या लेखात बिंदूदाबन उपायाविषयीच्या महत्त्वपूर्ण अशा काही सोप्या कृती दिल्या आहेत.
१. बिंदूदाबन उपायातील दैनंदिन कृती
स्वतः करता येणाऱ्या आणि स्वास्थ्य टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा काही सोप्या कृती पुढे दिल्या आहेत.
- तोंड बंद ठेवून दात आणि ओठ यांच्या मधल्या भागावर जीभ फिरवून तो स्वच्छ करण्याचा प्रयत्न करावा. ही क्रिया १ – २ मिनिटे करावी.
- तोंड बंद ठेवून ३० ते ४० वेळा दात एकमेकांवर आपटावेत.
- दोन्ही तळहात २० ते ३० वेळा एकमेकांवर घासावेत आणि नंतर थोडा वेळ ते संपूर्ण चेहNयावर ठेवावेत. ही क्रिया २ – ३ वेळा करावी.
- दोन्ही डोळ्यांभोवती असलेल्या वर्तुळाकार हाडांच्या कडेवर १ – २ मिनिटे मालीश करावे.
- दोन्ही तळहात आणि तळपाय यांवरील बिंदूंवर प्रतिदिन दाब द्यावा.
२. बिंदूदाबन उपायाविषयी सर्वसाधारण सूचना
- उपाय करावयाच्या संबंधित बिंदूवर शक्यतो, अंगठा आणि तर्जनी (अंगठ्याजवळील बोट) या बोटांनी दाब द्यावा.
- दाब देतांना बिंदूवर सतत दाब न देता थांबून थांबून दाब द्यावा.
- बिंदूवर २ – ३ मिनिटे दाब द्यावा.
- दाब देतांना नेहमी दोन्ही हात आणि दोन्ही पाय यांवरील संबंधित बिंदूंवर द्यावा.
- दिवसातून २ – ३ वेळा वरील क्रिया करावी.