोगुण कार्यरत होतो.
३ इ. सुषुम्ना नाडी कार्यरत असतांना श्वासाचे संतुलन साधले जाणे
आणि सुषुम्नेतून शक्तिप्रवाह वाहू लागल्यावर कुंडलिनीजागृती होणे
सुषुम्ना नाडीला मध्य नाडी किंवा ब्रह्मनाडी असेही म्हणतात. ब्रह्माकडे जाण्याच्या मार्गातील ते द्वार असल्यामुळे त्याला ब्रह्मद्वार असे म्हणतात. निद्रिस्त कुंडलिनीच्या साडेतीन वेटोळ्यांनी महाद्वार बंद असते, म्हणजे कार्य न करणारी शेष शक्ती तिच्यात असते. सुषुम्ना नाडी कार्यरत असणे, हे श्वासाचे संतुलन दर्शवते. जेव्हा सुषुम्नेतून शक्तिप्रवाह वाहू लागतो, तेव्हा पश्चिम मार्ग उघडला गेला, असे म्हणतात, यालाच कुंडलिनीजागृती झाली, असे म्हणतात.
(संदर्भ : अध्यात्मशास्त्र, प्रकरण – कुंडलिनीजागृती)
(संदर्भ : अध्यात्मशास्त्र, प्रकरण – कुंडलिनीजागृती)
४. चैतन्यमय वास्तूंमध्ये सुषुम्ना नाडी
कार्यरत होऊन कुंडलिनीजागृती होणे
मंदिरे, संतांची समाधीस्थळे आणि संत रहात असलेले आश्रम चैतन्यमय झालेले असतात अन् सर्वत्र चैतन्याचे प्रक्षेपण करून तेथील वास्तूला पावन करत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी श्वासाचे संतुलन आपोआपच साधले जाते. त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. त्यामुळे सुषुम्ना नाडी कार्यरत होऊन कुंडलिनीजागृती होते.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
तज्ञ, अभ्यासू आणि वास्तुशास्त्राच्या
संदर्भात शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना
वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करण्यासंदर्भात विनंती !
रामनाथी आश्रम, अन्य सेवाकेंद्रे आणि साधकांची घरे येथे सूक्ष्म स्तरावरील विविध अनुभूती येतात. येथे एकाच वास्तूमध्ये; पण विविध ठिकाणी चालत गेल्यावर येणार्या अनुभूती वेगवेगळ्या आहेत.
१. एकाच वास्तूमध्ये; पण निरनिराळ्या ठिकाणी चालत गेल्यावर देह आणि मन यांना वेगवेगळ्या अनुभूती येण्यामागील वैज्ञानिक कारण काय ?
२. या खोल्यांतील वातावरणात असा काय पालट होतो किंवा प्रक्रिया काय घडते की, ज्यामुळे वरील अनुभूती येतात ?
३. सूक्ष्म स्तरावर तेथील व्यक्तींवर काय परिणाम होतो ?
४. वास्तूमध्ये होणार्या पालटांचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करावे ?
या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.
– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२. या खोल्यांतील वातावरणात असा काय पालट होतो किंवा प्रक्रिया काय घडते की, ज्यामुळे वरील अनुभूती येतात ?
३. सूक्ष्म स्तरावर तेथील व्यक्तींवर काय परिणाम होतो ?
४. वास्तूमध्ये होणार्या पालटांचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करावे ?
या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.
– व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
(संपर्क : श्री. रूपेश रेडकर, ई-मेल : [email protected])