१ एप्रिल हा दिन अर्थात एप्रिलफूल या पाश्‍चात्त्य प्रथेमागील इतिहास !

april-fool-day

साहित्यात १ एप्रिलच्या या वैशिष्ट्याचा उल्लेख सर्वप्रथम वर्ष १९३२ मध्ये कँटरबरी टेल्स नामक पुस्तकात झाला असल्याचे सांगितले जाते. हे खरे मानले, तर मूर्खपणाला वर्षातून एक दिवस सन्मानाचे स्थान देण्याच्या या परंपरेला या वर्षी साधारण ८० वर्षे होतात. (वर्ष २०१६ मध्ये या परंपरेला ८४ वर्षे होत आहेत. – संपादक) आणखी काही शहाण्यांनी आपला वेळ घालवला आणि शोधून काढले ते असे की, वर्ष १५६४ मध्ये फ्रान्सने आपली दिनदर्शिका पालटली. तोवर तिथे नव्या वर्षाचा आरंभ १ एप्रिलला होत असे. मार्च मासात सगळा जुना हिशोब चुकता करून नव्या व्यवहाराची नांदी होत असे. वर्ष १५६४ मध्ये यात पालट होऊन जानेवारी हा वर्षाचा आरंभ मानला जाऊ लागला. या नव्या वर्षाचा ज्यांना विसर पडत असे, त्यांची खिल्ली उडवण्यासाठी म्हणून त्यांच्या पाठीवर कागदी मासा चिकटवला जात असे आणि त्याला एप्रिल फिश असे चिडवले जात असे. या फिशचे फूल केव्हा झाले, याचा कोणत्याही शहाण्याला अद्याप शोध लागलेला नाही आणि मूर्ख लोक असल्या शोधात वेळ घालवण्याचा मूर्खपणा करण्याच्या फंदात पडत नाहीत. वर्ष पालटून जानेवारी मास सर्वत्र स्वीकारला गेला असला, तरीही मार्च समाप्तीची (एन्डिंगची) पद्धत मात्र चालूच आहे. (लोकसत्ता, २.४.२०११)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात