भूलोकातच अनुभवत आहेत साधक उच्चलोकीचा परामानंद !
सनातनच्या रामनाथी आश्रमामध्ये रहाणार्या अनेक साधकांना उच्चलोकांमध्ये असल्याप्रमाणे अनुभूती येते. आश्रमातील साधकांना आज कोणती दिनांक किंवा वार आहे, तसेच वाजले किती याचेही भान नसते. साधकांना आश्रमात रहातांना काळाच्या पलिकडील अनुभूती येते. स्वर्गातील गंधर्वलोकात ज्याप्रमाणे विविध नाद ऐकू येतात किंवा विविध सुगंध येतात, त्याप्रमाणे साधकांना विविध वाद्यांचे म्हणजे सनई, तबला आणि अन्य वाद्यांचेही नाद ऐकू येत असतात. हे नाद अतिसूक्ष्म असतात. त्याचप्रमाणे विविध सुगंधही येत असतात.
काही साधक आश्रमातून वैयक्तिक कारणासाठी घरी जातात, त्या वेळी त्यांना आश्रमाच्या बाहेर पडल्यानंतर आपण पृथ्वीवर गेल्याप्रमाणे जडत्व जाणवते. आश्रमाच्या इमारतीच्या कोणत्याही मजल्यावरून बाहेरील डोंगर किंवा रस्ते यांकडे पाहिल्यास अवकाशातून (वरून) पृथ्वीकडे पाहिल्यासारखे वाटते. ईश्वराच्या कृपेने रामनाथी आश्रमामध्ये रामराज्य असल्यामुळे पृथ्वीवरच इतर लोकांतील अनुभूती घेता येते.
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विद्यालय, गोवा. (२२.१.२०१६)