२. उपाय करण्यासाठी आवश्यक मुद्रा आणि नामजप शोधणे
२ अ. पंचतत्त्वे आणि त्यांच्याशी संबंधित देवता
यांचे नामजप / पंचतत्त्वांशी संबंधित बीजमंत्र अन् मुद्रा
२ अ १. मुद्रा शोधण्याची पद्धत : कनिष्ठ स्तराच्या वाईट शक्तींचा त्रास असल्यास करंगळी आणि अनामिका यांच्याशी संबंधित मुद्रा कराव्या लागतात. सध्या वाईट शक्तींचा प्रकोप झाला आहे, म्हणजे वरिष्ठ स्तराच्या वाईट शक्तींची आक्रमणे होत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत करंगळी आणि अनामिका यांच्याशी संबंधित मुद्रा करणे तेवढे उपयुक्त ठरणार नाही. वरिष्ठ स्तराच्या वाईट शक्तींचे त्रास दूर करण्यासाठी मुद्राही पुढच्या पुढच्या तत्त्वांच्या आवश्यक असतात.
मुद्रा शोधतांना – १. अंगठ्याचे टोक बोटाच्या टोकाला लावणे, २. अंगठ्याचे टोक बोटाच्या मुळाशी लावणे, ३. बोटाचे टोक तळहाताला लावणे आणि ४. तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे, या क्रमाने प्रयोग करावा. प्रथम मधले बोट, नंतर तर्जनी आणि शेवटी अंगठा, या क्रमाने मुद्रा शोधावी. प्रत्येक मुद्रा साधारण २० – ३० सेकंद करून पहावी. एक मुद्रा करून झाल्यानंतर ३ – ४ सेकंद थांबावे आणि त्यानंतर पुढची मुद्रा करावी. एकेक मुद्रा करून पहातांना ज्या मुद्रेच्या वेळी जास्त प्रमाणात श्वास रोखला जाईल वा श्वास अडकल्यासारखे होईल, ती मुद्रा उपायांसाठी उपयुक्त असते.
२ अ २. मुद्रेचा प्रकार आणि सगुण-निर्गुण स्तर
मुद्रेचा प्रकार | सगुण-निर्गुण स्तर | |
१. | अंगठ्याचे टोक बोटाच्या टोकाला लावणे | सगुण |
२. | अंगठ्याचे टोक बोटाच्या मुळाशी लावणे | सगुण-निर्गुण |
३. | बोटाचे टोक हाताच्या तळव्याला लावणे | निर्गुण-सगुण |
४. | तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे | अधिक निर्गुण-सगुण |
५. | बोटाचे टोक किंवा हाताचा तळवा न्यास करायच्या ठिकाणापासून १ – २ सें.मी. दूर धरणे | पुष्कळ अधिक निर्गुण-सगुण |
२ अ ३. त्रासाशी संबंधित पंचतत्त्वाचे उपाय होण्यासाठी प्रयोगातून आलेली मुद्रा आणि तिच्यानुसार करायचा नामजप / बीजमंत्राचा जप
मुद्रा | अंगठ्याचे टोक बोटाच्या टोकाला लावणे | अंगठ्याचे टोक बोटाच्या मुळाशी लावणे | बोटाचे टोक तळहाताला लावणे | ||||
पंचतत्त्वाशी संबंधित नामजप |
पंचतत्त्वाशी संबंधित बीजमंत्र | पंचतत्त्वाशी संबंधित नामजप |
पंचतत्त्वाशी संबंधित बीजमंत्र | पंचतत्त्वाशी संबंधित नामजप |
पंचतत्त्वाशी संबंधित बीजमंत्र | ||
१. | मधले बोट | श्री अग्निदेवाय नमः । | रं | श्री सूर्यदेवाय नमः । | रं | श्री सूर्यदेवाय नमः । | रं |
२. | तर्जनी | श्री हनुमते नमः । | यं | श्री वायुदेवाय नमः । | यं | श्री वायुदेवाय नमः । | यं |
मुद्रा | पंचतत्त्वाशी संबंधित नामजप | पंचतत्त्वाशी संबंधित बीजमंत्र | |
अंगठा | तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे | श्री आकाशदेवाय नमः । | हं / खं |
(देवतेच्या नामजपाला ॐ किंवा महा लावणे याविषयीच्या सूचना भाग ३ मधील सूत्र ४ इ यात दिल्या आहेत.)
२ अ ४. प्रयोगात शोधलेले उपाय २ घंटे करूनही लाभ न झाल्यास काय करावे ?
काही वेळा एखाद्याचा त्रास पुष्कळ वाढला असल्यास त्याला न्यास आणि मुद्रा शोधणे कठीण जाऊ शकते. तसेच काही वेळा शोधलेला न्यास, मुद्रा आणि त्यांनुसार आलेला नामजप २ घंटे करूनही लाभ होत नाही आणि पुन्हा पुन्हा प्रयोग करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. हे टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे करावे.
अ. प्रयोगात शोधलेले उपाय २ घंटे केल्यावर लाभ झाला नाही, तर उपाय आणखी १ – २ घंटे चालू ठेवल्यास लाभ होईल का ?, या प्रश्नाचे उत्तर ध्यानात किंवा ईश्वराला विचारावे. उत्तर हो आल्यास तेच उपाय चालू ठेवावेत. तेच उपाय १ – २ घंटे करूनही पुन्हा लाभ झाला नाही, तर पुढीलप्रमाणे उपाय करावेत. उत्तर नाही असे आल्यासही पुढीलप्रमाणे उपाय करावेत.
आ. न्यास मधल्या बोटाने, म्हणजे तेजतत्त्वाने करत असल्यास त्याऐवजी पुढच्या, म्हणजे वायुतत्त्वाशी संबंधित तर्जनीने करावा. या वेळी अंगठ्याचे टोक तर्जनीच्या मुळाशी लावणे, ही मुद्रा करावी. या वेळी अग्निदेव किंवा सूर्यदेव यांचा जप करण्याऐवजी हनुमान किंवा वायुदेव यांचा नामजप करावा.
इ. न्यास तर्जनीने, म्हणजे वायुतत्त्वाने करत असल्यास त्याऐवजी पुढच्या, म्हणजे आकाशतत्त्वाशी संबंधित अंगठ्याने करावा. या वेळी तर्जनीचे टोक अंगठ्याच्या मुळाशी लावणे, ही मुद्रा करावी. या वेळी हनुमान किंवा वायुदेव यांचा नामजप करण्याऐवजी आकाशदेवाचा नामजप करावा.
ई. आकाशदेवाचा जप वरीलप्रमाणे न्यास करूनही लाभ होत नसल्यास आकाशदेवाचा जप न्यास न करता करावा. या वेळी मुद्रा वरीलप्रमाणेच करावी.
उ. आकाशदेवाचा जप सूत्र ई या प्रमाणे ५ – ६ दिवस करूनही लाभ न झाल्यास सध्या काळानुसार आवश्यक असलेला श्रीकृष्णाचा जप करावा. त्या वेळी मधले बोट आणि अंगठा यांची टोके एकमेकांना जोडून एका हाताने मणिपुरचक्रावर न्यास करावा आणि दुसर्या हाताने मुद्रा करावी.
आकाशदेवाचा नामजप हा निर्गुण स्तराचा आहे, तर श्रीकृष्णाचा नामजप हा निर्गुण-सगुण स्तराचा आहे. वाईट शक्तींची आक्रमणे काही वेळा जास्त प्रमाणात सगुण स्तरावर, तर काही वेळा जास्त प्रमाणात निर्गुण स्तरावर होतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार आणि आवश्यकता कळत नसल्यास आकाशदेवाचा अन् श्रीकृष्णाचा नामजप आलटून पालटून करणे उपयुक्त ठरते. पंचतत्त्वांचा नामजप करतांना भावजागृती होणे कठीण जाते. याउलट श्रीकृष्णाचा नामजप करतांना भावजागृती सुलभतेने होऊ शकते. त्यामुळे नामजप परिणामकारक होण्याची शक्यता वाढते.
२ आ. उच्च देवतांचे आणि निर्गुणाशी संबंधित नामजप अन् मुद्रा
२ आ १. नामजप शोधण्याची पद्धत
सूत्र २ आ १ अ यात दिलेल्या नामजपांपैकी पहिला नामजप १ – २ मिनिटे करून पहावा आणि तो करतांना श्वास बंद होतो का किंवा श्वास घ्यायला त्रास होतो का, याचे निरीक्षण करावे. असे पुढचे पुढचे नामजप करून पहावेत. जो नामजप करतांना श्वास बंद होण्याची वा श्वास घ्यायला त्रास होण्याची तीव्रता अधिक असेल, तो नामजप उपायांसाठी सर्वाधिक आवश्यक असल्याचे समजावे.
२ आ १ अ. उपायांसाठी आवश्यक असलेले नामजप
१. कुलदेवता, उपास्यदेवता अन् सप्तदेवता (श्रीराम, मारुति, शिव, श्री दुर्गादेवी, श्री गणपति, दत्त आणि श्रीकृष्ण) या देवतांच्या नामजपांपैकी प्रत्येक नामजप करून पहावा. बहुतांश देवतांच्या नामजपाला प्रारंभी श्री लावला जातो, उदा. श्री गणेशाय नमः । प्रयोग करतांना प्रथम असे श्री लावलेले नामजप करून पहावेत. कोणत्याच नामजपाने काही न जाणवल्यास प्रत्येक नामजपाच्या आरंभी आणि शेवटी एक ॐ लावून नामजप करून पहावेत. असे करूनही काही न जाणवल्यास नामजपाच्या आरंभी आणि शेवटी दोन ॐ लावून नामजप करून पहावेत.
२. शून्य, महाशून्य, निर्गुण आणि ॐ हे सर्व निर्गुणाशी संबंधित नामजप आहेत. हे नामजप निर्गुणाशी संबंधित असले, तरी ते क्रमाने अधिकाधिक निर्गुणाशी संबंधित आहेत. यासाठी या नामजपांपैकी एकेक नामजप क्रमाने करून पहावा.
२ आ २. मुद्रा शोधण्याची पद्धत
पुढील भाग वाचण्यासाठी खालील मार्गिकेवर ‘क्लिक’ करा !
प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्या विकारांवरील उपाय भाग – ३