समोरच्या बाजूने अंदमान येथील सेल्युलर कारागृह
कारागृहात सावरकरांना ठेवलेली खोली
सावरकर कोठडी
क्रांतीकारकांनी अशा प्रकारे यांतना सोसल्या
कैद्यांना शिक्षा म्हणून ओढावा लागणारा कारागृहातील कोलू
कारागृहाचा आतील भाग
अंदमान हे समस्त देशभक्तांचे स्फूर्तीस्थान ! स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमातेच्या मुक्ततेसाठी अनेक मरणप्राय यातना सोसल्या, ती हीच भूमी ! त्यामुळेच अंदमानाच्या या सेल्युलर कारागृहाकडे पाहिल्यानंतरही देशप्रेम जागृत होते. त्यांनी देशासाठी सोसलेले आघात आठवतात. आज आझादीच्या घोषणा देऊन देशाशी गद्दारी करणारे ही खरी आझादी मिळवण्यासाठी लढणार्या स्वातंत्र्य सैनिकांपेक्षा किती खुजे आहेत, त्याची जाणीव होते.
१९०६ मध्ये सातशे कैदी मावतील एवढ्या कारागृहाची उभारणी झाली. सात विभाग असलेली तीन मजली तुरुंगाची इमारत गच्चीवरून पहातांना सायकलीच्या चाकातील आर्यांप्रमाणे दिसते. येथे ब्रिटीश भारतीय कैद्यांचा अत्यंत अमानुष छळ करत असत. त्यामुळेच त्या शिक्षेला काळ्या पाण्याची शिक्षा असे म्हणत असत.
क्रांतीची प्रेरणा देणारी वीर सावरकर यांची वास्तू आणि
राष्ट्रकार्यासाठी झटतांना त्यांनी वापरलेल्या वस्तू यांचा छायाचित्रात्मक वृत्तांत !
- हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदूंनी कृतीशील होणे हीच सावरकरांना खरी मानवंदना ठरेल !
- वयाच्या केवळ १५ व्या वर्षीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘सशस्त्र क्रांतीची शपथ घेणारे पहिले क्रांतीवीर’ सावरकर होते !
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांची संग्रहित छायाचित्र
दादर (मुंबई) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निवासस्थान, वस्तू संग्रहालयातील त्यांच्या वापरातील वस्तू आणि त्यांचे हस्तलिखित वाचकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करत आहोत. या वस्तूंच्या माध्यमातून सावरकर आजही आपल्यात आहेत. त्यांच्या वस्तू केवळ प्रदर्शन म्हणून पाहणे नव्हे, तर त्यांतून सावरकर यांच्या प्रमाणेच राष्ट्रकार्यासाठी प्रेरित होणे आवश्यक आहे !