राष्ट्राची सहस्रो वर्षांची भौतिक आणि आध्यात्मिक समृद्धी
स्वातंत्र्यानंतर नष्ट करून राष्ट्राला सर्व क्षेत्रांत भुकेकंगाल करणारी
राज्यपद्धती नको, तर सत्त्वप्रधान हिंदु राष्ट्र हवे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
१. भौतिक सद्यस्थिती
एखाद्या उधळ्या व्यक्तीने आपली पूर्वजांची सर्व संपत्ती उधळून टाकून आपल्या मुलांना आणि नातवंडांना भिकारी करावे, तशीच स्थिती स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सर्वपक्षीय शासनांनी भारताची केली आहे, उदा. शेकडो वर्षांची गोवंश-समृद्धी तात्कालिक लाभासाठी सर्वत्र कत्तलखाने उभारून, गोहत्या करून गोवंश नष्ट करत आणला आहे. पुढे दूधही विदेशातून आयात करावे लागेल ! पिढ्यान्पिढ्या वाढवलेल्या वृक्षांची तोड करून भारताचे पर्यावरण इतके बिघडवले आहे की, आता अवर्षणाचे प्रमाण वाढत चालले आहे. एके काळी पृथ्वीवरील अनेक देशांतून शिक्षणासाठी विद्यार्थी येणारा देश म्हणून भारताची ओळख होती. भारत जगद्गुरु होता. आता भारतातील विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशांत जातात !
१ अ. भारताची स्वातंत्र्याच्या वेळची स्थिती आणि आताची केविलवाणी स्थिती
एखाद्या उधळ्या व्यक्तीने आपल्या पूर्वजांची सर्व संपत्ती उधळून टाकून आपल्या मुलांना आणि नातवंडांना भिकारी करावे, तशीच स्थिती स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी सर्वच क्षेत्रांत भारताची केली आहे. हे खालील सारणीवरून लक्षात येईल.
टीप १ : याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली, तरी ही संख्या आजच्या तुलनेत अत्यल्प होती.
टीप २ : स्वातंत्र्यापासून वर्ष १९९५ पर्यंत बलात्काराची वेगळी आकडेवारी ठेवण्याची आवश्यकता शासनाला वाटत नव्हती, इतके हे प्रमाण अल्प होते. त्यानंतर बलात्कारांचे वाढते प्रमाण पाहून १९९८ मध्ये बनवलेल्या कायद्यानुसार १९९५ च्या बलात्काराच्या घटनांचा दर शासनाने घोषित केला.
२. आध्यात्मिक सद्यस्थिती
स्वातंत्र्यापूर्वी बहुतेक सर्वजण साधना करणारे प्रजा सात्त्विक होती. त्यामुळे मनुष्यजन्माचे खरे सार्थक होत असे. आता प्रजाच नाही, तर अनेक साधूही रज-तमप्रधान आहेत !
३. उपाय
स्वातंत्र्यानंतरच्या लोकशाही राज्यव्यवस्थेत व्यक्ती, समाज, निसर्ग आदी सर्वच घटकांची अधोगती झाली, म्हणजे देशाची सर्वार्थाने उन्नती करण्यात निधर्मी लोकशाही केवळ अपयशी ठरली असे नव्हे, तर समस्या अधिक तीव्र बनल्या. एखाद्या वैद्याच्या औषधांनी रोग बरा होत नसेल, तर वैद्य पालटतात. त्याचप्रमाणे देशहित आणि समाजस्वास्थ्य यांसाठी चांगली राज्यव्यवस्था स्थापित करायला हवी. भारतातील प्राचीन राजा-महाराजांनी धर्माधिष्ठित राज्यकारभार केला. त्याचा परिणाम म्हणजे आज निर्माण झालेल्या कोणत्याच समस्या त्या काळी नव्हत्या आणि समाजही सुखी-समाधानी होता.
स्वातंत्र्यानंतरच्या काळात निर्माण झालेल्या सर्व समस्यांवर एकच उपाय आहे आणि तो म्हणजे धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना !
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात