रामनाथी, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – गोव्यातील दैनिक गोमन्तकचे निवासी संपादक श्री. श्रीराम पचिंद्रे यांनी २१ फेब्रुवारीला सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील सनातन आश्रमाला भेट दिली आणि आश्रमात चालणारे राष्ट्र अन् धर्म विषयक कार्य जाणून घेतले. श्री. श्रीराम पचिंद्रे यांच्यासोबत दैनिक गोमन्तकचे उपसंपादक तथा ग्रंथपाल श्री. संजय घुग्रेटकर यांनीही आश्रमातील कार्य पाहिले. सनातन प्रभात नियतकालिकांचे माजी समूहसंपादक डॉ. दुर्गेश सांमत यांनी त्यांना आश्रमात चालणार्या कार्याविषयी माहिती दिली.
आश्रमातील साधना आणि कार्य पाहून मन प्रसन्न झाले ! – श्री. श्रीराम पचिंद्रे
आश्रमातील साधना, तसेच चाललेले कार्य पाहून मन प्रसन्न झाले. आश्रमातील शांतता आणि सात्त्विक वातावणाने पुष्कळ बरे वाटले, असा अभिप्राय श्री. श्रीराम पचिंद्रे यांनी आश्रमातील कार्य पाहिल्यानंतर व्यक्त केला. आपल्या हिंदु संस्कृतीचे नेमके दर्शन झाले. आपले विविध उपक्रम निश्चितपणे योग्य दिशेने चालले असून आजच्या परिस्थितीला चांगले वळण मिळेल. उपयुक्त माहिती दिल्याविषयी धन्यवाद, असे श्री. संजय घुग्रेटकर या वेळी म्हणाले.